भगवान शिव
एखाद्या देवतेसंबंधी अध्यात्मशास्त्रीय ज्ञान कळले, तर त्या देवतेविषयी आपली श्रद्धा अधिक वाढायला साहाय्य होते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि ती अधिक फलदायी होते. या दृष्टीने या सदरात भस्म, रुद्राक्ष इत्यादी शिवाच्या वैशिष्ट्यांचा आध्यात्मिक अर्थ; रुद्र, नटराज आदी रूपे; ज्योतिर्लिंगे आदींचे तात्त्विक विवेचन; शृंगदर्शनाचा लाभ, खर्या अन् खोट्या रुद्राक्षांतील भेद, शिवपूजेसंबंधी विधीनिषेध; प्रदोष, महाशिवरात्री, शिवामूठ आदी व्रतांचे सूक्ष्म-चित्रे; तसेच शिवतत्त्वासंबंधी सात्त्विक रांगोळ्या येथे दिल्या आहेत. त्याचप्रमाणे शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ? शिवाला हळद-कुंकू का वाहू नये ? यांसारख्या सूत्रांची कारणमीमांसा येथे दिली आहे.