बेळगाव येथील प.पू. डॉ. गिंडे महाराज यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध !
प.पू. डॉ. गिंडे महाराज गेल्या १८ वर्षांपेक्षा अधिक काळ ते सनातनच्या संपर्कात होते. सनातनच्या कार्याविषयी त्यांना विशेष प्रेम होते.
प.पू. डॉ. गिंडे महाराज गेल्या १८ वर्षांपेक्षा अधिक काळ ते सनातनच्या संपर्कात होते. सनातनच्या कार्याविषयी त्यांना विशेष प्रेम होते.
संत साहित्याचे गाढे अभ्यासक प.पू. डॉ. वा.पु. गिंडे महाराज (वय ८५ वर्षे) यांनी १७ मे या दिवशी बाजार गल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी देहत्याग केला. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
‘येत्या काळात अनेक वैश्विक संकटे येऊ शकतात’, असे अनेक संत आणि द्रष्टे यांनी सांगितले आहे. जगभरात विविध देशांकडून चालू असलेला आर्थिक वर्चस्ववाद, विस्तारवाद, स्वार्थ आणि अहंकार यांमुळे विश्व तिसर्या महायुद्धाकडे चालले आहे.
‘वर्ष १९९८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आगामी भीषण काळाविषयी सांगतांना एका सार्वजनिक प्रवचनात सांगितले होते, ‘पुढे एवढा भीषण काळ येणार आहे की, संतांनाही वाटेल, ‘डोळे मिटले असते, तर बरे झाले असते !’
तौक्ते पाठोपाठ आता ‘यास’ नावाचे चक्रीवादळ पूर्वेकडील बंगाल आणि ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टींवर धडकण्याची चेतावणी भारतीय हवामान खात्याने दिली आहे. बंगालमध्ये २५ मे या दिवशी, तर ओडिशामध्ये २६ मे या दिवशी हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.
दळणवळण बंदीमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा अपलाभ उठवून धर्मांतर, इ. आघात हिंदूंवर होत आहेत.या संकटांमध्ये म्हणजेच कोरोनाकाळात मन स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे.
चर्चासत्रामध्ये वक्त्यांनी कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये नागरिकांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर कोणती काळजी घ्यावी ? याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण सूत्रे सांगितली. ती येथे देत आहोत.
भारतात मार्च २०२० पासून वैश्विक महामारी असलेल्या ‘कोविड’ने थैमान घातले आहे. मागील वर्षभरात याचा संसर्ग पसरण्यास रुग्णांच्या दृष्टीने पुढील दोन प्रमुख कारणे असल्याचे लक्षात येते.
मंदिरात जातांना ‘साक्षात् भगवंताला भेटण्यासाठी जात आहे’, असा श्रद्धावान हिंदूंचा भाव असतो. या श्रद्धेने आणि भावाने जेव्हा हिंदू मंदिरात जातात, तेव्हा त्यांना भगवंताचा आशीर्वाद मिळतो अन् त्यांचे दु:ख दूर होऊन त्यांना चैतन्याची, तसेच आनंदाची अनुभूती येते.
अराजकाच्या काळात वैदिक धर्माला केवळ शाब्दिक पंडिताची नव्हे, तर क्रियाशील पंडिताची आवश्यकता होती. ज्याचे आचरण शुद्ध असेल, ज्याची बुद्धी सखोल आणि वाणी पवित्र असेल, ज्याच्या अंतरात सामान्य जनांच्या उद्धाराचा कळवळा असेल, असा कुणीतरी लोकोत्तर पुरुष त्या कामासाठी अवतरायला हवा होता. ‘हा मार्ग आहे आणि हेच (योग्य) कर्म आहे’, असे आपल्या वाणीने आणि कृतीने उद्घोषित करील, असा तो पुरुषश्रेष्ठ असायला हवा होता. भगवत्पूज्यपाद आद्यशंकराचार्य तशा महापुरुषाच्या रूपाने अवतरले.