सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला

‘हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे आणि साधकांची साधना चांगली होऊन त्यांचे रक्षण व्हावे’, या उद्देशाने सप्तर्षी जीवनाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे येथील सनातनच्या आश्रमात ६ मे या दिवशी श्री चंडी होम भावपूर्ण वातावरणात पार पडला.

सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !

आश्रम परिसरातील सर्व साहित्य सुस्थितीत रहाण्याकरता तात्पुरत्या निवारा शेड बनवायच्या आहेत. त्यासाठी फ्लेक्स, प्लास्टिक आणि ‘सिलपोलिन’ यांची, तसेच लोखंडी अन् प्लॅस्टिक पत्र्यांची (‘कॉरुगेटेड शीट्स’ची) आवश्यकता आहे…

भारतीय संत महापरिषदेच्या संत समन्वयक स्वामिनी उन्मेष भारती यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

भारतीय संत महापरिषदेच्या संत समन्वयक आणि कैलास मठाच्या प्रतिनिधी स्वामिनी उन्मेष भारती यांनी २४ एप्रिल या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्या बेंगळुरूच्या श्री राजराजेश्वरी मंदिर येथील रहिवासी आहेत.

सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे

देशभरातील तरुणांना आणि तरुणींना योग्य दिशा दाखवण्याचे काम सनातन संस्था करते, असे गौरवोद्गार अमरावती येथील भाजपचे राज्यसभेचे खासदार तथा महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी रामनाथी (फोंडा, गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिल्यावर काढले.

अधिक मासात सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ इतरांना देऊन सर्वश्रेष्‍ठ अशा ज्ञानदानाचे फळ मिळवा !

इतरांना देण्‍यासाठी सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ हवे असल्‍यास त्‍यांची मागणी लवकरात लवकर स्‍थानिक वितरकांकडे करावी अथवा https://sanatanshop.com/shop/ या लिंकवर नोंदवावी.

इंद्रप्रस्थ सांस्कृतिक महोत्सवात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

देहलीच्या ऐतिहासिक परिसरात आयोजित ‘इंद्रप्रस्थ सांस्कृतिक महोत्सव (आय.सी.एफ्. २०२६)’ हा भारतीय संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म यांचा एक अनोखा संगम ठरला. या महोत्सवात सनातन संस्थेने आयोजित केलेले ग्रंथप्रदर्शन विशेष आकर्षण ठरले.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ काजल हिंदुस्थानी यांनी रामनाथी, गोवा येथील ‘सनातन आश्रमा’ला दिली सदिच्छा भेट !

गुजरातमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि ‘सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर’ (सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून प्रभावीपणे समाजाला दिशा देणार्‍या) काजल हिंदुस्थानी यांनी १८ एप्रिल २०२६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

वर्धा येथे सनातन संस्थेकडून डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा सत्कार

भारताला हिंदु राष्ट्र करणे, देशात गोवंश हत्याबंदीचा कायदा करणे, आपत्काळात हिंदूंचे रक्षण करणे, १ लाख ‘हनुमान चालिसा केंद्रे’ चालू करणे आदी संकल्प घेऊन ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद’ तथा ‘राष्ट्रीय बजरंग दला’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा देशभर दौरा चालू आहे. या निमित्ताने ते वर्धा येथे आले असता…

अधिक मास निमित्त धर्मप्रसाराचे कार्य अव्‍याहतपणे करणार्‍या सनातनच्‍या आश्रमांना अन्‍नदान करून पुण्‍यसंचयासह आध्‍यात्मिक लाभही मिळवा !

भारतीय संस्‍कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. दानाचे धनदान, अन्‍नदान, वस्‍त्रदान, ज्ञानदान आदी प्रकार आहेत. दान हे पापनाशक असून ते पुण्‍यबळाची प्राप्‍ती करून देते. ‘या पृथ्‍वीतलावर दानधर्मासारखा दुसरा निधी (ठेवा) नाही’, असे महाभारतात सांगितले आहे.

‘विश्वमांगल्य सभे’च्या प्रांत अधिवेशनात सनातन संस्थेच्या साधिका सौ. माहेश्वरी सरनोबत यांचा सत्कार

‘विश्वमांगल्य सभा’ याच्या वतीने समाजाप्रती नि:स्वार्थ सेवाभाव आणि चिंतनशील मातृत्व जपत ‘शौर्य क्षेत्रा’त केलेल्या कार्याविषयी सनातन संस्थेच्या साधिका सौ. माहेश्वरी सरनोबत यांचा ‘सप्तमातृका सन्माना’च्या अंतर्गत ‘शक्तीरूपेण संस्थिता’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.