राखीपौर्णिमेला बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातनचे ग्रंथ देऊन अनोखी ओवाळणी द्या !

राखीपौर्णिमेच्या दिनी आपल्या बहिणीला कपडे, दागिने आदी अशाश्वत भेटवस्तू देण्याऐवजी चिरंतन ज्ञानाचा प्रसार करणा-या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथ भेट देता येतील. सध्याच्या काळानुसार ही भेट देणे अधिक सयुक्तिक ठरेल.

प्रेमभाव, स्थिरता आणि देवावर दृढ श्रद्धा असणार्‍या पुणे येथील श्रीमती मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) सनातनच्या १२० व्या संतपदावर विराजमान !

प्रेमभाव, स्थिरता आणि देवावर दृढ श्रद्धा असणा-या पुणे येथील श्रीमती मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) या सनातनच्या १२० व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झाल्याची आनंदवार्ता सद्गुरु स्वाती खाडये यांनी ४ ऑगस्ट या दिवशी दिली.

प्रियांका गोस्वामी यांनी पदकाचे श्रेय दिले भगवान श्रीकृष्णाला !

बर्मिंघम (ब्रिटन) येथे चालू असलेल्या ‘राष्ट्रकुल स्पर्धे’मध्ये भारतीय धावपटू प्रियांका गोस्वामी यांनी १० सहस्र मीटर शर्यतीमध्ये रौप्य पदक मिळवले. प्रियांका गोस्वामी यांनी, ‘मी माझ्या यशाचे श्रेय भगवान श्रीकृष्ण आणि माझे कुटुंब यांना देत आहे. त्यांच्याखेरीज मी हे यश प्राप्त करू शकले नसते’, असे म्हटले आहे.

सनातनच्या आश्रमांत सोलापुरी चादरी, प्लेन (नक्षी नसलेल्या) बेडशीट्स आणि टर्किश टॉवेल्स यांची आवश्यकता !

‘संपूर्ण विश्वात अध्यात्मप्रसाराचे आणि मानवजातीच्या उद्धाराचे अविरत कार्य करणार्‍या सनातन संस्थेच्या कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये पूर्णवेळ साधक, हितचिंतक, वाचक, पाहुणे आणि हिंदुत्वनिष्ठ वास्तव्याला येतात अन् आश्रमातील रामराज्य अनुभवण्याचा प्रयत्न करतात…

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमात आल्यानंतर मला अनुभवायला मिळाले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेमुळे जे दैवी कार्य चालले आहे, ते काही सर्वसाधारण कार्य नाही.’ येथे आल्यानंतर माझ्या रोमारोमांत दैवी शांती देणारे दिव्य चैतन्य ओतप्रोत भरले गेले.’

वृंदावन (उत्तरप्रदेश) येथील आचार्य श्री संजीव कपिल यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद

परमहंस आश्रम वृंदावन आणि आश्रम हरि मंदिर, पटौदी यांचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर श्री स्वामी धर्मदेवजी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री संजीव कपिल यांची सनातन संस्थेच्या साधकांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी साधकांनी आचार्य श्री संजीव कपिल यांना संस्थेच्या कार्याची माहिती सांगून आशीर्वाद घेतले.

सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे जीवनावश्यक वनस्पतींचे वृक्षारोपण

सध्या वाढत असलेले प्रदूषण पहाता आज प्रत्येक भारतियाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून सनातन संस्थेच्या वतीने अलकनंदा येथील ‘मंदाकिनी एन्क्लेव्ह’ या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

२५ वर्षांहून अधिक काळ होत असलेला ‘एक्झिमा’चा त्रास ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर एका मासातच दूर होणे

बहिणीने आरंभी नामजप न करणे, तिला साधनेच्या दृष्टीकोनातून नामजप आणि भावप्रयोग करायला सांगितल्यावर तिने नियमितपणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करणे

स्वतःचे चिरंतन हित साधण्यासाठी योगशास्त्राचा अभ्यास करा !

‘योगशास्त्र’ हा पुष्कळ विस्तृत आणि गहन विषय आहे. एका लेखात त्याची मांडणी करणे केवळ अशक्य आहे. मनुष्याला स्वतःचे चिरंतन हित साधायचे असेल, तर योगशास्त्राच्या अभ्यासाविना पर्याय नाही, हे निश्चित ! त्याची महती कळावी, या दृष्टीने हा लेखप्रपंच !

चिकनगुनिया : लक्षणे आणि उपचार !

‘चिकनगुनिया’ या व्याधीचे स्वरूप भयंकर असले, तरी ती जीवघेणी व्याधी नाही. ती बरी होते, तसेच सांधेदुखीही बरी होऊ शकते. केवळ योग्य वेळी वैद्य गाठण्याची आणि त्यांच्याकडे पुरेसा काळ उपचार करून घेण्याची आवश्यकता आहे.’