सद्गुरु स्वाती खाडये यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा राज्य येथील जिज्ञासूंना केलेल्या ‘ऑनलाईन’ संपर्काला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा राज्य येथील वाचक, जिज्ञासू, धर्मप्रेमी अन् प्रशिक्षणवर्गातील युवक-युवती यांची ‘ऑनलाईन’ भेट घेतली. तेव्हा सर्व जिज्ञासूंचा सकारात्मक प्रतिसाद लाभला आणि त्यांनी साधनेला आरंभ केला.

भारतीय कृषी परंपरेचे महत्त्व आणि या परंपरेला टिकवून ठेवण्याची आवश्यकता

पुरातन भारतीय कृषी परंपरा ही निसर्गाला अनुकूल होती. स्थानिक परिस्थितीशी सुसंगत अशा देशी बियाण्यांचा उपयोग करणे, मातीचे स्वास्थ्य टिकवून ठेवणे आणि शेतातील जिवाणू, कीटक, तसेच पिके यांची जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) राखणे अशा भक्कम पायावर ही व्यवस्था उभी होती.

‘हँड, फूट अँड माऊथ’ (हात, पाय आणि तोंड) या साथीच्या रोगावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

हाता-पायांवर पुरळ येणे, ताप आणि ताप गेल्यावर तोंडात वेदनादायक फोड येणे, ही लक्षणे असलेल्या साथीच्या रोगाला आधुनिक वैद्यकशास्त्रात ‘हँड, फूट अँड माऊथ’ रोग म्हणतात. या रोगावरील आयुर्वेदातील प्राथमिक उपचार येथे देत आहोत.

अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील पुस्तक मेळ्यामध्ये लावण्यात आले सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन !

स्वातंत्र्यसैनिक स्व. नारायणदास खत्री यांच्या शताब्दी सभारंभानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. त्याला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.

साधकांसाठी दिवस-रात्र आध्यात्मिक स्तरावर उपाय करणारे आणि श्री गुरूंची संजीवनी देवता (धन्वन्तरि देवता) असलेले एकमेवाद्वितीय सद्गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळ (वय ५९ वर्षे) !

सूक्ष्म-स्तरावर प्रचंड कार्य करण्याची अद्वितीय क्षमता असणारे एकमेवाद्वितीय सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ !

नैसर्गिक संकटांचा आपत्काळ आणि भक्तीची अपरिहार्यता !

सध्या कलियुगांतर्गत ६ व्या कलियुगाच्या चक्राचा शेवट होण्यापूर्वीचा संधीकाल चालू आहे. या युगपरिवर्तनाच्या कालावधीत येणारा आपत्काळ आता चालू झाला आहे. जगात आणि भारतात घडणार्‍या विविध घटनांतून हा आपत्काळ सर्व जण अनुभवत आहेत.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी जातांना, तसेच इतर वेळीही प्रवास करतांना शक्य असल्यास सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आदी समवेत ठेवून त्यांचा प्रसार करा !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी जातांना, तसेच इतर वेळीही प्रवास करतांना शक्य असल्यास सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आदी समवेत ठेवून त्यांचा प्रसार करा !

अणूयुद्धाची शक्यता आणि त्याचे परिणाम !

‘आज रशिया अणि युक्रेन यांच्यात पूर्ण प्रमाणात अणूयुद्ध झाले, तर जगातील ५० लाख लोकांचा मृत्यू होईल. तथापि हे सर्व लोक बाँबच्या थेट परिणामामुळे नाही, तर जगभरातील उपासमारीच्या प्रभावाने मारले जातील’, असा दावा नवीन अभ्यासात करण्यात आला आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘आश्रमात आल्यानंतर माझ्या मनाला पुष्कळ शांती जाणवली आणि आतून पुष्कळ चांगले वाटले. मला एक सकारात्मक ऊर्जा आपोआपच मिळत गेली. आश्रम स्वतःच अध्यात्माचे एक ज्ञानकेंद्र आहे. रामनाथी आश्रम निश्चितच हिंदु राष्ट्राचा केंद्रबिंदू होईल.’

मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातन संस्थेचा युवा साधक कु. पार्थ पै याला स्पर्धा परीक्षेत मिळाले सुयश !

मंगळुरू येथील सनातन संस्थेचा युवा साधक कु. पार्थ पै याने कर्नाटकातील विज्ञानशाखेच्या सी.ई.टी. (सामायिक प्रवेश परीक्षा) या स्पर्धा परीक्षेत राज्यात ४६ वा क्रमांक (इंजिनीयरींग विभाग) मिळवला आहे.