अलंकारांची आवश्यकता आणि अनावश्यकता

अलंकार परिधान केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर लाभ होत असला, तरी काही स्थितींना अलंकारांची आवश्यकता भासत नाही. अलंकार कोणी परिधान करण्याची आवश्यकता नाही, याविषयीची माहिती या लेखातून करून घेऊया.

 

१. ५० टक्क्यांपेक्षा अधिक पातळीचे पुरुष आणि ६० टक्क्यांपेक्षा
अधिक पातळी असलेल्या स्त्रिया यांनी अलंकार घालणे आवश्यक नसणे

अ. ‘५० टक्क्यांपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळी असलेल्या जिवांना स्वतःतील चैतन्याच्या बळावर वाईट शक्तींचे आक्रमण परतवून लावता येत असल्याने त्यांना अलंकारांची आवश्यकता नसते.

आ. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळी असलेल्या जिवांना निर्गुणातील सात्त्विकता आणि चैतन्य ग्रहण करता येत असल्यामुळे त्यांना त्यासाठी स्थुलातील वस्तूंचे माध्यम वापरण्याची आवश्यकता नसते.’

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १४.१२.२००६, दुपारी १२.२०)

इ. जिवांमध्ये ‘भावनाप्रधानता’ हा स्वभावदोष निसर्गतःच असतो. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये या दोषाचे प्रमाण निसर्गतःच अधिक असते. जिवांच्या ‘भावनाप्रधानता’ या दोषामुळे वाईट शक्ती जिवांच्या मनोदेहावर आक्रमण करू शकतात; म्हणून जिवांना अलंकारासारख्या स्थुलातील वस्तूच्या माध्यमातून चैतन्य ग्रहण करणे आवश्यक असते. ५० टक्क्यांपेक्षा अधिक पातळीचे पुरुष आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळीच्या स्त्रिया यांच्यामध्ये ‘भावनाप्रधानता’ या दोषाचे प्रमाण अल्प असल्याने त्यांना अलंकार धारण करण्याची आवश्यकता रहात नाही.

तात्पर्य, केवळ ‘आध्यात्मिक पातळी’ या एकाच घटकाचा विचार करता ५० टक्क्यांपेक्षा अधिक पातळीचे पुरुष आणि स्त्रिया यांना अलंकार धारण करण्याची आवश्यकता नाही; परंतु ‘भावनाप्रधानता’ हा दोष मुळातच अधिक असल्यामुळे स्त्रियांनी मात्र आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अधिक होईपर्यंत अलंकार घालणे श्रेयस्कर ठरते.

२. ‘साधना’ हाच मानवाचा खरा अलंकार !

‘जिवाला जे ईश्वरनिर्मित धर्माचे आचरण करण्यास सांगितले, त्याचे तंतोतंत पालन करणे, म्हणजेच जिवाने त्याच्या प्रगतीस उपयुक्त अशी साधना करून या मनुष्यजन्माचे सार्थक करणे, हाच त्याच्या जीवनातील मोठा अलंकार असू शकतो.’ – एक अज्ञात शक्ती (श्री. विशाल पवार यांच्या माध्यमातून, ज्येष्ठ चतुर्थी, कलियुग वर्ष ५११०, (२१.६.२००८))

३. आध्यात्मिक पातळीनुसार जिवाने मायेतील अलंकार आणि ‘ब्रह्मालंकार’ धारण करणे यांचे प्रमाण

अध्यात्मिक पातळी (टक्के)

१. ‘मायेतील अलंकार (टक्के) ४५ ५५ ६० ७०
२. ब्रह्म-अलंकार

अ. प्रमाण (टक्के)

६० ४० ३० ९०
एकूण १०० १०० १०० १००
आ. स्वरूप जिज्ञासा शरणागती आज्ञापालन वैराग्य’

टीप १ – येथे दिलेले स्वरूप हे जिवाच्या ब्रह्मालंकारातील, म्हणजे जिवाच्या साधनेतील अलंकार आहे.

– एक अज्ञात शक्ती (श्री. विशाल पवार यांच्या माध्यमातून, आषाढ शुद्ध एकादशी, कलियुग वर्ष ५११० (१३.७.२००८), दुपारी २ ते २.३०)

थोडक्यात साधनेमुळे आध्यात्मिक पातळी जसजशी वाढत जाईल, तसतशी मायेतील (स्थुलातील) अलंकार घालण्याची आसक्ती उणावत जाऊन प्रत्यक्षात अलंकार घालण्याचे प्रमाण कसे घटते, हे वरील सारणीवरून लक्षात येते.

 

४. साधना करतांना सूक्ष्मातून आनंद मिळत
असतांना स्थुलातून अलंकार परिधान करण्याची इच्छा न उरणे

‘माझ्या मुलीने मला न सांगताच माझ्यासाठी सोनाराला कर्णफुले करण्यास सांगितली. नंतर तिने मला सांगितले, ‘‘तू कर्णफुलांवरील वेलवीणची (नक्षीची) निवड करून ये.’’ मी म्हटले, ‘‘आता मला सुवर्णाचीच काय, कशाचीच इच्छा उरली नाही. कशासाठी हा खटाटोप करतेस ?’’ त्यावर ती काहीच बोलली नाही. ती गेल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘गुरूंनी माझ्या अपवित्र देहाला पवित्र करून तो अनेक अलंकारांनी मढवलेला आहे.

अ. डोक्यावर त्यागाचा मुकुट चढवला आहे.

आ. केसांत सद्विचार आणि प्रीती यांचा गजरा माळला आहे.

इ. कानांत ब्रह्मज्ञानाची कर्णफुले घातली आहेत.

ई. नाकात हिंदु धर्माची नथ घातली आहे.

उ. गळ्यात नामाची बोरमाळ घातली आहे.

ऊ. जिभेवर सरस्वतीला स्थान देऊन वाणीचे सौंदर्य वाढवले आहे.

ए. दंडावर क्षात्रबळाचा बाहूबंद घातला आहे. हातात सत्सेवेच्या बांगड्या घातल्या आहेत.

ऐ. पायांत नाद आणि मर्यादा यांचे पैंजण घातले आहेत.

ओ. गुरुकृपेचा भरजरी शालू नेसवून सर्वच अवयव सुशोभित केले आहेत; म्हणूनच अंतःकरणातून निघणारा ईश्वरी कृपेचा सुवर्णप्रकाश माझ्या नेत्रांतून बाहेर पडून इतरांनाही साधनेस प्रवृत्त करत आहे.’ त्यानंतर ‘मला अलंकारांची इच्छा का उरली नाही’, याचे कारण लक्षात आले.’

– सौ. शकुंतला बद्दी, मुंबई.

 

५. भाव असल्यास अलंकारांची आवश्यकता नसणे

‘जिवात भाव असेल, तर देवतेचे चैतन्य ग्रहण करण्यासाठी त्याला अलंकारांची आवश्यकता भासत नाही. अन्यथा भावविरहित अवस्थेत जिवाला अलंकार धारण केल्याने लाभ मिळतोच.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २७.१२.२००७, दुपारी २.४९)

 

 

६. उन्नतांनी अलंकार धारण करण्याची अनावश्यकता

अ. ईश्वरी चैतन्याचा स्त्रोत असलेल्या उन्नतांना अलंकाररूपी
बाह्य गोष्टींच्या माध्यमातून चैतन्य ग्रहण करण्याची आवश्यकता न भासणे

‘उन्नतांच्या शरिरातील सर्व पोकळ्या (भेद) ईश्वरी चैतन्याने भरून त्यांचे घनीकरण (अभेद) होते. उन्नत सतत ईश्वराच्या अनुसंधानात असल्यामुळे ईश्वरी चैतन्याचा स्त्रोत त्यांच्या आतून चालू असतो. त्यामुळे त्यांना बाह्य गोष्टींनी ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्याची आवश्यकता भासत नाही.’

– एक अज्ञात शक्ती (सौ. रंजना गडेकर यांच्या माध्यमातून, १९.३.२००८, रात्री १२.३०)

 

आ. स्वतःकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा समष्टीला लाभ व्हावा, यासाठी उन्नतांनी अलंकार घालणे शक्यतो टाळावे

‘उन्नत, संत किंवा गुरु यांच्याकडून सतत ईश्वरी चैतन्याचे प्रक्षेपण होत असते. उन्नतांनी अलंकार घातल्यामुळे अलंकारांतील जडत्वामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याची गती मंदावते. तसेच अलंकारांतील मर्यादित आकर्षणामुळे उन्नतांच्या देहाभोवती चैतन्याचे घनीकरण होते; म्हणून शक्यतो उन्नतांनी अलंकार घालणे टाळावे. या स्तरावर उन्नत स्वतःच्या इच्छेपेक्षा एखादा भक्त किंवा अन्य संत यांच्या इच्छेने, म्हणजेच परेच्छेने अलंकार घालतात.’

– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १७.६.२००७, सायं. ७.०९)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अलंकारशास्त्र’

Leave a Comment