कलियुगात नामस्मरण हीच काळानुसार साधना आहे – सौ. प्राची जुवेकर, सनातन संस्था

होलापूर, शिवपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन

वाराणसी : काश्मीरमधून साडे चार लाख हिंदूंना त्यांच्याच देशात विस्थापित व्हावे लागले असतांना म्यानमारमधील २३ सहस्र मुसलमान जम्मूमध्ये रहात आहेत. हज यात्रेला सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जाते, तर विन्ध्याचलमध्ये नवरात्रीच्या मेळाव्याकरता येणार्‍या यात्रेकरूंच्या तिकिटांवर अधिभार वाढवण्यात येतो, हा धर्मनिरपेक्षतेच्या नावावर हिंदूंवर अन्याय आहे, त्यामुळे हिंदूंनी जागृत झाले पाहिजे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न केेले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी होलापूर (शिवपूर) येथील श्री बन्धेबीर बाबा हनुमान मंदिरात आयोजित हिंदु धर्मजागृती सभेत केले. या सभेला श्री श्री १०८ संत शरणदास मौनी महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. साधना केल्याने चिरंतन आनंद मिळू शकतो. कलियुगात नामस्मरण हीच काळानुसार साधना आहे, असे सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनी सांगितले.

क्षणचित्रे

१. होलापूर येथील धर्मप्रेमी श्री. राकेशचंद्र पाठक यांनी या सभेसाठी मोलाचे साहाय्य केले.

२. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार देवघराची रचना केल्याने घरातील संपूर्ण वातावरण पालटले. घरात येणार्‍या नातेवाईकांनाही याचा अनुभव येत आहे. घरात पुष्कळ चांगले वाटते, असे तेही सांगतात. ही अनुभूती हिंदु जागरण मंचाचे रवि श्रीवास्तव यांनी सभेच्या शेवटी चर्चा करतांना सांगितली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Leave a Comment