श्रीकृष्णभक्तीचा व्यष्टी साधनेतील टप्पा गाठल्यानंतर समष्टी भाव, तळमळ आदी गुणांमुळे समष्टी सेवेचे दायित्व सहजतेने पेलणार्या गोपीभावातील साधिका !
सनातन संस्थेतील गोपीभाव असणार्या साधिकाही आता समष्टी साधना करू लागल्या आहेत. वयाने लहान असलेल्या, विशेष शिक्षण झालेले नसतांना आणि समष्टीचा काहीच अनुभव नसतांनाही श्रीकृष्णकृपेने त्यांना ही साधना चांगल्या रितीने जमू लागली आहे.