गंभीर स्थितीतील रुग्णासाठी वापरावयाची AB-CABS पद्धत
गंभीर स्थितीतील रुग्ण म्हणजे कोणत्याही कारणाने हृदयक्रिया-श्वसनक्रिया बंद पडलेला, बेशुद्ध, अत्यवस्थ किंवा प्रतिसाद न देणारा रुग्ण. अशा रुग्णाला ‘मूलभूत जीवितरक्षण साहाय्य’ करतांना प्रथमोपचारकाने AB-CABS या पद्धतीचा वापर करणे उपयुक्त ठरते.