परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अनेक महामृत्यूयोग टाळणारी संजीवनी आणि सनातन संस्थेवरील बंदीची संकटे दूर करणारे विघ्नहर्ते योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या ९८ व्या जन्मोत्सवानिमित्त
सनातन परिवाराकडून त्यांच्या सुकोमल चरणी कोटी कोटी प्रणाम !

भक्तांच्या उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहिलेल्या काही मोजक्या विभूतींपैकी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन हे एक होत. वयाची शंभरी समीप आली असतांना आजही ते भक्तांच्या जीवनातील समस्या निवारणासाठी अहोरात्र झटत असतात.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे पूर्ण नाव आहे श्री. श्रीपाद गणेश वैशंपायन. त्यांचा जन्म वैशाख पौर्णिमा म्हणजेच ७.५.१९२० या दिवशी नेरे, ता. पनवेल, जि. रायगड या लहानशा खेडेगावात झाला. ऐन कोवळ्या अजाण वयातच योगतज्ञ दादाजींनी गृहत्याग केला. देवभूमी हिमालयाच्या कुशीत त्यांनी केलेली साधना मानवी देहाला न पेलवणारी प्राचीन ऋषिमुनींच्या तोडीची आहे. योगतज्ञ दादाजींचे गुरु महान तपस्वी प.पू. आनंदस्वामीजी यांचे आजही हिमालयातील कुलू खोर्‍यात वास्तव्य आहे. योगतज्ञ दादाजींचा जीवनप्रवाह थक्क करणारा असून त्यांच्या शक्तीची किमया अद्भुत, विलक्षण आणि मती गुंग करणारी आहे. आज शेवगाव, जिल्हा नगर येथे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा ९८ वा जन्मोत्सव साजरा होत असून ते ९९ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या चरणी शब्दसुमनांजली कृतज्ञतापूर्वक अर्पण !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांचे कृतज्ञतापर उद्गार

१.११.२०११ : ‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन ‘सनातनवर येणारी संकटे दूर करण्यासाठी’
करत असलेले विधी अमूल्य असल्याने त्यांचे मोल पैशांत करणे कठीण !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन सनातनवर येणारी संकटे दूर करण्यासाठी मोठमोठी अनुष्ठाने करत असतात. ही अनुष्ठाने करण्यासाठी तन, मन तसेच धनाचीही आवश्यकता भासते. प.पू. डॉक्टरांनी ‘‘विधीसाठी किती रक्कम पाठवू ?’’, असे विचारल्यावर प.पू. दादाजी सांगतात, ‘‘तुम्हाला आवश्यक वाटेल, तेवढी पाठवा, अधिक झाली, तर परत पाठवीन. अल्प झाली, तर मागणार नाही.’’ यावर प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘किती रक्कम पाठवावी, याविषयी कोणताच आकडा माझ्या मनात का येत नाही. याचे कारण नंतर कळले. कारण आहे प.पू. दादाजी इतके सहाय्य करतात की, तिचे मोल करणे कठीण आहे; म्हणून मला या प्रश्‍नाचे उत्तर मिळत नाही; परंतु ‘फूल ना फुलाची पाकळी’ म्हणून काही रक्कम मी त्यांना पाठवतो.’’

हे सांगितल्यावर प.पू. दादाजी केवळ हसले.’ – (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

४.११.२०११ : योगतज्ञ दादाजी वैशंपायन प.पू. डॉक्टरांसाठी करत असलेले प्रयत्न

‘पूर्णपणे विकलांग होण्याची माझी स्थिती टळावी किंवा मी न्यूनतम विकलांग व्हावे, यासंदर्भात योगतज्ञ दादाजी वैशंपायन प्रयत्नरत आहेत. त्यांनी स्वतःच्या स्थितीची पर्वा न करता मला २ टक्के प्राणशक्तीही दिली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आपल्या आशीर्वादातून साधकांवर कृपेचा वर्षाव करणारे योगतज्ञ प.पू. दादाजी परात्पर गुरु डॉ. आठवलेे (उजवीकडे) यांचा महामृत्यूयोग टळण्यासाठी विधी करतांना योगतज्ञ दादाजी वैशंपायन (ऑक्टोबर २००३)

वर्ष २००३ : योगतज्ञ प.पू. दादाजी यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना त्यांच्या
रक्षणासाठी दिलेला ताईत त्यांनी देवद आश्रमातील साधिकेला वाईट शक्तींपासून तिचे संरक्षण होण्यासाठी
देणे आणि तिच्याकडून दोन मासांपूर्वी हरवलेला ताईत योगतज्ञ प.पू. दादाजी यांनी वाईट शक्तींशी लढून शोधणे !

कु. वीणा आडकर (आताच्या सौ. श्रद्धा पवार) यांचा हरवलेला ताईत शोधण्याचे महत्त्व सांगतांना प.पू. दादाजी म्हणाले, ‘‘कवच (ताईत) अदृश्य होण्याचे कारण म्हणजे हे मौलिक कवच प.पू. डॉ. आठवले यांच्या प्रबळ इच्छाशक्तीशी आणि प्राणशक्तीशी निगडित होते. त्यामुळे ते कवच काळ्या शक्तींनी हिरावून घेतल्यावर प्रथम या सद्गुरूंची शारीरिक आणि मानसिक शक्ती बलहीन होऊन नंतर त्यांच्या जीवितालाच धोका पोहोचणार होता. ‘त्यायोगे सनातनच्या कल्याणकारी कार्यावर दुष्परिणाम करता येईल’, अशी काळ्या शक्तींची योजना होती. त्यामुळे ताईत शोधण्यासाठी आपण एवढे प्रयत्न केले.’’

५.६.२००९ : ‘परात्पर गुरु डॉक्टर आता पूर्णायुषी झाले.’ – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

भावार्थ : ‘पूर्णायुषी, म्हणजेच ईश्‍वराने नेमून दिलेले अवतारी कार्य पूर्णत्वाला नेईपर्यंतचे आयुष्य’, असा अर्थ असल्याचे मला जाणवले.

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२४.८.२०१० : परात्पर गुरु डॉक्टरांना ‘बोलता येणार नाही’, असे होऊ नये; म्हणून योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी अनुष्ठान करणे

‘सध्या तुम्हाला त्रास होतो, हे दिसले. तो अधिकाधिक वाढून शिवाय मौनावस्था (‘बोलता येणार नाही’, असे न म्हणता प.पू. दादाजी ‘मौनावस्था’ असे म्हणतात.) इत्यादींनी तुमच्या देहाचे आणि मनाचे खच्चीकरण होण्याची संधी प्राक्तन भोगामधून (प्रारब्धातून) नाहीशी व्हावी, यासाठी हा खटाटोप. भयगंडाचा त्रास तुम्हासारख्या थोर व्यक्तीला होऊ नये; म्हणून हा प्रयत्न भिन्न मार्गांतून आहे. तरी कृपया समजून घ्यावे.’ – प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन

३०.३.२०११ : प.पू. दादाजींनी परात्पर गुरु डॉक्टरांसाठी ज्येष्ठ ते श्रावण मासांपर्यंतचा काळ अतिशय धोकादायक असल्याचे सांगणे

‘जूननंतरचा काळ, म्हणजे जवळजवळ ज्येष्ठ ते श्रावण मासांपर्यंतचा काळ प.पू. डॉक्टरांसाठी अतिशय धोकादायक असल्याचे सांगितले. ‘प.पू. डॉक्टर या काळात निदान उभे तरी राहू शकले पाहिजेत, यासाठी प्रयत्न आहेत’, असेही ते म्हणाले.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

७.४.२०११ : दूरभाषवर बोलतांना योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितलेली सूत्रे

१. ‘माझे आयुष्य किमान ३ वर्षे वाढवण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

२. त्यांचे स्वतःचे आयुष्य वाढवणे कठीण आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

२४.५.२०११ : प.पू. दादाजींनी उपायांसाठी ठरवलेला प्राधान्यक्रम

‘प.पू. दादाजींनी उपायांसाठी प्राधान्य ठरवतांना माझा महामृत्यूयोग, नंतर त्यांचा महामृत्यूयोग आणि शेवटी सनातनवरील बंदी असा क्रम ठरवला. कार्यासाठी प्रथम जिवंत रहाणे आवश्यक असल्याने प्राधान्य महामृत्यूयोग टाळण्यासाठी दिला; पण तेसुद्धा स्वतःच्या नाही, तर माझ्या महामृत्यूयोगाला प्राधान्य दिले. ‘सनातनवर बंदी आली, तरी परात्पर गुरु डॉक्टर जिवंत असल्यास सर्व कार्य पुन्हा उभारू शकतात; म्हणून त्यांचा मृत्यूयोग टाळणे महत्त्वाचे आहे’, असे प.पू. दादाजी म्हणाले.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

७.११.२०११ : परात्पर गुरु डॉक्टरांचे ग्रंथनिर्मितीचे कार्य बंद पाडण्यासाठी वाईट शक्ती त्यांचा मृत्यू घडवून
आणू शकत नसल्याने त्यांना बेशुद्धावस्था यावी यासाठी प्रयत्नरत असणे; पण योगतज्ञ दादाजी वैशंपायन ती टाळणार असणे

‘मी अजून प.पू. डॉक्टरांनाही सांगितलेली नाही, अशी एक गोष्ट तुम्हाला (श्री. मधुसूदन कुलकर्णी यांना) सांगत आहे. मी त्यांना उद्या दूरध्वनी करणार आहे. प.पू. डॉक्टरांना मागील वर्षीच ‘मृत्यूयोग’ होता. तो आता नष्ट केला आहे. त्यांचे आयुष्य संपलेलेच आहे. हे राजकारण आहे. शक्ती प्राणाला काही करू शकत नाहीत; पण देह पंचमहाभूतांचा आहे; म्हणून त्यावर आक्रमण करून तो नियंत्रणात घेण्याचे शक्तींचे नियोजन आहे; कारण त्यांना ग्रंथनिर्मितीचे कार्य बंद पाडायचे आहे. शक्ती आता त्यांना कोमात नेणार आहेत (बेशुद्ध पाडणार आहेत); पण मी तसे होऊ देणार नाही. त्यांचे कार्य अजून व्हायचे आहे. त्यांच्यावर शत्रूग्रह आक्रमण करतात. ते होऊ नये; म्हणून माझेही प्रयत्न चालू आहेत.’

