धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र !

अनुक्रमणिका

 

संकल्पना

हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदुहित जपले जाणारे राष्ट्र ! धर्म हाच या राष्ट्रात केंद्रबिंदू असेल ! हिंदू राष्ट्र संकल्पना म्हणजे केवळ राजकारण नाही, तर धर्माधिष्ठित जीवन जगण्याची ती एक प्रगल्भ संस्कृती असेल ! राजकारण, अर्थकारण, संरक्षण, विज्ञान इत्यादी सर्वच क्षेत्रांत हे ‘हिंदू राष्ट्र’ आदर्श असेल आणि त्यातील जनतेला रामराज्याची अनुभूतीदेखील येईल ! त्यागी अन् राष्ट्रोद्धाराची भावना बाळगणारा धर्माचरणी समाज, प्रजेच्या रक्षणार्थ अहोरात्र झटणार्‍या सुरक्षायंत्रणा, सत्यान्वेषी न्यायप्रणाली, कार्यक्षम प्रशासन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे धर्मनिष्ठा अन् राष्ट्रनिष्ठा बाळगणारे समाजहितासाठी निःस्पृहपणे राज्य करणारे राज्यकर्ते, ही या हिंदूराष्ट्राची मानचिन्हे असणार आहेत. येत्या दीड-दोन दशकांतच रामराज्याची झलक दाखवणारे हे धर्माधिष्ठित ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन होईल.

हिंदु राष्ट्र
हिंदु राष्ट्र

हिंदु राष्ट्र : विश्‍वकल्याणार्थ कार्यरत सत्त्वगुणी लोकांचे राष्ट्र !

जगात ख्रिस्त्यांची १५७, मुसलमानांची ५२, बौद्धांची १२, तर ज्यूंचे १ राष्ट्र आहे. हिंदूंचे राष्ट्र या सूर्यमंडळात कोठे आहे ?

 

हिंदु समाज, राष्ट्र आणि धर्म यांची वर्तमान दुःस्थिती !

आज हिंदुस्थानात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली राज्यकर्ते हिंदु धर्मावरील संकटे आणि हिंदु धर्मियांवरील अत्याचार यांकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच हिंदु धर्माला राजाश्रय नसल्याने समाज, राष्ट्र आणि हिंदु धर्म यांचे वेगाने अधःपतन होत आहे. परिणामी भारत हे समस्याप्रधान, नीतीहीन आणि असुरक्षित राष्ट्र बनले आहे.

 

हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय : हिंदु राष्ट्र !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सिंधचा राजा दाहीर, देहलीचा सम्राट पृथ्वीराज चव्हाण, राणा संग, महाराणा प्रताप, विजयनगरचे कृष्णदेवराय, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी लक्ष्मीबाई, राजा कुंवरसिंह इत्यादी सर्व राजपुरुषांचे ध्येय हिंदु राज्य स्थापणे, हेच होते. आपणही राष्ट्र अन् धर्म यांवरील एकेका संकटाचा प्रतिकार करण्यापेक्षा सर्व संकटांचा समूळ नाश करणारे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापायला हवे !

स्वातंत्र्योत्तर काळात वैयक्तिक आणि कुटुंबाचे सुख यांपलिकडील राष्ट्र-धर्मविषयक दृष्टीकोन हिंदूंना न शिकवल्यामुळे देशाची सर्वच क्षेत्रांत परमावधीची अधोगती झाली आहे. यावर उपाय एकच आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 

आदर्श आणि सर्वदृष्ट्यासंपन्न ‘हिंदू राष्ट्र’ असे असेल !

१. राजकीयदृष्ट्या हिंदू राष्ट्र

१ अ. भावी हिंदू राष्ट्रातील राज्यकर्ते

धर्मपालक, नीतीमान, नि:स्वार्थी, जनतेवर पितृवत प्रेम करणारे, जनतेकडून धर्माचरण करवून घेणारे आणि संतांच्या मार्गदर्शनानुसार राज्यकारभार करणारे असतील.

 

१ आ. भावी हिंदू राष्ट्रातील राज्यघटना

लोकशाहीत ‘कायदा’ हा केंद्रबिंदू धरून राज्यव्यवस्थेची रचना केली जाते. हिंदूराष्ट्रात ‘धर्म’ हाच नीतीनियमांचा आणि राज्यकारभाराचा केंद्रबिंदू असेल.

