‘देव संस्कृती विश्वविद्यालय (हरिद्वार)’चे कुलगुरु डॉ. चिन्मय पंड्या यांची सनातन संस्थेच्या साधकांनी घेतली सदिच्छा भेट !

सनातनच्या साधकांनी डॉ. पंड्या यांना ‘धर्मशिक्षा फलक’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट दिला. ग्रंथाचे मुखपृष्ठ पाहून गौरवोद्गार काढतांना डॉ. पंड्या म्हणाले, ‘‘अतिशय सुंदर, महत्त्वाचा संदेश देणारे आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ आहे.’’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते ‘श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास’ या मराठी ग्रंथाचे प्रकाशन !

सनातनच्या आश्रमात ‘श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास (खंड २)’ या सनातनच्या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते १३ जुलै २०२२ या दिवशी करण्यात आले.

‘रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली’चे माजी अध्यक्ष किर्ती भगवानदास पटेल यांच्याकडून कै. ग.रा. पुरोहित कन्या प्रशालेस सनातनची ग्रंथसंपदा भेट !

सनातन संस्थेचे हितचिंतक, तसेच ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली’चे माजी अध्यक्ष श्री. किर्ती भगवानदास पटेल यांच्याकडून कै. ग.रा. पुरोहित कन्या प्रशालेस विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, असे ग्रंथ भेट देण्यात आले. हे ग्रंथ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा सुनील केतकर यांनी स्वीकारले.