सनातनचे ४७ वे संत पू. रघुनाथ राणे (वय ८२ वर्षे) यांचा ठाणे येथे देहत्याग !

मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओझरम या गावचे रहिवासी आणि सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेले सनातनचे संत पू. रघुनाथ वामन राणे (पू. राणेआजोबा) (वय ८२ वर्षे) यांनी ११ जुलै २०२१ या दिवशी उत्तररात्री २ वाजता मुंबई येथील रुग्णालयात देहत्याग केला.

वर्ष २०३० मध्ये चंद्राच्या कक्षेत पालट होऊन पृथ्वीवर पूरस्थिती निर्माण होईल ! – नासा

जागतिक हवामान पालटामुळे पृथ्वीवरील वातावरणावर परिणाम होत आहे. अंटार्टिकामधील बर्फ वितळत आहे. त्यामुळे समुद्रकिनार्‍यालगत शहरांमधील पाण्याची पातळी वाढत आहे.

पुणे येथील सनातनच्या ५८ व्या संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांचा साधनाप्रवास ! (भाग १)

पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांनी ३३ वर्षे माध्यमिक शिक्षिका म्हणून कन्या शाळा कराड येथे नोकरी केली. इतिहास, भूगोल, इंग्रजी आणि गृहशास्त्र (होम सायन्स) हे विषय त्या शिकवत असत. वर्ष १९९३ मध्ये त्या निवृत्त झाल्या. वर्ष १९९७ पासून त्यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधनेला आरंभ केला.

‘म्युकरमायकोसिस’ (Mucormycosis) किंवा ‘ब्लॅक फंगस्’ या आजाराची लक्षणे आणि त्यावरील होमिओपॅथी औषधांचे उपचार !

‘ब्लॅक फंग्स’ ही एक प्रकारची बुरशी असून ती पालापाचोळा, तसेच प्राण्यांचे शेण या ठिकाणी आढळून येते. याचे बीज हवेतून वातावरणात पसरते आणि श्वासावाटे आपल्या नाकात जाते.

विलोभनीय दर्शन : हिमाचल प्रदेशातील दैवी आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये असलेले ‘सूर्यताल’ आणि ‘चंद्रताल’ !

‘आतापर्यंत आम्ही श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत कैलास-मानससरोवर, अमरनाथ, गंडकी-मुक्तीनाथ, ज्योर्तिलिंग, शक्तिपीठ इत्यादी अनेक ठिकाणी प्रवास केला आहे; मात्र त्या सर्वांमध्ये ‘सूर्यताल’ आणि ‘चंद्रताल’ येथील प्रवास वैशिष्ट्यपूर्ण आहे.

देवळांतील यात्रा, जत्रोत्सव भावपूर्ण साजरे करून चैतन्य जोपासा !

देवतांच्या उत्सवाच्या दिवशी वातावरणात अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असते. या चैतन्याचा लाभ उठवण्यासाठी या जत्रा किंवा उत्सव अत्यंत भावपूर्ण पद्धतीने पार पाडले पाहिजेत.

सनातनचे साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांचा भाव अन् जवळीक यांचा दुरुपयोग करून धन गोळा करणार्‍या तथाकथित स्वामींपासून सावधान !

सनातनच्या ओळखीचा उपयोग करून स्वत:चे प्रस्थ निर्माण करणे आणि त्यातून आर्थिक लाभ मिळवणे, ही या स्वामींची कार्यपद्धत आहे. त्यामुळे अशा प्रकारे कुणी सनातनचे साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्या ओळखीचा दुरुपयोग करत असल्यास त्याच्या संपर्कात राहू नये.

सियाराम बाबा : एक अलौकिक संत !

त्यांनी १० वर्षांपर्यंत खडेश्वरी तपश्चर्या केली आहे. यात तपस्वी झोपण्यापासून सर्व कामे उभ्यानेच करत असतात. बाबा खडेश्वरी साधना करत असतांना नर्मदेला पूर आला होता; परंतु ते त्यांच्या जागेवरून बाजूला झाले नाहीत. तेव्हा पुराचे पाणी बाबांच्या केवळ नाभीपर्यंत पोचू शकले होते.

हिंदु राष्ट्राच्या भावी पिढीला घडवण्याचे मोठे दायित्व शिक्षकांवर ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पश्चिम महाराष्ट्र, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा येथील शिक्षकांसाठी ‘सध्याच्या कठीण काळात साधना करून आनंदी कसे रहावे ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या परिसंवादात त्या मार्गदर्शन करत होत्या. या ‘ऑनलाईन’ परिसंवादात ४०० हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते.

घरच्या घरी रोपांची निर्मिती करून लागवड करा !

एखाद्या झाडापासून नवीन रोप सिद्ध करण्यासाठी त्या झाडाचा कोणता भाग उपयोगी आहे, हे माहिती असणे आवश्यक आहे. काही झाडे फांद्यांपासून, काही बीपासून, काही मुळांपासून, तर काही पानांपासून करता येतात.