 

१ इ. भावी हिंदू राष्ट्रातील राज्यव्यवस्था

‘कायद्याचे राज्य’ (कोर्ट ऑफ लॉ) असणार नाही, तर ‘न्यायाचे राज्य’ (कोर्ट ऑफ जस्टीस) असेल.

 

१ ई. भावी हिंदू राष्ट्रातील निवडणुका

निवडणुका नसतील. जनता योग्य अन् पात्र नागरिकाला राज्यकारभार करण्यास सांगेल.

 

२. सामाजिकदृष्ट्या हिंदु राष्ट्र

२ अ. भावी हिंदू राष्ट्रातील समाजव्यवस्था

समाजव्यवस्थेत ‘धर्म’ हा केंद्रबिंदू असल्याने समाज नीतीमान आणि सदाचारी बनेल. समाजात जातीव्यवस्था नाही, तर गुण-कर्मावर आधारित व्यवस्था असेल.

 

२ आ. भावी हिंदू राष्ट्रातील समाज

हिंदूराष्ट्रात आयुष्यमर्यादा सर्वसाधारण शंभर वर्षांपर्यंत राहील. सुप्रजननशास्त्राच्या दृष्टीने अनुकूल विवाह होतील. त्यामुळे शक्‍तीशाली आणि दीर्घायुषी प्रजा निर्माण होईल.

 

२ इ. भावी हिंदू राष्ट्रातील लोकसंख्या

इंद्रियसंयम शिकवण्यासाठी ‘एकच मूल (धर्मज संतती) व्हावे’, असे सांगणार्‍या वेदांच्या आज्ञेचे पालन केले जाईल. त्यामुळे देशाची लोकसंख्या नियंत्रणात राहील.

 

२ ई. भावी हिंदू राष्ट्रातील नागरिक

धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. धर्म जगला, तर राष्ट्र जगते. यासाठी राष्ट्रातील नागरिक धर्माचरणी असावेत. हिंदूराष्ट्रामध्ये नागरिक धर्मशिक्षित अन् धर्माचरणी असतील.

 

२ उ. भावी हिंदू राष्ट्रातील स्त्री सन्मान

स्त्रीचे शीलरक्षण, हे परमकर्तव्य असेल. स्त्रिया पतीव्रता असतील.

 

२ ऊ. भावी हिंदू राष्ट्रातील कुटुंबव्यवस्था

एकत्र कुटुंबपद्धती पुनरुज्जीवित केली जाईल. वृद्धाश्रम नसतील.

 

२ ए. भावी हिंदू राष्ट्रातील आहार

सात्त्विक असेल; कारण अशा आहारामुळे शरीर अन् मन शुद्ध होते.

 

३. प्रशासकीयदृष्ट्या हिंदू राष्ट्र

३ अ. भावी हिंदू राष्ट्रातील प्रशासन

हिंदूराष्ट्रात जनतेला आधार वाटणारे पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी असतील. त्यांची नियुक्‍ती करतांना राष्ट्रभक्‍ती अन् धर्मप्रेम या दोन घटकांना सर्वाधिक प्राधान्य असेल.

 

३ आ. भावी हिंदू राष्ट्रातील करव्यवस्था

हिंदूराष्ट्रात जनतेचे आर्थिक शोषण करणारी नाही, तर राष्ट्रीय प्रगतीसाठी आवश्यक तेवढेच कर वसूल करणारी, कौटिल्याच्या अर्थनीतीनुसार करव्यवस्था असेल.

 

३ इ. भावी हिंदू राष्ट्रातील संरक्षणव्यवस्था

बाह्य अन् अंतर्गत शत्रूंचा बीमोड केला जाईल. त्यामुळे प्रजा सुरक्षित जीवन जगेल.

 

३ ई. भावी हिंदू राष्ट्रातील कृषीव्यवस्था

लोकगरजा पूर्ण करणारी आणि राष्ट्रीय प्रगतीला पोषक कृषीव्यवस्था असेल.

 

४. न्यायिकदृष्ट्या हिंदू राष्ट्र

४ अ. भावी हिंदू राष्ट्रातील कायदे

धर्मांतरबंदी, गोवंशहत्याबंदी आदी हिंदुहिताचे कायदे असतील. अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण नसेल, तर सर्व लोकांसाठी ‘समान नागरी कायदा’ असेल.

 

४ आ. भावी हिंदू राष्ट्रातील न्यायदान

न्यायाधीश सूक्ष्मातील जाणणारे असल्याने वकील नसतील आणि योग्य अन् त्वरित न्याय मिळेल.

 

४ इ. भावी हिंदू राष्ट्रातील दंडनीती

चोर, भ्रष्टाचारी आदींना कठोर शिक्षा दिली जाईल. त्यामुळे समाज नीतीमान अन् सदाचारी बनेल.

 

५. भाषिकदृष्ट्या हिंदू राष्ट्र

५ अ. संस्कृत भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला जाऊन तिचा विकास केला जाईल.

५ आ. स्थानिक कारभार प्रांतीय भाषा व राष्ट्रीय कारभार राष्ट्रभाषा यांत होईल.

५ इ. सर्व हिंदू भाषांतील परकीय शब्द वगळून नागरिकांना शुद्ध भाषा बोलणे अनिवार्य केले जाईल.

 

६. धार्मिकदृष्ट्या हिंदू राष्ट्र

६ अ. भावी हिंदू राष्ट्रातील देवळे

देवळे अन् तीर्थक्षेत्रे परकीय विध्वंसकांपासून सदाची मुक्‍त होतील. देवळांचे विश्‍वस्त आणि सेवेकरी भक्‍त असतील, तसेच देवनिधीचा वापर धर्मकार्यासाठीच होईल.

 

६ आ. भावी हिंदू राष्ट्रातील अध्यात्मीकरण

हिंदूराष्ट्रात व्यवसाय, वस्तू आदींचे अध्यात्मीकरण केले जाईल, उदा. घरबांधणी, रस्तेबांधणी आदींत सात्त्विकता निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्‍न असतील.

 

७. शैक्षणिकदृष्ट्या हिंदू राष्ट्र

७ अ. हिंदू राष्ट्रातील अध्यात्म विश्‍वविद्यालय

अध्यात्मात प्रगती करू इच्छिणार्‍यांसाठी ‘अध्यात्म विश्‍वविद्यालये’ स्थापण्यात येतील. या विद्यालयांतून बाहेर पडणारे विद्यार्थी संतच असतील.

 

७ आ. भावी हिंदू राष्ट्रातील शिक्षण

हिंदूराष्ट्रात ‘मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत’ रहित करून ‘धर्मनिष्ठ गुरुकुल पद्धत’ पुनरुज्जीवित केली जाईल. यामुळे विद्यार्थी आत्मबल आणि क्षात्रतेज संपन्न होतील.

 

७ इ. शैक्षणिकदृष्ट्या भावी हिंदूराष्ट्र

हिंदूराष्ट्रात भारताच्या प्राचीन गौरवशाली इतिहासाचे पुनर्लेखन करून हिंदूंचा सत्य व राष्ट्रभक्‍ती अन् क्षात्रवृत्ती जागृत करणारा इतिहास शाळांतून शिकवला जाईल.

 

७ ई. भावी हिंदू राष्ट्रातील धर्मशिक्षण

शाळांमधून धर्मशिक्षण दिले गेल्याने भावी पिढी संस्कारित होईल.

 

८. सांस्कृतिकदृष्ट्या हिंदू राष्ट्र

८ अ. सांस्कृतिकदृष्ट्या भावी हिंदूराष्ट्र

राष्ट्रीय वा विशेष दिन पाश्‍चात्त्य पद्धतींप्रमाणे नसतील, तर हिंदु संस्कृतीनुसार असतील, उदा. आर्थिक वर्षारंभ ‘१ एप्रिल’ ऐवजी ‘दिवाळीतील लक्ष्मीपूजन’ हा असेल.

 

८ आ. भावी हिंदु राष्ट्रातील कलाविकास

‘कलेसाठी कला’ नाही, तर ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’, असेल.

