
देहली – सनातन धर्माचे तत्त्वज्ञान आणि राष्ट्र निर्माणातील त्याचे योगदान यावर आधारित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ लवकरच देहली येथे आयोजित होत असतांनाच, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारप्राप्त युवा चित्रपट निर्माते ओम भारद्वाज यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याची विशेष विनंती केली आहे. भारद्वाज यांच्या आगामी माहितीपटाचे नाव ‘हिंदु राष्ट्र आणि भारतातील युवा’, असे असून महोत्सवासारख्या मोठ्या कार्यक्रमात उपस्थित राहून त्याचे चित्रीकरण करू देण्याची त्यांनी आयोजकांकडे विनंती केली आहे. भारद्वाज यांच्या या विशेष मागणीतून महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. हा महोत्सव राष्ट्र-धर्माच्या विचारांना कलात्मक आणि प्रभावी माध्यमांतून युवा पिढीपर्यंत पोचवण्यास एक नवी दिशा देईल.
नवी देहलीचे रहिवासी असलेले भारद्वाज यांचा लघुपट नुकताच दैनिक ‘भास्कर’च्या ‘जे.एफ्.एफ्. फिल्म फेस्टिव्हल’मध्ये उपविजेता ठरला आहे. पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांनी ‘सनातन धर्माचे खरे स्वरूप, जतन आणि प्रचार’ करण्याचे ध्येय स्वीकारले. आता ‘हिंदु राष्ट्र आणि भारतातील युवा’ या विषयावर एक माहितीपट (डॉक्युमेंटरी) बनवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारद्वाज यांनी हाती घेतला आहे.
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव माझ्या माहितीपटाच्या निर्मितीसाठी निर्णायक ठरील ! – ओम भारद्वाज
भारद्वाज यांनी म्हटले की, या राष्ट्राचा एक तरुण म्हणून आपल्या धार्मिक परंपरांना प्रामाणिकपणे आणि आदराने समजून घेणे, अनुभवणे अन् त्यांचे प्रतिनिधित्व करणे, हे माझे नैतिक दायित्व आहे. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा केवळ एक उत्सव नसून तो सनातन परंपरेच्या मूळ मूल्यांचा ‘शंखनाद’ करणारे व्यासपीठ आहे. हा महोत्सव माझ्या माहितीपटाच्या निर्मितीसाठी निर्णायक ठरील आणि मी तुम्हाला वचन देतो की, माझ्या कामातून तुमच्या प्रयत्नांचा योग्य मान अन् आदर राखला जाईल. |

८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !
Shankhnad Mahotsav Delhi : कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’च्या युद्धकलेने जागवले शौर्य !
Shankhnad Mahotsav Delhi : हिंदूंनो, रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक योगदान द्या !
दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर !
Shankhnad Mahotsav Delhi : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या इंग्रजी भाषेतील सनातन...
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘सुरक्षा, संस्कृति आणि शौर्य’ यांचा जागर