
पनवेल – ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषात ‘श्री शिवगिरी’ संप्रदायाच्या श्री दत्तगुरूंच्या पालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात आगमन झाल्यावर आश्रमातील साधकांचा भाव जागृत झाला. दत्तजयंतीच्या दिवशी आश्रमात आलेल्या या पालखीतून ‘साक्षात् श्री दत्तगुरुच आश्रमात आले आहेत’, या भावाने साधकांनी शंखध्वनी करून पालखीचे स्वागत आणि पूजन केले.
श्री दत्तात्रेयांची प्रतिमा, त्यांची मूर्ती आणि प.पू. शिवगिरी महाराजांच्या पादुका यांची फुलांच्या माळांनी सजवलेली पालखी आश्रमाच्या आतील प्रवेशद्वारासमोर विराजमान झाली.
पालखीच्या अग्रस्थानी धर्मदंड हातात घेतलेले भक्त होते. धर्मध्वज आणि धर्मदंड यांचे पूजन सनातनचे साधक श्री. विलास गरूड यांनी केले. धर्मदंड घेतलेल्या दत्तभक्तांच्या पायांवर जल अर्पण करण्यात आले. नंतर धर्मदंडाला कुंकू लावले.
पालखीतील श्री दत्तात्रेयांच्या प्रतिमेला सनातनचे ६६ टक्के पातळीचे साधक श्री. विनायक आगवेकर यांनी ओवाळले आणि पुष्पहार अर्पण केला.
शिवगिरी सेवा संस्थानच्या वतीने दत्तजयंतीच्या निमित्ताने पादुकापूजन, भिक्षाप्रदान, श्री दत्त पाळणा, मिरवणूक आणि महाप्रसाद असे कार्यक्रम ठेवण्यात आले होते.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !