बारामती येथे सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रातीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रम

बारामती (जिल्हा पुणे) येथे मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संक्रांत या सणाविषयी माहिती देणारे चलचित्र (व्हिडिओ) महिलांना दाखवण्यात आले.

युवा पिढीला सुसंस्कारीत आणि आदर्श करण्याच्या उद्देशाने जळगाव येथे सनातनच्या सेवाकेंद्रात युवा शिबीर

जळगाव येथील सनातनच्या सेवाकेंद्रात २६ ते २९ जानेवारी या कालावधीत युवा पिढीला सुसंस्कारीत आणि आदर्श करण्याच्या उद्देशाने युवा शिबीर घेण्यात आले. त्यात नाशिक, जळगाव, संभाजीनगर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, नंदुरबार, धुळे येथील युवा साधकांनी सहभाग घेतला.

सनातनच्या धर्मरथाच्या माध्यमातून अमरावती येथे अध्यात्मप्रसार

अमरावती शहर, मोर्शी आणि मूर्तीजापूर गावांमध्ये सनातनच्या धर्मरथाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला. मूर्तीजापूर गावात ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष चंदन अग्रवाल, भाजप शहराध्यक्ष भारत भगत, तसेच स्थानिक ज्येष्ठ समाजसेवक कमलाकर गावंडे यांनी धर्मरथाचे पूजन करून प्रसारकार्याला प्रारंभ केला.

याज्ञवल्क्य मठाचे प.पू. श्री श्री श्री १००८ विद्यावारिधीतीर्थ स्वामीजी यांची नगर येथील सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट

कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन पाहून स्वामीजींनी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी ‘‘कर्नाटकमध्ये झालेल्या समितीच्या सभेला मी गेलो होतो. समितीने संघटन चांगले केले आहे. तुमच्या गुरुदेवांना हा प्रसाद द्या आणि हे अर्पणरुपी आशीर्वाद द्या’’, असे म्हणून ५० रुपये आणि खडीसाखरेचा प्रसाद दिला.

सनातन संस्थेचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवे ! – संतोष वर्तक, अध्यक्ष, सह्याद्री सामाजिक संस्था

कळंबोली येथील बिमा कॉम्प्लेक्स येथे सनातन संस्थेच्या वतीने धर्मरथावर सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या विक्रीकेंद्राचे उद्घाटन सह्याद्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष वर्तक आणि भाजपचे पनवेल शहर चिटणीसपदावर श्री. अशोक मोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत म्हापसा (गोवा) येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !

पेडणे येथील कार्निव्हल रहित करावा. समानस्तरावर लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन यांसाठी तातडीने कायदा करावा व मागण्यांना अनुसरून समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली २८ जानेवारी या दिवशी म्हापसा नगरपालिका बाजार येथे निदर्शने केली.

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात सनातन संस्थेच्या साधिकेने केलेल्या प्रबोधनामुळे युवक प्रभावित

सनातन संस्थेच्या सौ. सुधा घाटगे यांनी सोलापूर येथील ७० फूट रस्त्यावरील, इंदिरानगर येथील चौकामध्ये ८-१० युवकांना राष्ट्रध्वजाची रांगोळी अन् फटाके यांमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, हे पटवून योग्य कृती काय करायला हवी, हे समजावून सांगितले.

सोलापूर येथील ज्ञानप्रबोधन विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेकडून सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक !

सोलापूर येथील मासाळनगर, विजापूर रस्ता, ज्ञानप्रबोधन शाळेत हळदी-कुंकू कार्यक्रम नुकताच पार पडला.या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या सौ. सुधा घाटगे यांना निमंत्रित करण्यात आले होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील प्रकाशात वाढ होणे, तसेच खोलीतील दंडदीपाचा तेजस्वीपणाही वाढणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अस्तित्वामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणा-या चैतन्याचा केवळ त्यांच्या खोलीतील वातावरणावरच परिणाम झाला, असे नसून त्या खोलीतील प्रत्येक वस्तूवरच झाला आहे. त्यामुळे त्यांच्या खोलीतील दंडदीपावरही तो झाला असून ती चैतन्यमय झाली आहे.