केवळ जिज्ञासा म्हणून भुतांचा अभ्यास नको, तर याबरोबरच संशोधन करणार्‍याची साधनाही हवी, नाहीतर या वाईट शक्ती कधीही आपल्या जिवास हानी पोहोचवू शकतात आणि त्याचे प्रत्यक्ष उदाहरण !

pu_anjali_gadgil
पू. (सौ.) अंजली गाडगीळ

भुतांविषयी संशोधन करणार्‍या एका मोठ्या संस्थेच्या तरूण संस्थापकाचे नुकतेच निधन झाल्याची बातमी वाचनात आली. त्यांचा मृत्यू मोठा चमत्कारिक होता. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी हा तरुण त्याच्या पत्नीला कुणीतरी काळी शक्ती मला तिच्याकडे खेचत आहे, असे सांगत होता. या तरुणाने जवळजवळ ६ सहस्र बाधित घरांचे संशोधन केले होते. पोलिसांनी सदर तरूणाने अती ताण घेऊन आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला; परंतु त्याच्या कुटुंबियांनीही मात्र ही शक्यता फेटाळून लावत तो असा आत्महत्या करणार नाही. त्याच्या मृत्यूचे गूढच आहे, असे सांगितले.

एका मोठ्या संस्थेच्या संस्थापकाचे हल्लीच निधन झाल्याची बातमी वाचल्यावर त्या संदर्भात मी जे लिहिणार होतो, अक्षरशः तेच पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी लिहिले आहे. – परात्पर गुरु डॉ. आठवले

 

१. भुतांच्या क्षेत्रात हात घालणे हा काही खेळ नव्हे,
तर ते प्रत्यक्ष आगीत हात घालण्यासारखे आहे !

यावरून एक गोष्ट लक्षात आली की, केवळ जिज्ञासा म्हणून भुतांचा अभ्यास नको, तर याबरोबर संशोधन करणार्‍याची साधनाही हवी. भुतांच्या क्षेत्रात हात घालणे हा काही खेळ नव्हे. हे प्रत्यक्ष आगीत हात घालण्यासारखे आहे. या अदृश्य शक्ती आपला कधीही जीव घेऊ शकतात.

 

२. भुतांचे संशोधन निर्विघ्नपणे करण्यासाठी सद्गुरूंचे पाठबळ हवे !

अदृश्य शक्तींपासून वाचण्यासाठी आणि संशोधनही निर्विघ्नपणे करण्यासाठी सद्गुरूंचे पाठबळ हवे. तुमच्यावर गुरुकृपा नसेल, तर तुमचे कुणीही रक्षण करू शकत नाही. तेच नेमके येथे घडले.

 

३. भुतांविषयी संशोधन करणार्‍या अनेक संस्थांमध्ये सनातन
संस्था करत असलेल्या अदृश्य शक्तींच्या संशोधनाचे महत्त्व

सनातनचे सहस्रो साधक साधना करतांना प्रतिदिन अनेक वाईट शक्तींशी नामजप, उपाय आदी माध्यमातून लढत आहेत. यात साधकांवर आजपर्यंत अनेक आक्रमणे झालेली आहेत. अनेकदा साधक बेशुद्धही झालेले आहेत. अनेकदा त्यांना जीवघेण्या आक्रमणांना सामोरे जावे लागले आहे; परंतु यातून साधक वाचले आहेत आणि याचे कारण म्हणजे त्यांच्यावर असलेली गुरुकृपा !

३ अ. गुरूंच्या कृपेमुळे अनेक साधक
जिवाचे बरेवाईट न होता वाईट शक्तींवर यशस्वीरित्या संशोधन करत आहेत !

गुरूंच्या कृपेमुळे अनेकजण यातून बाहेर पडले आहेत आणि साधनाही करत आहेत. या अदृश्य शक्तींच्या युद्धात कुणा साधकाचा जीव गेला आहे, असे आजपर्यंत झालेले नाही. साधक यांवर संशोधनही करत आहेत.

 

४. तात्पर्य

४ अ. या अदृश्य शक्तींपेक्षा आपली शक्ती अधिक आहे,
अशा खोट्या अहंकाराने वागू नये, नाहीतर प्राणास मुकावे लागते !

सांगण्याचे तात्पर्य असे की, काहीही करतांना, विशेषतः अदृश्य शक्तींच्या संदर्भात काही करतांना गुरूंचे कवच आपल्याभोवती हवे. गुरूंचे रक्षण नसेल, तर या अदृश्य शक्ती आपल्यासाठी प्राणघातक ठरू शकतात. गुरूंच्या कृपेशिवाय आपण काहीच करू शकत नाही.
– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (१३.३.२०१६, )

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.