प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात्मक स्मृती (भाग २) !

Article also available in :

गुरुमाऊली तू करी कृपादृष्टी ।
तवविण शून्य ही सारी सृष्टी ॥

प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु श्री अनंतानंद साईश
प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुका

मध्यप्रदेशातील श्रीक्षेत्र उज्जैनच्या उत्तरेला ५५ किलोमीटरवर असलेल्या मंदसोर जिल्ह्यातील मनासा हे तालुक्याचे ठिकाण ! ७ जुलै १९२० या दिवशी श्री. सखाराम आणि सौ. अन्नपूर्णाबाई कसरेकर या दाम्पत्याला पुत्रप्राप्ती झाली. मुलाचे नाव दिनकर असे ठेवण्यात आले.

लहानपणीचा हा दिनकर म्हणजेच इंदूर येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) ! शिष्यावस्थेत प.पू. बाबांनी त्यांचे गुरु श्री अनंतानंद साईश यांची दिवसरात्र सेवा केली. प.पू. बाबांना जेमतेम एक वर्ष दहा मास एवढाच गुरूंचा सहवास लाभला. या काळात गुरूंनी त्यांची शिष्यापासून गुरुपदापर्यंत प्रगती करून घेतली. श्रीगुरूंनीच प.पू. बाबांचे भक्तराज असे नामकरण केले. भजन, भ्रमण आणि भंडारा या त्रिसूत्रीनुसार प.पू. बाबांनी पुढे जीवनभर भक्तांच्या उद्धारासाठी आपले जीवन व्यतीत केले.

सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प.पू. भक्तराज महाराज हे गुरु होत. त्यांच्याच कृपाशीर्वादाने सनातनची स्थापना झाली. सनातनला प.पू. बाबांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांचेही कृपाछत्र लाभले. त्यांच्या आशीर्वादाने वर्ष १९९१ मध्ये स्थापन झालेल्या सनातनच्या कार्याचा आज वटवृक्ष झाला आहे. सनातन परिवार प.पू. बाबांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे !

इंदूरच्या भक्तवात्सल्याश्रमातील ध्यानमंदिर !

येथे श्री अनंतानंद साईश आणि प.पू. बाबा यांच्या मूर्ती, त्या दोघांच्या अन् प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुका ठेवल्या आहेत. तसेच श्री अनंतानंद साईश यांनी वापरलेली खुर्ची मध्यभागी ठेवली आहे. त्यांचे भावपूर्ण दर्शन घेऊन जीवन कृतार्थ करूया !

प.पू. भक्तराज महाराज यांची कांदळी (पुणे) येथील आश्रमात असलेली समाधी

कांदळी येथील प.पू. बाबा यांच्या मूळ घरातील त्यांचे वास्तव्य असलेली ही खोली ! छायाचित्रात शिष्यावस्थेतील प.पू. बाबा आणि त्यांचे गुरु श्री अनंतानंद साईश

 

कांदळी, पुणे येथील प.पू. बाबांचे शेत. प.पू. बाबा शेतापलीकडील शिवपिंडीच्या रूपातील (आयताकृतीत दाखवल्याप्रमाणे) या डोंगराचे प्रतिदिन दर्शन घेत.

 

भजनानंदी प.पू. बाबांचे खंजिरी हे आवडते वाद्य ! अनेक भजनांमध्ये त्यांनी वाजवलेली हीच ती खंजिरी ! इंदूरच्या भक्तवात्सल्याश्रमात तिचे भावपूर्ण जतन केले आहे.

 

प.पू. बाबांच्या स्पर्शाने पावन झालेल्या त्यांच्या नित्य वापरातील वस्तूंचे दर्शन घेऊन त्यांतील सात्त्विकता ग्रहण करूया !

 

प.पू. बाबा या गाडीतून अनेक ठिकाणी भ्रमण करत. त्यांच्या सहवासाने पुनित झालेल्या या गाडीचे भावपूर्ण दर्शन घेऊया.

 

भक्तवत्सल आणि जीवनोद्धारक प.पू. बाबांचा चरणस्पर्श झालेली ही परमपवित्र पादत्राणे

Leave a Comment