जोधपूर येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

जोधपूर (राजस्थान) – जोधपूरच्या पोलो मैदानावर नुकतेच आंतरराष्ट्रीय माहेश्‍वरी महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि धर्मशिक्षणफलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. आलेने संस्थेचे संचालक श्री. गोविंदजी माहेश्‍वरी यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. ‘संपूर्ण अधिवेशनात सनातनचे ग्रंथप्रदर्शन केंद्र सर्वांत आकर्षक आहे. ग्रंथ पुष्कळ चांगले आहेत. समाजाला याची आवश्यकता आहे. हे प्रदर्शन अग्रभागी हवे होते. ईश्‍वरीकृपेनेच मला हे प्रदर्शन पहाण्याची संधी मिळाली. हिंदूंना जागृत करण्याचे तुमचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, अशा प्रतिक्रिया अनेक जिज्ञासूंनी व्यक्त केल्या.

क्षणचित्र

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात चांगले प्रयत्न चालू असल्याचे मी गेली १० वर्षे पाहिले आहे. सनातनच्या संत पू. सुशिला मोदी यांचे समर्पण वंदनीय आहे. त्यांच्यातील उत्कट भाव युवकांनाही प्रेरणादायी ठरत आहे, असे येथील महामंत्री श्री. संदीप काबरा यांनी सांगितले. श्री. काबरा यांनी त्यांच्या तेथे उपस्थित कार्यकर्त्यांना पाक्षिक सनातन प्रभातचे वर्गणीदार होण्यासाठी प्रोत्साहित केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment