केरळमधील श्री कुरुंबा भगवती मंदिराचे मुख्य पुजारी अधिवक्ता एम्. त्रिविक्रमण् अडिकल यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

केरळमधील प्रसिद्ध कोडुंगल्लूर श्री कुरुंबा भगवती मंदिराचे मुख्य पुजारी अधिवक्ता एम्. त्रिविक्रमण् अडिकल यांनी नुकतीच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

धर्मप्रसारासाठी सनातनच्या बहूपयोगी सात्त्विक भेट-पेटीचा परिणामकारक उपयोग करा !

या पेटीवर संतांचे संदेश आणि साधनेविषयी मार्गदर्शनही आहे. त्यामुळे या भेट-पेटीचा वापर करणार्‍याला आपोआपच धर्मप्रसारात सहभागी होता येईल. या भेट-पेटीचे अर्पणमूल्य ३० रुपये आहे.

पानसरे हत्याप्रकरणी निष्पाप हिंदुत्वनिष्ठ डॉ. तावडे, अमोल काळे व शरद कळसकर यांना जामीन !

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठ डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, श्री. अमोल काळे आणि श्री. शरद कळसकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.

शारदीय नवरात्रोत्सवात सनातन संस्थेद्‍वारे रायगड जिल्ह्यात जिज्ञासूंना मार्गदर्शन

जिल्ह्यात शारदीय नवरात्रोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी प्रवचने घेण्यात आली. ‘नवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावरील प्रवचनातून नवरात्रीतील विविध धार्मिक कृतींचे शास्त्र तसेच, गरब्यामध्ये होणारे अपप्रकार आणि लव्ह जिहादची समस्या यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

मिरज येथील सनातनच्या आश्रमास श्री श्री यति अनिरुद्धतीर्थनंदजी महाराज यांची सदिच्छा भेट !

श्री श्री यति अनिरुद्धतीर्थनंदजी महाराज यांना सनातन संस्थेच्या कार्याची माहिती श्री. द्वारकाधीश मुंदडा यांनी दिली, तसेच महाराजांना आश्रमाचे दर्शनही घडवून आश्रमात चालणार्‍या विविध सत्कार्यांची माहिती दिली.

कोराडी (नागपूर) येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान येथे सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन

कोराडी येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान येथे नवरात्रोत्ससवानिमित्त सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन धर्मप्रेमी श्री. शरद वांढे यांच्या पुढाकाराने लावण्यात आले होते. श्री. वांढे यांनी पुढाकार घेऊन मंदिर परिसरात सनातन संस्थेचे सण-उत्सव, धार्मिक व्रते, अध्यात्म आदी विषयांचे ग्रंथ वितरणासाठी ठेवण्याची व्यवस्था केली.

धनत्रयोदशी निमित्त धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

‘२९.१०.२०२४ या दिवशी ‘धनत्रयोदशी’ आहे. ‘धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी ! या दिवशी मनुष्याचे सुरळीतपणे पोषण होण्यासाठी साहाय्य करणार्‍या धनाची (संपत्तीची) पूजा केली जाते. व्यापारी लोकांच्या दृष्टीने धनत्रयोदशीपासून नववर्षाला आरंभ होत असल्याने ते या दिवशी तिजोरीचे पूजन करतात. सत्कार्याला धन अर्पण करणे, हीच लक्ष्मीची खरी पूजा होय.

पुणे येथे सनातन संस्थेच्या आध्यात्मिक, धार्मिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन प्रदर्शनकक्षांचे उद्घाटन !

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पनवेल येथील सनातन संस्थेचे साधक नॅच्युरोपॅथी तज्ञ डॉ. दीपक जोशी यांना ‘आयुष महासन्मान पुरस्कार’ प्रदान !

निसर्गोपचार आणि योग’ या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय रुग्णसेवेसाठी पनवेल येथील नॅच्युरोपॅथी तज्ञ डॉ. दीपक जोशी यांना ‘आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन’कडून वर्ष २०२५ चा ‘आयुष महासन्मान पुरस्कार’ १४ सप्टेंबर या दिवशी प्रदान करण्यात आला.