विविध संतांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्यक्ष कृती करून अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करणारे प.पू. डॉक्टर !

प.पू. (डॉ.) आठवले त्या वेळी अध्यात्माचा प्रायोगिक तत्त्वाने अभ्यास करत होते. प.पू. डॉक्टरांना त्यांच्या एका मित्राने प.पू. अण्णा करंदीकर यांच्याविषयीची माहिती सांगितली. प.पू. अण्णांना भेटल्यावर त्यांच्याकडून अपेक्षित असे मार्गदर्शन मिळेल, अशी खात्री प.पू. (डॉ.) आठवले यांना झाली….

वाहनातून प्रवास करतांना वाटेत पुरामुळे निर्माण झालेली संकटे गुरुकृपेने दूर होणे आणि मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडता येणे

भीषण पाऊस, दरड कोसळणे आणि नैसर्गिक आपत्तीत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि साधक यांनी अनुभवलेली गुरुकृपा..

समाजाच्या उत्थानासाठी साधना या विषयांवरील प्रवचनांच्या ध्वनीफितींच्या निर्मितीच्या माध्यमातून यज्ञ करणारे !

वर्ष १९९० ते १९९६ या कालावधीत संस्थेच्या अध्यात्मप्रसाराचे कार्य म्हणून काही जिल्हे, तालुके आणि शहरे या ठिकाणी प.पू. डॉक्टर अभ्यासवर्ग घेत असत. पुढे वर्ष १९९७ ते १९९९ या कालावधीत प.पू. डॉक्टरांनी महाराष्ट्र, गोवा अन् कर्नाटक या राज्यांमध्ये १०० हून अधिक जाहीर प्रवचने घेतली. सर्व ठिकाणच्या प्रवचनांचे चित्रीकरण करून त्यांचे एकत्रित संकलन करण्यासाठी अडचण येऊ नये, यासाठी सर्व प्रवचनांच्या वेळी एकच झब्बा आणि पॅन्ट वापरली….

उतारवयातही नवीन गोष्टी शिकण्याची तळमळ असलेले आणि प्रत्येक गोष्टीचे श्रेय गुरुदेवांना देणारे पू. भगवंतकुमार मेनराय !

रामनाथी आश्रमात काही साधकांना अरोमाथेरेपी शिकवत आहेत. पू. मेनरायकाका त्याविषयी जिज्ञासेने प्रश्‍न विचारतात आणि मला ही थेरेपी शिकायची आहे, असे म्हणतात.

श्री गणेशाच्या चित्रामुळे अभियांत्रिकी पदविकेच्या विषयाची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना लाभ !

बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी सनातननिर्मित श्री गणेशाचे चित्र भेट देण्यात आले होते. या चित्रामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत होण्यास विशेष लाभ झाला. अनेकांनी परीक्षेस जातांना हे चित्र सोबत नेल्याचे सांगितले. १५० विद्यार्थ्यांना श्री गणेशाची चित्रे भेट दिली होती.

सनातन अल्पावधीत व्यापक होण्यामागचे रहस्य !

सनातन संस्था अल्पावधीत विश्‍वव्यापी होण्यामागेही काही वैशिष्ट्ये आहेत; मात्र ही वैशिष्ट्ये आध्यात्मिक स्तरावरची आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची विहंगम गतीने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी निर्मिलेला गुरुकृपायोग !

सर्वसामान्य लोकांमध्ये अन् बहुतांश साधकांमध्येही भक्तीमार्गात आवश्यक असलेले भगवंतावरील निःसीम प्रेम किंवा ज्ञानमार्गासाठी आवश्यक असलेले वैराग्यही नसते. अशा साधकांसाठी आणि सर्वांसाठीही कर्म, भक्ती अन् ज्ञान या योगांचा सुरेख संगम असलेला गुरुकृपायोग प.पू. डॉक्टरांनी विशद केला.

मी… सनातनचे ग्रंथविश्‍व… परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा धर्मदूत !

शिवाच्या जटेतून जशी गंगानदी पृथ्वीला पावन करण्यासाठी अवतरित झाली, तसे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून अखिल मानवजातीचा उद्धार करण्यासाठी सनातनच्या ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानगंगा अवतरित झाली आहे !