जळगाव येथील गुरुपौर्णिमा महोत्सवास उपस्थित जिज्ञासू
काळानुसार हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्री गुरूंच्या समष्टी रूपाची सेवा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था
जळगाव, १४ जुलै (वार्ता.) – प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती अन् धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे. काळानुसार हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्री गुरूंच्या समष्टी रूपाची सेवाच आहे, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी या वेळी केले.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. येथील ला.ना. हायस्कूलच्या भाऊसाहेब गंधे सभागृहात १३ जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला. चोपडा (जळगाव), धुळे, ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथेही गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !