साधकांनी अनुभवले आनंदाचे डोही आनंद तरंग

नांदेड, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा नांदेड येथील सर्व साधकांसाठी मार्गदर्शनपर सत्संग आयोजित करण्यात आला होता. या सत्संगात त्यांनी साधनेत भक्तीभाव वाढवण्याचे महत्त्व, तसेच त्यासाठी करावयाचे प्रयत्न यांविषयी मार्गदर्शन केले. त्याचसमवेत नांदेड येथे अनेक वर्षांपासून साधना करणार्या काही साधकांचे साधना प्रवासातील अनुभवकथन प्रश्नोत्तर स्वरूपात घेतले. अनुभवकथन घेत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतीचा उत्कट शरणागतभाव, दृढ श्रद्धा, तळमळ, प्रीती, विनम्रता, सेवकभाव, शांत आणि स्थिर वृत्ती असलेल्या श्रीमती अनिता बरारा (वय ७२ वर्षे) या ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या १३८ व्या (समष्टी) संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा क्षेत्रातील धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी दिली. साधकांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरल्यामुळे येथील सर्व साधक भावविभोर झाले होते.
हा आनंददायी सोहळा नांदेड येथील ‘रामा कृष्णा इंटरनॅशनल हॉटेल’च्या सभागृहात पार पडला. या मंगलप्रसंगी सनातनच्या साधिका श्रीमती शालिनी गोजे यांनी पू. (श्रीमती) अनिता बरारा यांना पुष्पहार घालून, तर सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !