शिवाचा परिवार, शिवलोक आणि निवास

या लेखात शिवाचा परिवार, शिवलोक आणि निवास यांविषयी पाहूया. शिवाच्या परिवारात पत्‍नी पार्वती, पुत्र कार्तिकेय आणि श्री गणपति, तसेच शिवगण, शिवाचे वाहन नंदी आदींचा समावेश आहे.

शिवाचा परिवार
शिवाचा परिवार

१. परिवार

१ अ. पत्नी : पार्वती

(पार्वती आणि तिची रूपे यांविषयीचे विवेचन सनातन-निर्मित ग्रंथ ‘शक्‍ती’ यात दिले आहे.)

१ आ. पुत्र

१. कार्तिकेय
कार्तिकेय
कार्तिकेय
‘हा शिव-पार्वतीचा पुत्र. सहा कृतिकांनी (कृतिका म्हणजे देवतांचा एक प्रकार) त्याचा प्रतीपाळ केला; म्हणून त्याला कार्तिकेय असे नाव पडले. कार्तिकेयाची कथा अशी आहे – तारकासुराला मारल्यानंतर कार्तिकेयाची मोठी कीर्ती झाली. त्यामुळे पार्वती त्याचे लाड करू लागली. त्या लाडांनी तो बिघडला देवस्त्रियांवर हात टाकू लागला. देव पार्वतीकडे गार्‍हाणे (तक्रार) घेऊन गेले. पुत्राचा उच्छृंखलपणा नष्ट व्हावा म्हणून पार्वती त्याला प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी आपले रूप दाखवू लागली त्या साक्षात्कारामुळे कार्तिकेयाला पश्‍चात्ताप झाला आणि ‘आजपासून जगातल्या प्रत्येक स्त्रिला मातेसमान मानीन’, अशी त्याने शपथ घेतली. ‘आपल्या दर्शनास येणार्‍या स्त्रियांना सात जन्म वैधव्य येईल’, असा शाप कार्तिकेयाने स्त्रीजातीला दिल्याची कथा शिवलीलामृतात आहे; परंतु या गोष्टीला पुराणांत आधार नाही. महाराष्ट्रात कार्तिकेय ब्रह्मचारी आहे, तर दक्षिण भारतात तो दोन स्त्रियांचा पती आहे. बंगालमध्ये कार्तिकमासात कार्तिकेयाची क्षणिका (मातीची मूर्ती) करून स्त्रिया पुत्रलाभासाठी त्याची पूजा करतात.’ याच्या हातात दंड नाही, मयूरपंख आहे.
२. श्री गणपति

 

श्री गणपति Ganpati
श्री गणपति

याचे ज्ञान (माहिती) सनातनची ग्रंथमालिका ‘श्री गणपति’ यात दिले आहे. ती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

३. इतर

मुरुगन, श्‍वास्ता, शास्ता, स्कंद, अटवी, अटवीश्‍वर, अवलोकितेश्‍वर, अवलोकी, कोटपुत्र इत्यादी बरेच बालदेव नंतर शिवाशी एकरूप झाले.

१ इ. शिवगण

शिवलोकात शिवाचे गण आहेत. गण म्हणजे सेवक. हे सर्व महायोनी आणि पवित्रके यांवर नियंत्रण ठेवतात. भूतमात्रांचा पावित्र्याशी संबंध आला, तर ते कर्मगतीपासून वाचून शिवलोकात शिवगण होऊन मोद नावाचा आनंद घेऊ शकतात. शिवगणांचे पुढील प्रकार आहेत.

१. उग्रगण : हे शंकराच्या उग्रेश्‍वर रूपाची साधना करतात.

२. रुद्रगण : रुद्र म्हणजे रडका. देवाने दर्शन द्यावे; म्हणून तळमळून रडणारे.

३. भूतगण आणि पिशाचगण

या तीन गणांतील प्रत्येकाची कार्ये आणि साधनाही निरनिराळी असते. काही गण यमलोकातून शिवाकडे येतात, तर काही नंदीच्या माध्यमातून त्याच्याकडे पोहोचतात. प्रत्येक शिवगणाचा रंग आणि अवयव निरनिराळे आहेत. नंदी, शृंगी, भृगिरिटी, शैल, गोकर्ण, घंटाकर्ण, वीरभद्र आणि महाविकट हे प्रमुख आठ शिवगण मानले जातात.

१ इ १. नंदी

नन्दः = आनंदस्वरूप. नंदी म्हणजे आनंदी. नंदी हा एक प्रमुख शिवगण असून याला नंदीश, नंदीश्‍वर, नंदीकेश्‍वर अशी अनेक नावे आहेत. येथे गण असलेल्या नंदीचे विवेचन दिले आहे. सूत्र ‘१ उ’ मध्ये वाहन असलेल्या नंदीचे विवेचन दिले आहे. पुढे दोन निरनिराळ्या विचारसरणींनुसार नंदीचे विवेचन दिले आहे.

अ. ‘शीलाद नावाच्या मुनींनी सर्वज्ञ पुत्र व्हावा म्हणून तप करून शंकराला प्रसन्न करून घेतले. शंकर म्हणाला, ‘`माझ्यावाचून अन्य कोणी सर्वज्ञ असणे संभवनीय नाही; म्हणून मीच माझ्या अंशाने तुझा पुत्र होईन; परंतु तो सोळा वर्षांचा होताच मरण पावेल.’’ काही दिवसांनी शीलादला पुत्र झाला. त्याचे नाव नंदी असे ठेवले. नंदीने शंकराची आराधना केली. सोळा वर्षांची आयुष्यमर्यादा संपताच सरोवराच्या काठी शिविंलगार्पण करणार्‍या नंदीला यमाने पाशबद्ध केले. त्याच क्षणी साक्षात शंकर प्रगट झाला आणि त्याने नंदीच्या मृत्यूचे निवारण करून त्याला आपला अनुचर केले.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

आ. ‘नंदीने वयाच्या आठव्या-नवव्या वर्षीच कठोर तप करून शिवाचे सान्निध्य प्राप्त केले. शिवाने त्याला पुत्रवत मानले आणि त्याला आपल्या गणांचा प्रमुख नेमले. पुढे त्याचे सुयशा नामक मरुत्कन्येशी लग्न झाले. शैव लोक पारमार्थिकदृष्ट्या नंदी हे आनंदतत्त्वाचे प्रतीक मानतात. शिवाच्या तांडवनृत्याच्या प्रसंगी ताल धरण्यासाठी नंदी उपस्थित असतो. दक्षिणेतील नंदीशमूर्ती सामान्यतः शिवालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या अथवा उजव्या अंगाला (बाजूला) असते.’

१ ई. शिवदूत

‘हे बुटके, स्थूल आणि तांबड्या (लाल) वर्णाचे असतात. त्यांच्या मुखातून दोन सुळे बाहेर आलेले असतात. त्यांना चार हात असून त्यांत पाश, सर्प, त्रिशूळ आणि महापात्र या वस्तू असतात. शिवभक्‍त मरण पावल्यावर त्यांच्या आत्म्यांना पुष्पक विमानातून कैलासावर नेणे, हे त्यांचे कार्य असते.’

१ उ. वाहन (नंदी)

वृषभ रूपातील नंदी हे शिवाचे वाहन असून त्याला शिवपरिवारात महत्त्वाचे स्थान दिले आहे. शिवाचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घेतले जाते.

नंदी
नंदी
१ उ १. नंदीची वैशिष्ट्ये

अ. `सायणाचार्यांनी वृषभ या शब्दाचे व्युत्पादन वृष् धातूपासून केले असून त्याचा अर्थ वर्षिता (वर्षाव करणारा) असा दिला आहे. वृष् धातूपासून बनलेल्या वृषभ या शब्दाचा दुसरा अर्थ अत्यधिक प्रजननशक्‍तीने युक्‍त असा आहे.’ म्हणूनच नंदी हा विकसित पौरुषाचे लक्षण मानला गेला आहे.

आ. ज्याप्रमाणे धर्मशास्त्राचा प्रणेता मनु आणि अर्थशास्त्राचा बृहस्पति आहे, त्याप्रमाणे कामशास्त्राचा प्रणेता नंदी आहे.

१ उ २. नंदीच्या मूर्तीचा भावार्थ

अ. नंदीचे पुढचे दोन पाय म्हणजे सत्य आणि तप. नंदीचे मागील दोन पाय म्हणजे दया आणि दान.

आ. नंदी तीन पाय दुमडलेला आणि एक पाय उभा असलेला असा असतो. कलियुगात धर्म एक चतुर्थांश राहिला असल्याचे ते द्योतक आहे.

१ उ ३. शृंगदर्शन (नंदीच्या शिंगांमधून शिवलिंग पहाणे)

याविषयीच्या अधिक विवेचनासाठी येथे क्लिक करा.

१ ऊ. काही शिवरूपे आणि परिवार यांची तुलना

टीप १ – शिवगणांचा अधिपती; वाहन असलेला नंदी नव्हे.

– संकलक (प.पू.) डॉ. जयंत आठवले

२. शिवलोक आणि निवास

२ अ. शिवलोक

ज्यांना ज्यांना आपल्या जीवनात पावित्र्य आणता येते, ते सर्व शिवलोकात जातात. शांती, पावित्र्य आणि उन्नतपणा हे ज्या ठिकाणी असतात, तो लोक म्हणजे शिवलोक.

२ आ. निवास

१. कैलास : तप केल्याने उष्णता वाढते. ती न्यून करण्यासाठी शिव कैलास (के + लास) पर्वतावर वास्तव्य करतो. कैलास म्हणजे जेथे बर्फाचा आकार केळ्यांच्या घडासारखा आहे, असे स्थान.

२. स्मशान

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘शिव भाग १’

Leave a Comment