७.२.२०१४ : परात्पर गुरु डॉक्टरांचे आयुष्य वाढवण्यासाठी त्यांना
आयुष्य देऊ इच्छिणाराही तेवढ्या क्षमतेचा हवा असल्याचे प.पू. दादाजी वैशंपायन यांनी सांगणे

‘माझ्या मनातही काही दिवसांपासून ‘प.पू. डॉक्टरांचे आयुष्य पुष्कळ वाढावे’, असे विचार येत आहेत. याविषयी मी प.पू. दादाजी वैशंपायन मिरजेला आले होते तेव्हा त्यांना विचारले, ‘‘माझ्या किंवा आम्हा साधकांच्या आयुष्यातील काही वर्षे प.पू. डॉक्टरांना देता येऊन त्यांचे आयुष्य पुष्कळ वाढवता येईल का ?’’ त्या वेळी प.पू. दादाजी म्हणाले, ‘‘प.पू. डॉक्टरांना आयुष्य देऊ इच्छिणाराही त्या क्षमतेचाच हवा. माझे आयुष्य शिल्लक नाही, नाहीतर मीच त्यांना आयुष्य वाढवून दिले असते.’’ – सौ. सुजाता मधुसूदन कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१७.६.२०१४ : योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी त्यांच्या आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या आयुष्यवृद्धीसाठी अनुष्ठान
करणे आणि त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांचा मृत्यूयोग टळला असून त्यांचे आयुष्य एक वर्षाने वाढवून मिळाले असल्याचे सांगणे

‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी नाशिक येथील त्यांच्या निवासस्थानी ‘१० ते १७ जून २०१४’ या कालावधीत प.पू. डॉक्टरांच्या आणि त्यांच्या आयुष्यवृद्धीसाठी अनुष्ठान केले. यामुळे प.पू. डॉक्टरांचा मृत्यूयोग टळला आहे आणि त्यांचे आयुष्य एक वर्षाने वाढवून मिळाले आहे. हे अनुष्ठान केले नसते, तर प.पू. डॉक्टर बेशुद्धावस्थेत जाण्याची शक्यता अधिक होती. आता आणखी पावणे दोन टक्के शक्ती मिळवायची राहिली आहे, त्यानंतर आम्हा दोघांनाही मृत्यूसंकटाची भीती रहाणार नाही.

‘‘प.पू. डॉक्टरांना एवढ्या लवकर मी जाऊ देणार नाही’’, असे प.पू. दादाजी म्हणाले.

२२.१०.२०१४ : परात्पर गुरु डॉक्टरांना झालेल्या त्रासांविषयी कळवल्यावर
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी ‘मी प.पू. डॉक्टरांसाठी उपासना करतो’, असे सांगणे

‘२२.१०.२०१४ या दिवशी, म्हणजे नरकचतुर्दशीच्या पहाटे समाजकंटकांनी रामनाथी आश्रमावर आक्रमण करून ४ साधकांना घायाळ केले. दुपारी १२ वाजता श्री. प्रशांत कुलकर्णी यांना प.पू. डॉक्टरांचा रक्तदाब पुष्कळ न्यून झाला असल्याने त्यांना पुष्कळ चक्कर येत असल्याचे आणि उठून बसण्याची अन् बोलण्याचीही शक्ती नसल्याचे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांना कळवायला सांगितले. तसे कळवल्यावर योगतज्ञ दादाजी यांनी ‘मी लगेच साधनेला बसतो आणि प.पू. डॉक्टरांसाठी उपासना करतो’, असे कळवले.

२.९.२०१५ : ‘प.पू. (डॉक्टर), आपले आयुष्य २०० दिवस वाढवून मिळाले आहे;
पण शारीरिक स्वास्थ्यात खूप सुधारणा होणार नाही, तरी कार्य चांगल्या तर्‍हेने होईल.’ – योगतज्ञ दादाजी वैशंपायन

१५.५.२०१६ : ‘आज योगतज्ञ दादाजी वैशंपायन दूरभाषवर माझ्याशी
बोलतांना म्हणाले, ‘‘तुमचे आयुष्य अजून २८ महिने आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१०.११.२०१७ : परात्पर गुरु डॉक्टरांच्या मृत्यूयोगाविषयी ज्योतिषांनी आणि
नाडीपट्टीत सांगितलेले योग्य आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या जिवाला धोका आहेच.’ – योगतज्ञ दादाजी वैशंपायन

 

Leave a Comment