स्वस्तिक हे चिन्ह ११ सहस्र वर्षे प्राचीन ! – संशोधकांचा निष्कर्ष

२ सहस्र आणि १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी
स्थापन झालेल्या पंथियांनी हिंदु धर्माची प्राचीनता लक्षात घ्यावी !    

swastikखरगपूर (बंगाल) : स्वस्तिक हे चिन्ह किमान ११ सहस्र वर्षे जुने आहे. हे चिन्ह आर्य संस्कृतीच्या आणि सिंधू संस्कृतीच्याही आधीपासून अस्तित्वात होते. पाश्‍चात्त्य आणि मध्यपूर्वेतील राष्ट्रांच्या संस्कृतींमध्येही त्याचा प्रसार झाला आहे, असा निष्कर्ष खरगपूरमधील आयआयटीमध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनाअंती काढण्यात आला.     

सामान्यतः आर्य संस्कृतीतील मानला जाणारा ऋग्वेद हा आर्यकाळाच्या कित्येक वर्षे पूर्वी म्हणजे हडप्पा संस्कृतीच्याही पूर्वी श्रुतींच्या स्वरूपात अस्तित्वात होता आणि त्यानंतर सिंधू संस्कृतीतून पुढे आला, असे स्वस्तिकाचा माग काढतांना शास्त्रज्ञांना आढळले. या अभ्यासाचे प्रमुख संशोधक जॉय सेन म्हणाले, आम्हाला हडप्पा संस्कृतीच्या पूर्वीच्या काळातही मुद्रांच्या स्वरूपातील सुस्पष्ट भौगोलिक स्वस्तिकाचे अस्तित्व आढळले. याच काळात वेदांमध्येही स्वस्तिकाचा उल्लेेख आढळतो. या गोष्टी पहाता भारतीय संस्कृती ही युरोपीय इतिहासकारांनी लिहिलेल्या पुस्तकांतील आजवरच्या उल्लेखापेक्षा अधिक जुनी असल्याचे स्पष्ट होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात