दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती ।

साधकांवर भरभरून प्रेम करून त्यांना आपल्या
कृपाशीर्वादाने कृतार्थ करणारे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

खरंच प.पू. दादाजी यांचे नाव काढले की, आपोआपच साधकांचे हात कृतज्ञतेने जोडले जातात. प.पू. दादाजी यांनी वेळोवेळी सनातनच्या विविध आश्रमांना भेट दिली आहे. त्या वेळी लक्षात आलेले प.पू. दादाजी यांच्याविषयीचे काही मधुर प्रसंग पुढे देत आहे.

प.पू. दादाजी
प.पू. दादाजी

 

प.पू. दादाजी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

सनातनवरील बंदी आणि प.पू. डॉक्टरांचा महामृत्यूयोग टळण्यासाठी, तसेच साधकांचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी विविध विधी, अनुष्ठाने करून साधकांवर कृपेचा वर्षाव करणारे, भक्तवत्सल योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या प्रती शब्दांत कृतज्ञता व्यक्त करणे अशक्यच आहे; मात्र त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने प.पू. दादाजी यांच्या कोमल चरणी ही शब्दसुमनांजली अर्पण करत आहोत. प.पू. दादाजींची कृपादृष्टी सनातन परिवारावर अशीच रहावी, अशी त्यांच्या चरणी कळकळीची प्रार्थना !

रामनाथी आश्रमातील भेटीच्या वेळी प.पू. दादाजी
यांच्याशी चर्चा करतांना प.पू.डॉ. आठवले (डावीकडे) (२३.५.२०११)

 

१. सनातन-साधक पुरोहित पाठशाळेतील विद्यार्थी भाग्यवान आहेत, असे प.पू. दादाजी यांनी सांगणे

मे २००९ मध्ये एकदा प.पू. दादाजी रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी सर्व साधकांसाठी त्यांचा दर्शन सोहळा होता. तेव्हा मी त्यांच्या दर्शनासाठी गेलो. त्यांच्या चरणांवर डोके ठेवले. त्या वेळी आमच्यात पुढीलप्रमाणे संभाषण झाले.
प.पू. दादाजी : काशीला जाणार का ?
मी : नाही.
प.पू. दादाजी : मग काय करणार ?
मी : इथेच रहाणार.
प.पू. दादाजी (त्यांच्या बाजूलाच बसलेल्या प.पू. डॉक्टरांकडे बोट करून) : यांच्या आशीर्वादाखाली रहाणार ना ?
मी : हो.
प.पू. डॉक्टर : ही मुलं पुढे साधक-पुरोहित, शिष्य-पुरोहित आणि संत पुरोहित या मार्गाने वाटचाल करतील.
प.पू. दादाजी : भाग्यवान आहेत ही मुलं !

प.पू. दादाजी यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर प.पू. डॉक्टरांनी दिले. मी बुद्धीने विचार करून काहीच सांगू शकलो नसतो.

 

२. प.पू. दादाजी यांनी पाठशाळेतील विद्यार्थ्यांना दिलेला आशीर्वाद !

सप्टेंबर २०१२ मध्ये प.पू. दादाजी यांनी पाठशाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची माहिती मागवली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी लक्ष्मीप्रसाद पाठवला आणि आम्हाला आशीर्वाद देतांना ते म्हणाले, या मुलांना पुढील आयुष्यात पैशाची कधीच चणचण भासणार नाही. आयुष्यात काहीही अल्प पडणार नाही.

 

३. प.पू. डॉक्टरांवरील महामृत्यूयोग
प.पू. दादाजींच्या संकल्पाने दूर होणार असूनही साधकांची
साधना व्हावी, यासाठी त्यांनी पाठशाळेतील विद्यार्थ्यांना नामजप करण्यास सांगणे

प.पू. डॉक्टरांवरील महामृत्यूयोगाचे संकट टळावे, सनातनवर आलेले बंदीचे संकट दूर व्हावे आणि सर्व साधकांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण व्हावे, यांसाठी प.पू. दादाजी यांनी पाठशाळेतील विद्यार्थ्यांना गेल्या ३ वर्षांपासून प्रतिदिन ७५ मि. जप करायला सांगितला आहे. या माध्यमातून ते आम्हा सर्वांकडून समष्टी साधना करवून घेत आहेत. आताच्या काळात परात्परगुरु मिळणे ही फार कठीण गोष्ट आहे. त्यात एका परात्परगुरूंनी (प.पू. दादाजी यांनी) दुसर्‍या परात्परगुरूंसाठी (प.पू. डॉक्टरांसाठी) सांगितलेला जप करण्याची संधी मिळणे, ही पुष्कळच दुर्मिळ गोष्ट आहे. खरेतर प.पू. डॉक्टरांवरील महामृत्यूयोग प.पू. दादाजींच्या केवळ संकल्पाने दूर होऊ शकतो; परंतु आम्हाला हा जप करण्याची संधी देऊन प.पू. दादाजी आमच्याकडून फार मोठी समष्टी सेवा करवून घेत आहेत.

प.पू. दादाजी, आपण करत असलेल्या या कृपेबद्दल आम्ही आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.

– श्री. सिद्धेश करंदीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

४. आपल्या गुरूंच्या संकल्पामुळे वस्तू आणि विधी
यांच्या माध्यमातून उपाय करणारे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू. (सौ.) योया वाले यांना मिळालेले ज्ञान

प.पू. डॉ. आठवले यांच्याकडे उपायांसाठी वस्तू सुपुर्द करतांना प.पू. दादाजी (डावीकडे) (२५.११.२००३)

६.२.२०१४ या दिवशी उपायांच्या वेळी माझ्या मनात योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्याविषयी विचार आला आणि त्यानंतर मला ईश्‍वराकडून प्रश्‍नोत्तर स्वरूपात पुढील ज्ञान मिळाले.

