
नवी देहली – महंमद अली जिना यांच्या ‘मुस्लिम लीग’प्रमाणे कार्यरत असलेल्या काँग्रेसने देहलीत नुकत्याच झालेल्या सनातन संस्थेच्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला मोदी सरकारने निधी दिल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दोषारोप केले आहेत. काँग्रेसने म्हटले, ‘पंतप्रधान आणि त्यांचे सरकार सनातन संस्थेसारख्या धर्मांध संघटनांना प्रोत्साहन देत आहे. सनातन संस्था मुसलमान समुदायाविषयी कठोर असू शकते; परंतु ती एक प्रखर राष्ट्रप्रेमी संघटना आहे. ही संस्था कट्टरतावादी इस्लामी आणि साम्यवादी यांच्या चुका उघड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे अन् राष्ट्रविरोधी घटकांच्या कारवायांपासून देशाचे रक्षण करण्याच्या कामात साहाय्य करत आहे, असे वक्तव्य ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’चे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर यांनी केले. त्यांनी देशविघातक काँग्रेसवर घणाघात केला.
“Sanatan Sanstha is in the forefront of exposing the mistakes of radical Islamists!” 🚩
Former Central Information Commissioner @UdayMahurkar slams Congress for their “reckless allegations,” calling @SanatanSanstha the most patriotic organization in India. 🇮🇳#SanatanSanstha… https://t.co/npboVAdx90 pic.twitter.com/ddms66GA7z
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 23, 2026
‘एक्स’वर माहुरकर यांनी पुढे लिहिले की,
काँग्रेस कोणत्या धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलत आहे ? तिने खालील प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत :
१. द्वेष पसरवणारा धर्मप्रचारक झाकीर नाईक याला काँग्रेसने उघडपणे अथवा गुप्तपणे पाठिंबा का दिला ? मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरच त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
२. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा केरळच्या वायनाडमधून निवडणुका जिंकण्यासाठी सर्वांत कट्टरतावादी मुसलमान चळवळींचा पाठिंबा का घेत आले आहेत ? असा प्रश्न विचारत माहुरकर यांनी वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वायनाडमधून राहुल गांधी यांना पाठिंबा देणार्या कट्टरतावादी मुसलमान संघटनांची सूची असलेल्या एका बातमीची लिंक (मार्गिका) जोडली.
Cong, which today resembles Jinnah’s Muslim League, has attacked PM @narendramodi on the Modi Govt funding the recent Sanatan Rashtra Shanknad Mahotsav of @SanatanSanstha in Delhi saying ‘ PM & his Govt were promoting communal organisations like the Sanstha’.
The truth is that…
— Uday Mahurkar (@UdayMahurkar) February 20, 2026
३. कट्टरपंथी इस्लामवाद्यांच्या देशविरोधी घोषणांना उघडपणे समर्थन देणारे, तसेच संपूर्ण भारताला इस्लाममध्ये रूपांतरित करण्याचे वक्तव्य करणारे, धर्मांध उमर खालिदचे वडील आणि ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे प्रवक्ते एस्क्यूआर् इलियास यांच्याविषयी काँग्रेस नेतृत्वाचे काय म्हणणे आहे ? (इलियास यांनी वर्ष २००३ मध्ये घेण्यात आलेल्या त्यांच्या मुलाखतीत ‘राष्ट्रवाद नष्ट करा. खिलाफत (मुसलमानांचे राज्य) स्थापित करा’, या घोषणेचे उघडपणे समर्थन केले होते. त्या मुलाखतीची लिंकही माहुरकर यांनी जोडली आहे.)
४. दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी मुसलमान समुदायाला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मुसलमानांना लोकसेवा आयोगामध्ये प्रवेश मिळण्यास कोणताही अडथळा नाही. त्यांनी काश्मीर खोर्यात मोठा पालट घडवून आणला आहे. तिथे काश्मिरी मुसलमान मोठ्या प्रमाणात मुख्य प्रवाहात येत आहेत आणि विकासाची फळे चाखत आहेत.
५. जर अशी एखादी संस्था असेल, जी असुरक्षिततेची खोटी भावना निर्माण करून मुसलमान समुदायाची सर्वांत मोठी हानी करत असेल, तर ती काँग्रेस आहे.
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !