लहान मुलांचे अलंकार

Article also available in :

पुरुष आणि महिला यांनी घालावयाच्या अलंकारांचे महत्त्व आपण यापूर्वीच्या लेखातूनजाणून घेतले. लहान मुलांना अलंकार घालण्याचे महत्त्व या लेखातून जाणून घेऊया.

 

१. लहान मुलांची कर्मेंद्रिये अकार्यक्षम असल्याने
त्यांच्यावर सूक्ष्मातून होत असलेली आक्रमणे परतवण्यासाठी आणि
त्यांच्याभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी त्यांना डूल अन् कडी घालण्यात येणे

‘बाळ जन्माला आल्यावर त्याची सूक्ष्म-ज्ञानेंद्रिये काही प्रमाणात कार्यरत असतात; पण कर्मेंद्रिये मात्र अकार्यरत अवस्थेतच असतात. बाळाचे वय वाढत असतांना त्याची सूक्ष्म-कर्मेंद्रिये जागृत होण्यास आरंभ होतो. चांगली आध्याति्मक पातळी असलेल्या एखाद्या बाळाला लहानपणीच आध्याति्मक वातावरण मिळाल्यावर त्याची सूक्ष्म-कर्मेंद्रिये लवकर जागृत होण्याची शक्यता असते. लहान मुलांची कर्मेंद्रिये अकार्यक्षम असल्याने त्यांच्यावर सूक्ष्मातून होत असलेली आक्रमणे थांबावीत, तसेच ईश्वरी चैतन्याचे संरक्षककवच त्यांच्याभोवती निर्माण व्हावे; म्हणून लहान बाळाला डूल, कडी आदी घालण्यात येते. पुढे बाळाचा विकास होऊन त्याच्या सूक्ष्म-कर्मेंद्रियांचा विकास झाल्यावर पुरुषांना सर्व अलंकार घालणे आवश्यक नसते.’

– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १७.६.२००७, रात्री ८.४१)

 

२. लहान मुलांचे वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी
त्यांच्या गळ्यात तेजरूपी मारकत्वाचे प्रतीक असलेली वाघनखे घालणे

‘वाघनख’ हे तेजरूपी मारकत्वाचे प्रतीक आहे. लहान मुलांमध्ये संस्कारांचे प्रमाण अल्प असल्याने त्यांच्या देहाची वायूमंडलातून सूक्ष्म लहरी ग्रहण करण्याची क्षमताही मोठ्या व्यक्तींपेक्षा जास्त असते. तसेच लहान मुले स्वतः साधना करण्यासही असमर्थ असतात. लहान मुलांच्या अतीसंवेदनशीलतेमुळे त्यांना मोठ्यांपेक्षा वायूमंडलातील वाईट शक्तींचा त्रास त्वरित होण्याची शक्यता जास्त असल्याने त्यांचे रक्षण होण्यासाठी तेजरूपी मारक लहरींचे प्रक्षेपण करणारी वाघनखे त्यांच्या गळ्यात बांधली जातात. या नखांमुळे त्यांच्या भोवती तेजरूपी संरक्षक वायूमंडल बनते. त्यामुळे ती मुले वातावरणातील वाईट शक्तींच्या संचाररूपी धोक्यापासून मुक्त राहू शकतात.’

– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २७.१२.२००७, दुपारी २.२१)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अलंकारशास्त्र’

Leave a Comment