प्रश्‍न : प.पू. दादाजी यांनी आश्रमात विविध ठिकाणी पुरण्यासाठी निरनिराळ्या वस्तू देण्यामागील कारण काय ?
उत्तर

१. काळानुसार स्थुलातील उपायांची आवश्यकता असणे
आणि प.पू. दादाजी यांच्या संकल्पामुळे त्यांनी दिलेल्या वस्तूंच्या अस्तित्वाने उपाय होणे

सध्या कलियुग असल्यामुळे (आपत्काळ असल्याने) काळाला अनुसरून स्थुलातील उपायांची आवश्यकता आहे आणि प.पू. दादाजी यांच्या संकल्पामुळे त्यांनी दिलेल्या वस्तूंच्या अस्तित्वाने उपाय होतात. सत्ययुगातील वातावरण सात्त्विक असल्याने त्या वेळी उपायांची आवश्यकता नव्हती. प.पू. दादाजी ईश्‍वरी संकेतानुसार कार्य करत असल्याने त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व करणे आवश्यक आहे.

२. प.पू. दादाजी यांच्या गुरूंच्या संकल्पशक्तीमुळे त्यांनी
दिलेल्या वस्तू आणि केलेले विधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्ती आकृष्ट होणे

प.पू. दादाजी हे त्यांच्या परात्परगुरूंनी प.पू. डॉक्टरांना साहाय्य करण्यासाठी पाठवलेले एकमेव संत आहेत. अशा प्रकारची साधना करणारे अन्य कुणीही नाहीत. ईश्‍वराशी एकरूप झालेल्या गुरूंची संकल्पशक्ती प.पू. दादाजी यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांनी दिलेल्या वस्तू आणि त्यांनी केलेली पूजा अन् यज्ञ यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगुण – निर्गुण, प्रकट-अप्रकट शक्ती आकृष्ट होते.

– (पू.) सौ. योया वाले, युरोप (७.३.२०१४)

 

५. प.पू. दादाजी वैशंपायन यांची प.पू. डॉक्टर आणि सनातन संस्था यांवर असलेली अपार प्रीती !

श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाठवलेल्या पत्रातील सूत्रे पुढे देत आहे.

प.पू. दादाजी वैशंपायन यांचा सन्मान करतांना प.पू. डॉ. आठवले (१०.१२.२००८)

प्रती
पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांस,

१. वटहुकूम काढून जादुटोणा विरोधी विधेयक
राज्यात लागू केल्याचे प.पू. दादाजी वैशंपायन यांना कळवताच त्यांनी वकील
आणि न्यायाधीशयांची भेट घेऊन या कायद्याची संस्थेला झळ पोहोचू नये, यासाठी त्याविषयी जाणून घेणे

२४.८.२०१३ या दिवशी शनिवारी महाराष्ट्र शासनाने जादुटोणा विरोधी कायद्याच्या विधेयकाचा वटहुकुम काढून माननीय राज्यपालांची स्वाक्षरी घेऊन हा भयानक कायदा राज्याला लागू केला आहे, हा आपला निरोप मी प.पू. दादाजी यांना लगेचच कळवला. दुसरे दिवशी (२५.८.२०१३) सकाळी १० वाजता प.पू. दादाजी यांनी स्वतः संपर्क करून मला कळवले की, ते स्वत: सकाळी ठाणे येथील एक वकील आणि न्यायाधीश यांना जाऊन भेटून आले अन् या कायद्याविषयी त्यांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. या कायद्याचा सनातन संस्थेला काय त्रास होऊ शकतो ? त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी ? हेही त्यांनी जाणून घेतले आणि तो निरोप प.पू. डॉक्टरांना देण्यासाठी त्यांनी मला संपर्क केला.

२. उच्च पातळीचे संत असूनही या वयातील त्यांची ही तत्परता
आणि प.पू. डॉक्टर अन् सनातन संस्था यांवरील त्यांचे निरपेक्ष प्रेम पाहून कृतज्ञता व्यक्त होणे

एवढे उच्च पातळीचे संत असूनही असा कायदा येत आहे, हे कळल्यावर वयाच्या ९४ वर्षी आणि प्रकृती ठीक नसतांना प.पू. दादाजी त्वरित वकील आणि न्यायाधीश यांना भेटले. त्यांनी या कायद्यामुळे प.पू. डॉक्टर, सनातन संस्था आणि साधक यांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांच्याकडून कायद्याविषयी जाणून घेतले अन् आपल्याला धीर दिला. यावरून प.पू. डॉक्टर आणि साधक यांवर ते किती निरपेक्ष प्रेम करतात, हे लक्षात येऊन पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

आपला नम्र,
श्री. प्रशांत कुलकर्णी, कल्याण, ठाणे. (१८.९.२०१३)

 

६. प.पू. डॉक्टरांची प्रकृती ढासळणार असल्याचे प.पू. दादाजी वैशंपायन
यांना आधीच ज्ञात असणे आणि त्या संदर्भात त्यांचे अनुष्ठानही चालू असणे

आज प.पू. दादाजी वैशंपायन यांचा संध्याकाळी ६ वाजता दूरभाष आला होता. माझी प्रकृती आणखी ढासळत आहे, आता मूत्रपिंडाच्या विकाराचाही आरंभ झाला आहे. आता अधिक वेळ बसताही येत नाही, असे त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ते अपेक्षित होते. यासंदर्भात ते अनुष्ठानही करत आहेत.

– (प.पू.) डॉ. आठवले (३०.११.२०१३)

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment