प्राचीन भारतीय ज्ञानपिठे
प्राचीन भारत हा शिक्षण क्षेत्रात अग्रेसर होता. भारतीय शिक्षणपद्धत जगमान्य होती. आजसारखी तरुण पिढी तेव्हा उच्च शिक्षण घेण्यास विदेशात तर जात नव्हतीच, उलट विदेशातून असंख्य जिज्ञासू ज्ञानार्जन करण्यासाठी भारतीय विद्यापिठांत येत.
