सनातन-निर्मित श्री गणेशमूर्तीप्रमाणे आदर्श आणि सात्त्विक श्री गणेशमूर्ती बनवणारे राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील मूर्तीकार श्री. राहुल तायशेट्ये !

rahultayshetye
श्री. राहुल तायशेट्ये

राजापूर, रत्नागिरी येथील श्री गणेशमूर्तीकार श्री. राहुल तायशेट्ये यांनी प्रथम सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्तीप्रमाणे मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांना प्रेरणा कशा प्रकारे मिळाली, तसेच मूर्ती घडवतांना आलेल्या अनुभूती आदींविषयी त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊया.

१. सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती
पाहिल्यापासून त्याप्रमाणे मूर्ती घडवण्यासाठी प्रयत्न करणे

shriganeshmurti
श्री. तायशेट्ये यांनी सिद्ध केलेली श्री गणेशमूर्ती

मी ३ वर्षांपूर्वी सनातनच्या साधकांच्या घरी सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती पाहिल्यापासून त्याच प्रकारे श्री गणेशमूर्ती बनवण्याची तळमळ मला लागली होती आणि ती यावर्षी प्रत्यक्षात आली. श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार असावी ? या सनातन-निर्मित ग्रंथातील शास्त्रानुसार शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्यास प्रारंभ केला आणि त्यानंतर स्थानिक साधकांनी वेळोवेळी सुचवलेले पालट केल्यानंतर अखेर सात्त्विक श्री गणेशमूर्ती घडवली गेली.

२. मूर्ती सात्त्विक होण्यासाठी साधकांनी
सुचवलेले पालट सकारात्मक राहून स्वीकारणे

ही मूर्ती बनवतांना सनातनच्या साधकांनी किमान ८ ते १० वेळा पालट सुचवले. ते स्वीकारतांना कधीही मनाचा संघर्ष झाला नाही किंवा मूर्ती पूर्ण होण्यासाठी सुमारे एक महिन्याच्या कालावधीत पुन्हा पुन्हा अनेकदा तीच मूर्ती घेऊन बसलो; परंतु कधीही कंटाळा आला नाही. नेहमी सकारात्मक राहिल्याने आणि मूर्ती अधिकाधिक अचूक आणि शास्त्रानुसार व्हावी, या एका तळमळीमुळे नेहमी आनंदच मिळाला. मूर्तीचे काम पूर्ण झाल्यावर एक वेगळेच समाधान मिळाले अन् डोळे भरून येऊन कृतज्ञताही वाटली.

यावर्षी प्रथमच ही मूर्ती बनवली आणि अखेरच्या काळात अशा सात्त्विक मूर्तींची मागणी येऊनही ८ मूर्ती बनवून रंगवून पूर्ण झाल्या. पुढील वर्षीपासून अशा सात्त्विक श्री गणेशमूर्ती अधिकाधिक बनवण्याचा आनंद घेणार आहे.

३. लहानपणापासून श्री गणेशमूर्ती बनवण्याची ओढ असणे

मला लहानपणापासून श्री गणेशमूर्ती बनवण्याची ओढ होती. वयाच्या ६ व्या वर्षी मी पहिली श्री गणेशमूर्ती बनवली. इयत्ता ४ थीत शिकत असतांना प्रथम घरातील श्री गणेशमूर्ती बनवली. विशेष म्हणजे परंपरागत आमचा गणेशमूर्ती बनवण्याचा व्यवसाय नसतांना मी ती मूर्ती बनवली होती. मी इयत्ता ११ वीत शिक्षण घेत असतांना समाजातून श्री गणेशमूर्ती मागणीनुसार बनवून देवू लागलो. आज १२५ मूर्ती मागणीनुसार आमच्या चित्रशाळेतून वितरित होतात.

– श्री. राहुल तायशेट्ये, राजापूर, जिल्हा रत्नागिरी

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात