
देहली – गोव्यातील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर देहलीत आतापासूनच धर्मजागृतीचा एक ज्वलंत उत्साह निर्माण झाला आहे. या भव्य आयोजनाची सिद्धता युद्धपातळीवर चालू झाली असून देहलीतील महत्त्वाचे चौक, प्रमुख रस्ते आणि गजबजलेल्या परिसरांमध्ये ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आकर्षक फलक झळकण्यास प्रारंभ झाला आहे. या फलकांमुळे सर्वसामान्यांमध्ये या महोत्सवाविषयी उत्सुकता वाढली आहे.

देहली ही केवळ राजधानी नसून राष्ट्रीय निर्णयांची दिशा ठरवणारे केंद्र असल्यामुळे येथून सनातन संस्कृतीचा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश प्रभावीपणे जावा, यासाठी सनातन संस्थेच्या साधकांसह हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी हे लोकांपर्यंत महोत्सवाचा विचार पोचवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. त्यांचे हे निःस्वार्थ प्रयत्न हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या ध्येयाप्रती असलेल्या त्यांच्या दृढनिष्ठेचे प्रतीक आहेत.

या वर्षी देहलीतील हा महोत्सव धर्माभिमान आणि राष्ट्रभक्ती यांचा भव्य समन्वय साधणारा ठरणार आहे. हा ‘शंखनाद’ संपूर्ण राष्ट्राला नवी दिशा देणारा ठरेल. देहलीतील हा साधना आणि संघटनशक्ती आगामी महोत्सवाला ऐतिहासिक उंचीवर नेईल.
‘शंखनाद महोत्सवा’च्या ‘स्टँडी बॅनर’द्वारे प्रसारामुळे जनमानसात उत्कंठा !
राजधानीत अनेक ठिकाणी प्रसार मोहीम !

(‘स्टँडी बॅनर’ म्हणजे विज्ञापन किंवा माहिती यांसाठी वापरला जाणारा मोठा, उभा फलक. हा फलक सहसा प्रदर्शने, दुकाने, रस्ते किंवा कार्यक्रम स्थळांवर लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वापरला जातो.)
नवी देहली – ‘शंखनाद महोत्सवा’च्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवछत्रपतींच्या काळातील शस्त्र प्रदर्शन’ या उपक्रमाची माहिती देणारे ‘स्टँडी बॅनर’ नवी देहलीतील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. येत्या १३ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत ‘भारत मंडपम् हॉल १२’ येथे होणार्या या ऐतिहासिक प्रदर्शनासाठी देहलीकरांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. येथील प्राचीन हनुमान मंदिर, कॉनॉट प्लेस यांसारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी, तसेच राजधानीतील इतर अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक स्थळी सनातन संस्थेच्या वतीने या महोत्सवाचा प्रसार ‘स्टँडी बॅनर’द्वारे चालू आहे. नवी देहलीतील हा ‘शंखनाद महोत्सव’ नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ऐतिहासिक होणार आहे.
माहिती फलक ठरले आकर्षणाचे केंद्र !
आकर्षक माहिती फलकावर ‘शंखनाद महोत्सव’ आणि ‘शिवछत्रपतींच्या काळातील शस्त्रप्रदर्शन’ अशी ठळक अक्षरे असल्याने नागरिक उत्सुकतेने थांबून माहिती घेत आहेत.

राष्ट्रभक्तीची प्रेरणा !
या फलकावर प्रदर्शनाचा कालावधी, स्थळ आणि सहभागी होण्यासाठी नावनोंदणी कशी करायची ? याची माहिती आहे. नागरिक सहभागी होण्याची लिंक आणि काही जण क्यूआर् कोडवरून नावनोंदणी करत आहेत. ‘शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन पहाण्याची संधी देहलीत मिळत आहे, हे पाहून पुष्कळ आनंद झाला’, ‘या प्रदर्शनातून आम्हाला केवळ शस्त्रांची माहिती मिळणार नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि राष्ट्रभक्ती यांची प्रेरणा मिळेल’, अशा प्रतिक्रिया अनेक तरुणांनी फलकाजवळ व्यक्त केल्या.
शंखनाद महोत्सवाच्या प्रसारासाठी आलेल्या सनातन संस्थेच्या साधकांनी नागरिकांना केवळ फलकावरील माहिती न देता, प्रदर्शनाचे ऐतिहासिक महत्त्व आणि धर्मजागृतीसाठी असलेले त्याचे योगदान समजावून सांगितले.
८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !
Shankhnad Mahotsav Delhi : कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’च्या युद्धकलेने जागवले शौर्य !
Shankhnad Mahotsav Delhi : हिंदूंनो, रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक योगदान द्या !
दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर !
Shankhnad Mahotsav Delhi : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या इंग्रजी भाषेतील सनातन...
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘सुरक्षा, संस्कृति आणि शौर्य’ यांचा जागर