सनातन संस्थेच्या ‘sanatan.org’संकेतस्थळाची ओळख आणि वैशिष्ट्ये !

श्रीकृष्णकृपेने ख्रिस्ताब्द २०१२ च्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नव्या स्वरूपातील ‘sanatan.org’ संकेतस्थळाचा शुभारंभ झाला. ‘शास्त्रीय परिभाषेत धर्मशिक्षणाचा प्रसार अन् हिंदुहितासाठी कार्य’ या व्यापक उद्देशांनी कार्यरत असलेल्या सनातनच्या नव्या स्वरूपातील या संकेतस्थळाची लोकप्रियता वाढत आहे.

संकेतस्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील अध्यात्मशास्त्रीय ज्ञानात ‘धर्मशास्त्रीय ज्ञान’ आणि ‘पृथ्वीवर उपलब्ध नसलेले ईश्वरीय ज्ञान’ या दोहोंचा समावेश आहे. त्यामुळे हे संकेतस्थळ अध्यात्मशास्त्रातील जिज्ञासूंपासून धर्मप्रसारकांपर्यंत आणि हिंदु समाजापासून अखिल मानवजातीपर्यंत सर्वांना मार्गदर्शक ठरत आहे.

 

संकेतस्थळाचे अलौकिकत्व अधोरेखित करणारी वैशिष्ट्ये

धर्मशिक्षण देण्याच्या उद्देशाने संकेतस्थळावर प्रत्येक हिंदूला त्याच्या आध्यात्मिक पातळीला अनुसरून शास्त्र सांगण्यात आले आहे. सर्वसाधारण व्यक्ती, प्राथमिक स्तरावरील साधक आणि शिष्य अशा प्रत्येकालाच उपयुक्त असे ज्ञान दिलेले आहे.

 

आता संकेतस्थळाची काही वैशिष्ट्ये पाहूया !

अ. देवतांची शास्त्रशुद्ध उपासना शिकवणारे

आ. आनंदी जीवन जगण्यासाठी आचारधर्म शिकवणारे

इ. अध्यात्मातील सर्व अंगांविषयी सखोल ज्ञान देऊन अध्यात्मातील प्रत्येक कृतीविषयी शास्त्रीय परिभाषेत उत्तरे देणारे

ई. अध्यात्माविषयी जिज्ञासा जागृत करून साधना शिकवणारे

उ. संसारात राहून साधना कशी करावी ? याविषयी मार्गदर्शन करणारे

ऊ. भूतलावर आतापर्यंत कोठेही उपलब्ध नसलेले ज्ञान देणारे

ए. शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी ‘गुरुकृपायोग’ शिकवणारे

ऐ. साधकांच्या शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्नरत असलेले

ओ. बलशाली ‘हिंदू राष्ट्र’ स्थापनेसाठी कार्यरत असलेले

औ. ‘संतांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध करण्यात आलेल्या या संकेतस्थळाच्या माध्यमातून आध्यात्मिकउपाय होणे’, हे ठळक वैशिष्ट्य असणारे एकमेवाद्वितीय संकेतस्थळ !

 

संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ज्ञानाचे केलेले वर्गीकरण

संकेतस्थळावर उपलब्ध असलेले ज्ञान पुढील भागात वर्गीकृत करण्यात आले आहे.

 

अ. अध्यात्म जाणून घ्या !

यातील लेख प्रामुख्याने अध्यात्माची तात्त्विक माहिती देणारे आहेत, उदा. अध्यात्माचे महत्त्व, साधनामार्ग, सोळा संस्कार, जिवाची ईश्वरावरील श्रद्धा वाढवणारे शास्त्र – अनुभूती इत्यादी.

 

आ. अध्यात्म कृतीत आणा !

अध्यात्माच्या प्रायोगिक स्तरावरील लेखांचा यात अंतर्भाव करण्यात आला असून धर्मशिक्षण, सण, व्रते, उत्सव, काळानुसार योग्य साधनेचे महत्त्व, आध्यात्मिक त्रास आणि त्यांवरील उपाय, वास्तूशुद्धी, वाहनशुद्धी या विषयांवरील लेख ठेवण्यात आले आहेत. हिंदु धर्मातील प्रमुख सर्व सणांवरील लेखमालिका यात आहेत, उदा. गुढीपाडवा, श्रीरामनवमी, गणेशचतुर्थी, नवरात्र, दिवाळी, मकरसंक्रांत, महाशिवरात्र इत्यादी. साधनेच्या अनुषंगाने गुरुकृपायोगातील अष्टांगसाधनेतील प्रत्येक टप्प्याविषयीचे लेख (नाम, सत्संग, सेवा, त्याग) यात आहेत.

 

इ. विश्वव्यापी सनातन (हिंदु) धर्म

या वैशिष्ट्यपूर्ण विषयांतर्गत हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू राष्ट्र, कुंभमेळा, अध्यात्माविषयीचे अपसमज आणि त्यांचे खंडण, हिंदु देवता यांविषयीचे लेख ठेवण्यात आले आहेत. ‘माय मराठी’च्या रक्षणासाठी प्रत्येकाने तळमळीने प्रयत्न करणे, ही काळाची आवश्यकता ओळखून मातृभाषा आणि सात्त्विक मराठी भाषेचे रक्षण अन् संवर्धन यांसाठी ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त नुकतीच एक वैशिष्ट्यपूर्ण लेखमालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

ई. सनातनचे अद्वितीयत्व

या भागाच्या अंतर्गतआध्यात्मिक संशोधन, ईश्वरप्राप्तीसाठी कला, दैवी कण, आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने या विषयांवरील वैशिष्ट्यपूर्ण लेखांद्वारे सूक्ष्मातील अलौकिक ज्ञान विश्वाला देण्यात आले आहे.

