‘तेलुगु सनातन पंचांग २०२३’च्या ‘अँड्रॉईड’ आणि ‘आय.ओ.एस्.’ यांच्या ‘अॅप’चे लोकार्पण

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील प्रमुख आध्यात्मिक वेत्ता आर्ष विद्या तपस्वी श्री पसर्लपती श्री बंगरय्या शर्मा यांच्या शुभहस्ते ‘तेलुगु सनातन पंचांग २०२३’च्या ‘अँड्राईड’ आणि ‘आय.ओ.एस्.’ यांच्या ‘अॅप’चे लोकार्पण २९ डिसेंबर २०२२ या दिवशी करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे सौ. विनुता शेट्टी आणि श्री. नीळकंठ नाईक उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी श्री बंगरय्या शर्मा यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत सनातन संस्थेचा उद्देश आणि कार्य यांची माहिती दिली अन् त्यांचे आशीर्वाद घेतले.
या वेळी श्री बंगरय्या शर्मा म्हणाले, ‘‘सनातन संस्था आध्यात्मिक क्षेत्रात अद़्भुत कार्य करत आहे. सनातन संस्था आश्रमांची निर्मिती करून अध्यात्माचा प्रसार करत आहे. ‘तेलुगु सनातन पंचांग २०२३’च्या ‘अॅप’मध्ये आध्यात्मिक साधना, धर्मशिक्षण, धर्मरक्षण, आयुर्वेद, सण-उत्सव, आपत्काळ आदींविषयी माहिती देण्यात आली आहे. हे ‘अॅप’ अधिकाधिक हिंदूंनी डाऊनलोड करून धर्माचरण आणि साधना करून ईश्वरप्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर व्हावे.’’
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !