‘हायब्रीड’ बियाणे टाळा आणि देशी बियाण्याचे संवर्धन करा !
गेल्या काही वर्षांत ‘हायब्रीड (तथाकथित अधिक उत्पादन देणा-या)’ बिया वापरून घेतलेल्या पिकांचे दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत. ब-याचशा प्रकारच्या देशी बिया या अस्तंगत (नामशेष) झालेल्या आहेत. ‘हायब्रीड’ बियांची विक्री करणारी आस्थापने याला उत्तरदायी आहेतच; पण त्यांच्यापेक्षाही आपणच अधिक उत्तरदायी आहोत.