 

उ. दृकश्राव्य दालन (व्हिडीयो गॅलरी) आणि श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)

दृकश्राव्य दालनांतर्गत (व्हिडीयो गॅलरी) ‘अध्यात्मशास्त्र’, ‘धार्मिक कृती’ आणि ‘आचारधर्म’ यांविषयीची चलचित्रे (व्हीडीयोज), तर श्राव्य दालनामध्ये (ऑडियो गॅलरीमध्ये) ‘विविध देवतांचे नामजप’, ‘देवतांच्या आरत्या’ ठेवल्या आहेत. तसेच सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रेही संकेतस्थळावरून संरक्षित (download) करण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.

 

ऊ. सूक्ष्म-जगताशी संबंधित अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण विभाग

सूक्ष्म म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील विश्व ! ‘अथर्ववेदा’तही सूक्ष्म-जगताशी संबंधित माहिती आहे. अनेक प्रगत राष्ट्रांतही विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला पछाडलेल्या भूताचा वापर केला जातो. आज या अज्ञात शक्तींविषयी शास्त्रशुद्ध माहिती नसल्याने अनेकजण अंधश्रद्धांना खतपाणी घालतांना दिसतात. कित्येक जण तर भोंदू मांत्रिकांच्या फसवणुकीला बळी पडत आहेत. हे टाळण्यासाठी या जगताची माहिती देणारे पुढील अनोखे विभाग या संकेतस्थळावर आहेत.

जीवनातील ८० टक्के दुःखांमागे आध्यात्मिक कारण असते, असे अध्यात्मशास्त्र सांगते. त्यामुळे कित्येक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरील दुःखांवर आध्यात्मिक स्तरावर उपचार करणे आवश्यक असते. त्यासाठी आध्यात्मिक स्वरूपाचे त्रास कसे असतात आणि त्यावर काय उपाय योजावेत, यांची माहिती देणारा विभाग !

आध्यात्मिक संशोधन

सनातनने ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग मशिन’ (DDFAO), ‘पॉलिकॉन्ट्रास्ट इन्टरफिअरन्स फोटोग्राफी’ (PIP), ‘इलेक्ट्रोस्कॅनिंग मेथड’ (ESM) आणि ‘गॅस डिस्चार्ज व्हिज्युअलायझेशन’ (GDV) या वैज्ञानिक उपकरणांद्वारे विविध प्रकारचे सहस्त्रो प्रयोग केले आहेत. या सर्व प्रयोगांच्या संशोधनांतून जीवनात साधना करण्याचे महत्त्व, तसेच भारतीय संस्कृती, संगीत, आहार इत्यादींचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे. त्याची माहिती या विभागात देण्यात आली आहे.

 

संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा

शुभेच्छापत्रे

नववर्ष, दीपावली या सणांच्या वेळी दिली जाणारी शुभेच्छापत्रे आणि विवाहपत्रिका सात्त्विक रचना अन् प्रबोधनपर माहितीसह उपलब्ध !

 

सात्त्विक रांगोळ्या

विविध देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळ्यांच्या कलाकृती उपलब्ध !

 

‘ऑनलाईन’ प्रसारात वृद्धी – अन्य संकेतस्थळांद्वारे
सनातनच्या संकेतस्थळाचा व्यापक प्रसार करण्यात येणे

‘सनातन संस्थे’च्या ‘फेसबूक’वरील पृष्ठालाही वाढता प्रतिसाद मिळत असून पृष्ठाची (पेजची) सदस्यसंख्या झपाट्याने वाढत आहे. ‘ट्विटर’ आणि ‘गुगल प्लस’ या संकेतस्थळांद्वारेही सनातनच्या संकेतस्थळाचा व्यापक स्तरावर प्रसार करण्यात येत आहे.

‘ट्विटर’वरील खात्याची मार्गिका : https://www.twitter.com/sanatansanstha

Pinterest वरील पृष्ठाची मार्गिका : https://www.pinterest.com/sanatansanstha/

Instagram वरील पृष्ठाची मार्गिका : https://www.instagram.com/sanatansansthaofficial/

 

अध्यात्मशास्त्रावरील शेकडो शंकांचे निरसन करण्यात येणे

संकेतस्थळावर अध्यात्मातील विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. कुलदेवता, वाईट शक्ती, सुख-शांतीसाठी काय करावे ?, गुरु करणे, कर्मकांड, वास्तूशुद्धी, सूर्योपासना, नामजपातील अडथळे, श्राद्ध, विविध व्रते, अंत्यविधी, पूजाविधी, प्रदक्षिणा, देवघर, अग्निहोत्र, आध्यात्मिक पातळी, गुरुबंधू, पूर्वजांचा त्रास, सुतक अशा अध्यात्मातील अनेक अंगांविषयीचे जिज्ञासूंनी प्रश्न विचारले असून प्रत्येकाला त्याची उत्तरे पाठवण्यात आली आहेत. संकेतस्थळाकडे विविध ठिकाणांहून सनातन-निर्मित ग्रंथ आणि उत्पादने यांची मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे.

 

इच्छुकांनो, कार्यात सहभागी होण्यासाठी पुढील मार्गिकेवरील अर्ज भरा !

सनातन संस्थेच्या विविध विनामूल्य उपक्रमांत स्वयंसेवक, प्रायोजक किंवा अन्य हेतूने सहभागी होऊन धर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती असलेले आपले कर्तव्य बजावण्यास इच्छुक असणार्‍यांसाठी पुढील मार्गिकेवर कार्यात सहभागी होण्याचा अर्ज ठेवण्यात आला आहे :

http://www.sanatan.org/sampark

सनातन संस्थेची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment