शिवाची मानसपूजा

शिव Shiv

शिव

‘देवतेच्या प्रती श्रद्धायुक्त अंतःकरणाने विधीवत् केलेल्या उपचारांचे समर्पण म्हणजे पूजा’, अशी व्याख्या ‘श्रीमद्‌भागवत’ या ग्रंथात केली आहे. देवतेच्या प्रतिमेला उपचारांचे विधीवत् समर्पण करणे, ही कर्मकांडांतर्गत स्थुलातील पूजा ! साधनेच्या दृष्टीकोनातून स्थुलातील पूजा करणे हा पहिला टप्पा असून त्यानंतर मनाच्या स्तरावरील उपासनेस आरंभ होतो. या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचे सोपे साधन म्हणजे मानसपूजा !

मानसपूजेचे लाभ

मानसपूजेमध्ये आपल्या मनात उमटलेल्या देवतेच्या रूपाची पूजा आपल्याला करता येते. या पूजेचा एक लाभ म्हणजे स्थळ, उपकरणे, शुचिता इत्यादी कर्मकांडांतर्गत बंधने तिला नसल्याने कोणत्याही ठिकाणी ती करता येते. दुसरा लाभ म्हणजे मानसपूजेद्वारे अखिल ब्रह्मांडातील कोणतीही उत्तमातली उत्तम वस्तूही देवतेला अर्पण करता येते. याहूनही श्रेष्ठ असा तिसरा लाभ म्हणजे जेवढा वेळ मानसपूजा चालू असेल, तेवढा वेळ आपल्याला देवतेच्या अनुसंधानात रहाता येते. साधकाला साधनेमध्ये भावजागृती होण्यास या मानसपूजेचे पुष्कळ साहाय्य होते.

आद्य शंकराचार्य यांनी केलेली शिवमानसपूजा !

‘ही मानसपूजा ऐकून देवतेची मानसपूजा करणे आणि तिच्या अनुसंधानात रहाणे, याची आपल्यालाही प्रेरणा मिळो’, अशी शिवाच्या चरणी प्रार्थना आहे.

रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं

नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनम् ।

जातीचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा

दीपं देव दयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् ।। १ ।।

सौवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं

भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम् ।

शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं

ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु ।। २ ।।

छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलम्

वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा ।

साष्टाङ्गं प्रणतिः स्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया

सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो ।। ३ ।।

आत्मा त्वं गिरिजा मतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहं

पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः ।

सञ्चारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो

यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् ।। ४ ।।

करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा

श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् ।

विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व

जय जय करुणाब्धे श्रीमहादेवशम्भो ।। ५ ।।

।। इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचिता शिवमानसपूजा समाप्त ।।

शिवाचा नामजप ऐकण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !

शिवाची आरती ऐकण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !

Leave a Comment