 

९. नैसर्गिकदृष्ट्या हिंदू राष्ट्र

९ अ. नैसर्गिकदृष्ट्या भावी हिंदूराष्ट्र

जनतेवर पूर, दुष्काळ, भूकंप आदींसारखी नैसर्गिक संकटे ओढवू नयेत, यासाठी पर्यावरण आणि निसर्ग यांचे हित लक्षात घेऊन नियम केले जातील

 

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रात समाजात होत जाणारे विविधांगी आमूलाग्र पालट

वर्ष २०२३ भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन होईल. त्यानंतर पुढील ५० वर्षांत हिंदु समाजात विविधांगी आमूलाग्र पालट होतील. हे पालट अभ्यासल्यानंतर हिंदु राष्ट्रातच मानवाची खरा विकास किंवा प्रगती होईल, असे आज म्हणता येईल.

 

१. सामाजिक समस्यांचे निर्मूलन

१ अ. गुंडगिरी, चोर्‍या, दरोडे, हत्या, बलात्कार आदी गुन्हेगारीचे प्रमाण टप्प्याटप्प्याने न्यून होत जाईल.

१ आ. उपासमारी, कुपोषण आदींचे प्रमाण टप्प्याटप्प्याने न्यून होत जाईल.

 

२. प्रशासकीय कार्यक्षमतेचे वर्धन

२ अ. प्रशासन कार्यक्षम झाल्याने शासकीय कार्यालयांतील कामे तत्परतेने होतांना दिसतील.

२ आ. नगरे (शहरे), गावे, नद्या आणि जलाशय स्वच्छ दिसतील.

२ इ. गावागावांत खड्डेविरहित रस्ते दिसतील.

२ ई. सर्वत्र वीज उपलब्ध झाल्याने प्रत्येक घर रात्री प्रकाशमान दिसेल.

 

३. आर्थिक सुधारणा

३ अ. देश टप्प्याटप्प्याने स्वावलंबी होत गेल्याने परदेशी उत्पादनांची आयात न्यून होईल.

३ आ. देशाची अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने सबळ होऊन भारतीय चलन अमेरिकी डॉलरच्या मूल्याएवढे वधारेल.

 

४. पर्यावरणाचे रक्षण

४ अ. कचरा, ध्वनी, जल, वायू आदी प्रदूषणाचे प्रमाण टप्प्याटप्प्याने न्यून होत जाईल.

४ आ. गोहत्या रोखल्या गेल्यामुळे मूकपणे आसवें गाळणार्‍या गायी आनंदाने हंबरतील.

४ इ. किरणोर्त्सगामुळे लोप होत चाललेला पशू-पक्ष्यांचा किलबिलाट पुनश्‍च ऐकू येईल.

४ ई. निसर्ग टप्प्याटप्प्याने अनुकूल होत गेल्याने भूमी सुजलाम आणि सुफलाम् झालेली दिसेल.

 

५. हिंदु संस्कृतीचे संवर्धन

५ अ. देवभाषा संस्कृतचे पुनरुज्जीवन झाल्याने संस्कृतमध्ये संभाषण होतांना दिसेल.

५ आ. घरोघरी भिंतींवर कॅलेंडर नाही, तर हिंदु पंचांग दिसू लागतील.

५ इ. उषःकाली वेदमंत्रांचे उच्चार, भक्तीगीते आदी ऐकू येतील.

५ ई. सार्वजनिक उत्सव आणि सण अनुचित प्रकारांविरहित आणि भक्तीभावाने साजरे होतांना दिसतील.

 

६. मानवी जीवनाचा विकास

६ अ. सर्व नागरिक टप्प्याटप्प्याने धर्माचरणी बनून नंतर साधकवृत्तीचे बनतील.

६ आ. घरोघरी आयुर्वेदाचा प्रसार झाल्याने निरोगी जीवन जगता येईल.

 

– (प.पू) डॉ. आठवले (६.११.२०१४)

 

हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी योगदान द्या !

हिंदूंनो, ईश्‍वरी आशीर्वादामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. श्रीकृष्णाने उचललेल्या गोवर्धन पर्वताला गोप-गोपींनी काठ्या लावल्या, त्याप्रमाणे हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या क्षमतेनुसार कृती करण्यास आरंभ करा अन् ईश्‍वरी कृपा संपादन करा !

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी योगदान द्या !
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी योगदान द्या !

‘हिंदू राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळवण्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनीन’, अशी प्रतिज्ञा करून प्रत्येकाने त्याप्रमाणे कार्यरत होणे अत्यावश्यक आहे.  – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रात रामराज्य असल्याने त्यात निवडणुकांची आणि त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याची आवश्यकता असणार नाही. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी स्वक्षमतेनुसार योगदान द्या !

१. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी कार्यरत संघटनांच्या उपक्रमांत प्रतिदिन १ तास तरी सहभागी व्हा !

२. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी कार्यरत व्यक्ती आणि संघटना यांना यथाशक्ती अर्थसाहाय्य करा !

३. हिंदु राष्ट्र-स्थापनेचा विचार प्रसारमाध्यमे आणि संकेतस्थळे यांद्वारे प्रसारित करा !

४. हिंदु राष्ट्राची स्थापना या विषयावर जाहीर व्याख्याने आणि परिसंवाद आयोजित करा !

५. हिंदूंनो, आठवड्याला केवळ १०० रुपये वाचवा आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या महान कार्यात योगदान द्या !

पू. संदीप आळशी
पू. संदीप आळशी

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले होते, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसंग्रामात स्वतःला समर्पित केलेल्या क्रांतीकारकांचे महत्त्व स्वातंत्र्यप्राप्तीच्या दृष्टीने जसे आहे, तसेच महत्त्व स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करणार्‍यांचेही आहे !

आज सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांचे हजारो साधक आणि कार्यकर्ते समर्पितभावाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी झटत आहेत. धर्मजागृती सभा, राज्यस्तरीय अधिवेशने, न्यायालयीन लढे, चळवळी, आंदोलने आदींच्या माध्यमातून हे कार्य चालू आहे. यासाठी प्रतिदिन सहस्रो रुपयांचा व्यय (खर्च) येत आहे. हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दृष्टीने त्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होणार्‍यांचे जसे महत्त्व आहे, तसेच महत्त्व त्या कार्याला आर्थिक हातभार लावणार्‍यांचेही आहे !

सध्याच्या काळात प्रतिदिन मोबाईलवर आवश्यकतेपेक्षा अधिक बोलणे; विशेष आवश्यकता नसतांनाही वेफर्स, चीप्स यांसारखे खाद्यपदार्थ विकत घेणे; उपाहारगृहात जाणे यांसारख्या कितीतरी गोष्टींवर पैसा अनाठायी व्यय होत आहेे. प्रत्येक कुटुंबात सरासरी ३-४ जण तरी असतात. प्रत्येक कुटुंबाने ठरवले, तर आठवड्याला सरासरी १०० रु. अगदी सहजपणे वाचवता येतील. त्यामुळे १ मासाला ४०० रु. आणि वर्षाला साधारण ५००० रुपयांपर्यंत पैसे वाचवता येतील. असे १०० कुटुंबांनी ठरवले, तर वर्षाला ५ लाख रुपये; १००० कुटुंबांनी ठरवले, तर वर्षाला ५० लाख रुपये आणि १०००० कुटुंबांनी ठरवले, तर वर्षाला ५ कोटी रुपये सहजपणे वाचवता येतील. असे भारतभरच्या हिंदूंनी ठरवले, तर या पैशातून उभारल्या जाणार्‍या कार्यातून आपण हिंदु राष्ट्र भारतातच नाही, तर सार्‍या जगात स्थापन करू शकू !

मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांच्या धर्मप्रसारासाठी आणि धर्मबांधवांसाठी लाखो रुपये व्यय करतात. मग हिंदूंनी हिंदु धर्मकार्यासाठी आणि हिंदु राष्ट्रासाठी का करायचे नाहीत ? ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात २५ टक्के भारतीय जनता प्राणाची पर्वा न करता देशासाठी लढली होती. आज हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी किमान धनाचे दान देण्याचे आपले दायित्व तरी पार पाडूया!

दान हे नेहमी सत्पात्रे दान असावे; कारण अशा दानाचा दान देणार्‍याला अधिक लाभ होतो. हिंदूंनो, सत्पात्रे दान करा आणि ईश्‍वरी कृपेस पात्र व्हा !!

– (पू.) श्री. संदीप आळशी (३.४.२०१४)

 

ईश्‍वराचा आशीर्वाद असल्याने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे उच्च ध्येय बाळगून त्याकडे मार्गक्रमण करणारे सनातनचे साधक !

