जबलपूर येथे आयोजित ‘मकर संक्रमण व्याख्यानमाले’त सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन

संक्रांतीनिमित्त जबलपूर (मध्यप्रदेश) येथे आयोजित ‘मकर संक्रमण व्याख्यानमाला’

व्याख्यानमालेत बोलतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

 

आनंदप्राप्तीसाठी साधना करा ! – सद्गुरु (डॉ.)
चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

जबलपूर (मध्यप्रदेश) – सध्या मनुष्य सुख मिळवण्यासाठी धडपडत आहे; मात्र भौतिकतावादी जगात सर्वोच्च आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. त्यासाठी साधना करावी लागते. त्यामुळेच मनुष्याची आध्यात्मिक उन्नती होते आणि त्याला जीवनाचा सर्वोच्च आनंद मिळू शकतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. संक्रांतीच्या निमित्ताने येथील दत्तमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ‘मकर संक्रमण व्याख्यानमाले’त ते बोलत होते.

सनातनचे प्रदर्शन पहातांना जिज्ञासू

या वेळी डॉ. नितीन आडगावकर, अभय गोरे, डॉ. जीतेंद्र जामदार, डॉ. सारिका ठोसर, उदय परांजपे आणि विनायक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना गणोरकर यांनी केले. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment