मुलांसाठी गुरुकुल शिक्षणपद्धत आवश्यक आहे का ?

मुलांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरुकुल शिक्षणपद्धत आवश्यक

१. पूर्वीच्या काळी गुरुकुलात मुलांना प्रथम अध्यात्मशिक्षण
आणि नंतर ६४ कलांपैकी २ – ३ कलांचे शिक्षण दिले जाणे

1358510125_p-appakaka-150
पू. (डॉ.) वसंत आठवले

पूर्वी मुंज झाल्यावर मुलांना गुरुकुलात शिक्षण घेण्यासाठी पाठवत असत. गुरुकुलामध्ये प्रारंभी अध्यात्मशिक्षण देत आणि त्यानंतर मुलांची आवड किंवा योग्यता यांनुसार ६४ कलांपैकी २ – ३ कलांचे शिक्षण त्यांना दिले जायचे. कलेतील शिक्षण हे संसार आणि व्यवहार यांत उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडत असे. त्यातही आध्यात्मिक दृष्टीकोन कसा ठेवावा, हे गुरुकुलात शिकवले जायचे.

 

२. अहंभाव वाढण्याआधीच मुलांना अध्यात्माचे शिक्षण दिल्यास
त्यांच्यावर सात्त्विक संस्कार होऊन आध्यात्मिक उन्नती होणे

मुलांमध्ये ६ वर्षांनंतर अहंचा विकास होतो. एकदा अहं वाढला की, संस्कार करणे जवळजवळ अशक्यप्राय होते; म्हणून अहंभाव वाढण्याआधीच त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांना अध्यात्माचे शिक्षण दिले जात असे. त्यामुळे त्यांच्यावर सात्त्विक संस्कार होत असत. लहानपणापासून साधनेेचे संस्कार झाल्याने त्यांच्यात साधनेची आवड निर्माण व्हायची आणि साधनेमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती होत असे. अहंभाव वाढवण्याआधीच साधनेत पुढे जाणे सोपे असते. तसेच गुरुकुलातील वातावरणही सात्त्विक असल्याने साधनेला पोषक असे.

 

३. सध्या मुलांना अध्यात्माचे शिक्षण
मिळत नसल्याने त्यांची अधोगती होणे

सध्या मुलांना कुठेही अध्यात्माचे शिक्षणच दिले जात नाही. तसेच घरातील रज-तमात्मक वातावरण आणि दूरदर्शन इत्यादीमुळे मायेतील संस्कारच सतत होत असतात. त्यामुळे मुलांची आणि पर्यायाने समाजाची अधोगतीच होत आहे. खर्‍या आनंदापासून व्यक्ती आणि समाज दूर जात आहेत.

 

४. प.पू. डॉक्टरांनी प्रारंभ केलेल्या
गुरुकुल शिक्षणपद्धतीचा भविष्यात होणारा समष्टी परिणाम

प.पू. डॉक्टरांनी याचसाठी सनातन संस्थेमध्ये गुरुकुल शिक्षणपद्धत चालू केली आहे. तेथे मुलांवर नैतिक मूल्यांचे संस्कार होऊन लहान वयातच त्यांचा आध्यात्मिक विकास होतो. अशी मुले तरुणपणातच समष्टी संत बनून पुढे ब्रह्मांंडाचा उद्धार करू शकतात.

– आधुनिक वैद्य पू. (डॉ.) वसंत आठवले, चेंबूर (३.२.२०१२)