श्री गणेशमूर्ती विसर्जनाला विरोध करणार्‍या भोंदू सुधारकांच्या टोळीची पशूवधगृहे आणि सांडपाणी यांमुळे होणार्‍या जलप्रदूषणाकडे डोळेझाक !

वर्षाचे ३६५ दिवस नद्यांमध्ये गणेशमूर्ती विसर्जित केल्या जात नाहीत, तरीही प्रतिदिन कोट्यवधी लिटर सांडपाणी नद्यांत मिसळून नद्या दूषित झाल्या असतांना त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करणारी स्वयंघोषित सुधारकांची टोळी फक्त हिंदूंच्या सणांच्या विरोधातच कार्य करते.

गणेशमूर्ती दान करण्यास सांगणार्‍या तथाकथित सुधारकांना घनकचरा, सांडपाणी, उद्योग, ई-कचरा यांमुळे होणार्‍या प्रदूषणाविषयी खडसवा !

गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण होते, अशी टूम स्वयंघोषित सुधारक काही वर्षांपूर्वी काढली होती. धर्मशिक्षणाचा अभाव आणि कथित पुढारलेपण यांमुळे अनेक जण त्यांच्या नादालाही लागले; पण आता या स्वयंघोषित समाजसुधारक आणि समाजसेवक यांचे पितळ उघडे पडत आहे.

गणेशमूर्तींच्या विसर्जनाने प्रदूषण होते, अशी ओरड करणार्‍यांनो, सांडपाण्याद्वारे होणार्‍या भीषण जलप्रदूषणाचा विचार करा !

गणेशोत्सव जवळ आला आहे. आता नेहमीप्रमाणे स्वत:ला पर्यावरणप्रेमी म्हणवणारे स्वयंघोषित सुधारक आणि त्यांच्या संघटनांचे कार्यकर्ते सक्रीय होतील. गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण होते, अशी टूम या लोकांनी काही वर्षांपूर्वी काढली होती.