आनंदमय जीवनासाठी दोषनिर्मूलन आणि गुणसंवर्धन करणे आवश्यक ! – सौ. मधुलिका गोयल, सनातन संस्था

आपण कोणत्याही परिस्थितीकडे कसे पहातो ?, हे आपले गुण आणि दोष यांवर अवलंबून आहे. त्यामुळे दोषनिर्मूलनासह गुणसंवर्धन करण्याचा प्रयत्न केल्यास आपण निश्चितपणे आनंदमय जीवन जगू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. मधुलिका गोयल यांनी केले.

ईरोड (तमिळनाडू) येथे कावेरी नदीच्या काठी असलेल्या मंदिर परिसरात अतिरुद्र महायाग !

तमिळनाडू राज्यातील कावेरी नदीच्या काठी असलेल्या ईरोड शहरात २१ एप्रिलपासून अतिरुद्र महायागाला प्रारंभ झाला असून हा याग १ मे पर्यंत चालणार आहे. कावेरी नदीच्या काठी श्रीसुंदरांबिका आणि त्याच्या बाजूला श्री चोळीश्वर मंदिर आहे. या मंदिर परिसरात अतिरुद्र महायाग चालू आहे.

सत्संग २४ : अ-१, अ-२ आणि अ-३ स्वयंसूचना पद्धतींचा अभ्यास

आजच्या सत्संगात तुम्हाला काही प्रसंग सांगितले जातील, त्या प्रसंगांचा अभ्यास करून तुम्हाला स्वयंसूचना बनवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्या त्या प्रसंगांच्या योग्य सूचनाही तुम्हाला नंतर सांगण्यात येतील.

सत्संग २३ : अ-३ स्वयंसूचना पद्धत

गेल्या आठवड्यात आपण अ-१ आणि अ-२ या स्वयंसूचना पद्धतींचा तूलनात्मक अभ्यास केला. आजच्या सत्संगामध्ये आपण न्यूनंगड, भीती यांवर मात करण्यासाठी अ-३ पद्धतीने स्वयंसूचना कशा द्यायच्या ?, याविषयी जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण साधनेचा प्रायोगिक अभ्यास घेऊया.

अक्षय तृतीया (Akshay Tritiya 2024)

साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया या सणाचे महत्त्व तसेच या दिवशी करण्यात येणार्‍या तिलतर्पण, उदककुंभदान, मृत्तिका पूजन यांचे शास्त्रासह महत्त्व जाणून घेऊया.

सत्संग २२ : अ-१ आणि अ-२ स्वयंसूचना पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास

आपल्याकडून होणार्‍या अयोग्य कृती, मनातील अयोग्य विचार किंवा भावना यांच्या संदर्भात अ-१ पद्धतीने स्वयंसूचना देतात, तर कमी कालावधीसाठी म्हणजे १ – २ मिनिटांसाठी मनात उमटणार्‍या प्रतिक्रियांसाठी अ-२ पद्धतीने स्वयंसूचना देतात.

कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !

कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने २३ एप्रिल या दिवशी प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. प्रवचन झाल्यावर उपस्थित जिज्ञासूंनी दत्ताच्या नामजपाविषयी सविस्तर जाणून घेतले.

‘गुरु’ ग्रहाच्या पालटाचे वृषभ राशीवर होणारे परिणाम

‘गुरु ग्रह एका राशीत साधारण १३ मास रहातो. या १३ मासांच्या मध्यावर असलेल्या २ मासांमध्ये गुरु ग्रहाचे अधिक परिणामकारक फळ मिळते. १.५.२०२४ या दिवशी गुरु हा ग्रह ‘वृषभ’ राशीत, तर १४.५.२०२५ या दिवशी तो ‘मिथुन’ राशीत प्रवेश करेल.

सनातन संस्थेचे कार्य हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे ! – श्री. दादा वेदक, अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख, विश्‍व हिंदु परिषद

सनातन संस्थेचे कार्य हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे. हिंदु, हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र यांना पुन:प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे, तसेच पुनश्‍च प्राणप्रीय भारतमातेला जगाच्या कल्याणासाठी जगाच्या गुरुस्थानावर पुनर्स्थापित करण्याचे हे कार्य आहे, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख श्री. महेंद्र उपाख्य दादा वेदक यांनी व्यक्त केले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सामवेदी कार्तिक जोशी यांच्याकडून ‘सामगान’

सनातन संस्था ही एकमात्र अशी संस्था आहे, जिच्याविषयी माझ्या मनात श्रद्धा, प्रेम, आनंद आणि अभिमान आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे कार्य वैदिक, पुरोहित आणि ब्राह्मण यांच्यासह सनातन संस्थाही करत आहे, असे कौतुकोद्गार सामवेदी कार्तिक जोशी यांनी काढले.