सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर यांचा खडतर जीवनप्रवास आणि त्यांना आलेल्या अलौकिक अनुभूती
बेळगाव जिल्ह्यातील रामनगर या गावामध्ये दिसणारी साधी भोळी माणसे, त्यांचे साधे राहणीमान आणि त्यांच्या डोळ्यातील निरागस भाव हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. याच गावात रहातात सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकरमामा !