सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस !

चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे सनातन संस्थेची प्रतीमा मलीन झाली असून हजारो साधकांच्या भावना दुखावल्या आहेत. ही नोटीस मिळूनही उत्तर न दिल्यास चव्हाण यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करण्यात येणार आहेत.

कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2025)

पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. ती वेळ मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांनाची हाेती. हा दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती आदी नावांनी ओळखला जातो.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त अनुभवला सर्व योगांचा सुरेख संगम ! – विद्याधर नारगोलकर, महामंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव’ या निमित्ताने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ….

स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव यांच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात सनातनच्या सद्गुरु आणि संत यांची वंदनीय उपस्थिती !

स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव आयोजित रौप्यमहोत्सवी ४ दिवसीय सोहळ्याचे १० जुलै ते १३ जुलै या कालावधीत आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव जिल्ह्यात झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी १ सहस्र ६०० हून अधिक जिज्ञासूंची उपस्थिती !

बेळगाव जिल्ह्यात बेळगाव शहर, खानापूर, येळ्ळूर, रामनगर या ४ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडला. या तिन्ही महोत्सवांसाठी १ सहस्र ६०० जणांची उपस्थिती होती.

सनातन संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी !

जिल्ह्यातील समर्थनगर, सातारा परिसर, हर्सूल आणि रांजणगाव येथे एकूण ४ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.

राजभवनाचे अवर सचिव विकास कुलकर्णी यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

सनातन संस्था आणि आश्रम यांचे अभूतपूर्व कार्य पाहून आणि आश्रमाला प्रत्यक्ष भेट देऊन समाधान मिळाल्याने मी भरून पावलो. निष्काम कर्म कसे करावे, याविषयी आश्रमातील साधकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे मला आत्मिक समाधान मिळाले. आश्रमातील सेवा सात्त्विक पद्धतीने केल्या जातात, ते पाहून मी प्रभावित झालो….

भारतभरात सनातनच्या विविध भाषांतील ग्रंथांचे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशन

१० जुलैला भारतभरात विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा सोहळे पार पडले. यांत सनातनचे खालील ग्रंथ, लघुग्रंथ आणि ‘ई-बुक’ यांचे प्रकाशन करण्यात आले.

सनातन संस्थेच्या विचारांनुसार मार्गक्रमण करणे आवश्यक ! – गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे

आपण देवाकडे थेट बोलू शकत नाही. त्यासाठी गुरूंची आवश्यकता भासते. आपला पहिला गुरु आई असते.त्यानंतर वेगवेगळ्या रूपांत ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात. या वेळी ते म्हणाले….

गुरुपौर्णिमा महोत्सवातील मान्यवरांचे विचार आणि अन्य सूत्रे

गोवा, कराड, चंद्रपूर येथे आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवातील क्षणचित्रे आणि मान्यवरांनी मांडलेले मौलिक विचार जाणून घेऊया.