राजकारणी सनातनचे साधक
१. जीवनाचे ध्येय अधिकाधिक सत्ता, तसेच धन प्राप्ती करणे इत्यादी ईश्‍वरप्राप्ती
२. वृत्ती प्रत्येक गोष्टींत स्वार्थ पहाणे अधिकाधिक त्याग करणे
३. स्वभावदोष अनेक अल्प
४. अहं तीव्र अल्प
५. साधना करत नाहीत करतात
६. प्रेम स्वार्थासाठी प्रीती हा स्वभाव झाल्यामुळे सर्वांवर प्रेम करतात
७. व्यक्तीतील त्रिगुणाचा स्तर तम-रज सत्त्व-रज
८. कार्याचा स्तर मानसिक आध्यात्मिक-मानसिक
९. आध्यात्मिक उन्नती अधोगती होणे उन्नती होणे
१०. कार्यातील व्यापकत्व स्वत:च्या कार्यकर्त्यांचे व्यावहारिक हित पहाण्याएवढेच अखिल मानवजातीचे सर्वांगीण कल्याण करण्याची तळमळ
११. ईश्‍वराचा आशीर्वाद न मिळणे मिळणे

 

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.४.२०१५)

 

हिंदु राष्ट्रात शासकीय योजना, वास्तू,रस्ते, पुरस्कार इत्यादी सर्वांना नावे देण्याची पद्धत !

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि संबंधित शक्ती एकत्र असतात. त्यामुळे व्यक्ती योग्य नसल्यास तिच्या नावामुळे वातावरणात रज-तमात्मक लहरी पसरतात. तसे होऊ नये; म्हणून हिंदु राष्ट्रात शासकीय योजना, वास्तू, रस्ते, पुरस्कार इत्यादी सर्वांना राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य केलेल्या रज-सत्त्व प्रधान व्यक्ती, तसेच सत्त्वगुण प्रक्षेपित करणारे संत, देवता इत्यादींची नावे असतील.

 

१. राष्ट्रपुरुषांची नावे असतील !

हिंदूंचे तेजस्वी राजे; उदा. छत्रपती शिवाजी महाराज; थोर राष्ट्रपुरुष, उदा. स्वातंत्र्यवीर सावरकर; क्रांतीवीर, उदा. आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, अशी राष्ट्रासाठी अमोल कार्य केलेल्यांची दिली जातील.

देशात आजही रस्त्यांना ‘अकबर रोड’, ‘औरंगजेब रोड’ इत्यादी परकीय आक्रमकांची नावे आहेत. हिंदु राष्ट्रात शासकीय योजना, वास्तू, रस्ते इत्यादी सर्वांना परकीय आक्रमकांची नावे नसतील !

२. हिंदु राष्ट्रात साहित्य अन् कला या क्षेत्रांत देण्यात येणार्‍या पुरस्कारांची नावे

 

आजकाल साहित्य अन् कला या क्षेत्रांत दिल्या जाणार्‍या पुरस्कारांना ती क्षेत्रे गेल्या शे-दीडशे वर्षांत ज्यांनी गाजवली, त्या मान्यवरांची नावे दिली जातात, उदा. नाट्यकलेसाठी बालगंधर्व पुरस्कार दिला जातो. हिंदु राष्ट्रात विविध कलांचे जनक असलेल्या देवता, त्या क्षेत्रांचे शास्त्र लिहिणारे ऋषी, तसेच त्या क्षेत्रात उत्तुंग कर्तृत्व गाजवलेले आणि सहस्रो वर्षे ज्यांची नावे जनमानसावर कोरली गेली आहेत, त्यांच्या नावे पुरस्कार दिले जातील.

अ. संगीत : श्री सरस्वतीदेवी, नारदमुनी, चित्रसेन गंधर्व, तसेच तानसेन, संगीततज्ञ बैजनाथ बावरा

आ. नृत्य : नटराज (शिव)

इ. नाटक : ‘नाट्यशास्त्र’ ग्रंथांचे कर्ते भरतमुनी, ‘नटसूत्रम्’चे रचनाकर्ते अष्टाध्यायीकार पाणिनी

ई. साहित्य : महाकवी कालिदास, भर्तृहरी, भास, भवभूति, माघ, भारवि, भामह आणि दंडिन

उ. चित्रकला : श्री गणपती तसेच राजा रवि वर्मा

ऊ. शिल्पकला : विश्वकर्मा

ए. युद्धकला : परशुराम, द्रोणाचार्य, अर्जुन, पहिले बाजीराव पेशवे (जागतिक युद्धशास्त्रात यांचे युद्धविषयक डावपेच प्रमाण मानले जातात. ते युद्धकलेतील वैशिष्ट्यपूर्ण डावपेचांच्या आधारे स्वतःच्या कारकीर्दीत एकही लढाई हरले नाहीत.)

ऐ. शरीरसौष्ठव : बजरंग बली (हनुमान), बलराम, भीमसेन

३. हिंदु राष्ट्रात विविध क्षेत्रांत दिल्या जाणार्‍या पुरस्कारांची नावे

अ. राजकारण (उत्तम संसदपटू) : श्रीकृष्ण, आर्य चाणक्य

आ. अर्थ : कुबेर

इ. आरोग्य : धन्वंतरी, चरक, सुश्रुत, च्यवन

ई. पत्रकारिता : लोकमान्य टिळक

उ. विज्ञान

उ १. वनस्पतीशास्त्र : जीवक

उ २. रसायनशास्त्र : नागार्जुन

उ ३. परमाणूशास्त्र : आचार्य कणाद

उ ४. खगोलशास्त्र : वराहमिहीर

उ ५. वैज्ञानिक संशोधन : भारद्वाज ऋषी

ऊ. गणित : भास्कराचार्य, आर्यभट्ट, श्रृंगेरीपिठाचे जगद्गुरु भारती कृष्णतीर्थ (वैदिक गणिताचे जनक)

ए. इतिहास संशोधन : पु.ना. ओक

ऐ. विद्वान : महात्मा विदूर, धर्मराज युधिष्ठीर

ओ. अध्यापन : द्रोणाचार्य, आर्य चाणक्य, दादोजी कोंडदेव

औ. विद्यार्थी : आरुणी, कल्याण

अं. समाजसेवा : त्या त्या भागातील संत

क. क्रीडा : अर्जुन

डॉ. आठवले (मार्गशीर्ष शु. ११, कलियुग वर्ष ५११३ (६.१२.२०११)

४. हिंदु राष्ट्रात सर्व स्तरांवर ‘अध्यात्म’ हाच पाया असल्याने रस्त्यावरील फलकही साधनेच्या दृष्टीने पूरक असतील !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

आपण बघतो की, रस्त्यांवर शासनाने विविध फलक लावलेले असतात, उदा. ‘अपघात टाळा !’, ‘अती घाई, संकटात नेई !’, ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक !’, ‘धूम्रपान, मद्यपान म्हणजे आयुष्याची धूळधाण !’, ‘दारू पिऊन गाडी चालवणे, म्हणजे अपघाताला निमंत्रण !’ इत्यादी. असे असूनही अपघात व्हायचे ते होतातच !

याउलट हिंदु राष्ट्रात रस्त्यावरील फलक हे आध्यात्मिक स्तरावरील असतील. यामध्ये साधनेचे थोडक्यात महत्त्व फलकावर लिहिले जाईल. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करा !’, असे लिहिले जाईल. तसेच घाटरस्त्याला आरंभ होण्यापूर्वी असलेल्या फलकावर ‘येथे २ मिनिटे थांबून देवाला प्रार्थना आणि नामजप करा !’, असे लिहिले जाईल. ‘देव चारचाकीत बसला आहे आणि आपण त्याचा चालक आहोत’, असा भाव ठेवा’, असे लिहिले जाईल. यामुळे गाडीच्या चालकाला देवाच्या अनुसंधानात रहाता येईल. चालक देवाच्या अनुसंधानात राहिला, तर देवच त्याची काळजी घेईल आणि अपघात होण्याचे प्रमाण बरेच अल्प होईल. तसेच अपघात होण्याचे कारण ‘अनिष्ट शक्ती’ हेही असते. देवाच्या अनुसंधानात राहिले, तर अनिष्ट शक्तींचा त्रास होण्याचे प्रमाणही अल्प होईल. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीतच हिंदु राष्ट्राचा पाया ‘साधना करणे’ हा असेल !’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१६.५.२०२३)

Leave a Comment