जगद्विख्यात वास्तूतज्ञ डॉ. धुंडिराज पाठक यांचे सनातनच्या कार्याविषयी गौरवोद्गार !

उजवीकडील डॉ. धुंडिराज पाठक यांचा सत्कार करतांना श्री. हंसराज पटेल आणि अन्य मान्यवर

वडूज (जिल्हा सातारा) – लव्ह जिहाद, धर्मद्रोही जादूटोणाविरोधी कायदा यांच्या विरोधात आंदोलन उभारण्याचे आणि समाजजागृती करण्याचे अतिशय मोलाचे कार्य सनातन संस्था करत आहे. या धर्मद्रोहांच्या विरोधात प्रत्येकानेच त्याच्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. येथे उपस्थित असणार्‍या प्रत्येकाने हिंदू जनजागृती समितीचा लव्ह जिहाद हा ग्रंथ अवश्य घ्यावा. समिती आणि सनातन यांचे कार्य आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे, असे गौरवोद्गार जगद् विख्यात वास्तूतज्ञ डॉ. धुंडिराज पाठक यांनी काढले.

येथील वेद सामाजिक आणि शैक्षणिक विकास संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती चित्तरंजन खटावकर यांच्या पुढाकाराने डॉ. पाठक यांच्या लोलक विद्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा डॉ. पाठक बोलत होते. या वेळी सनातनचे श्री. हंसराज पटेल यांनी डॉ. पाठक यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातनचे ग्रंथप्रदर्शनही लावले होते. या वेळी वडूज परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

 संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment