आयुर्वेद – अनादी आणि शाश्वत मानवी जीवनाचे शास्त्र
आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद किंवा मानवी जीवनाचे शास्त्र. त्यात शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक स्वास्थ्य कसे राखावे याचे मार्गदर्शन केले आहे. आयुष्याला हितकर व अहितकर आहार, विहार व आचार यांचे विवेचन केलेले आहे मानवी आयुष्याचे ध्येय व खरे सुख कशात आहे याचाही विचार केलेला आहे.