‘देव संस्कृती विश्वविद्यालय (हरिद्वार)’चे कुलगुरु डॉ. चिन्मय पंड्या यांची सनातन संस्थेच्या साधकांनी घेतली सदिच्छा भेट !

‘देव संस्कृती विश्वविद्यालय (हरिद्वार)’चे कुलगुरु डॉ. चिन्मय पंड्या

एर्नाकुलम (केरळ) – ‘देव संस्कृती विश्वविद्यालय (हरिद्वार)’चे कुलगुरु डॉ. चिन्मय पंड्या यांची २३ डिसेंबर २०२२ या दिवशी कोची येथे सनातन संस्थेच्या साधकांनी सदिच्छा भेट घेतली. कोची येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आरंभी गायत्री चेतना केंद्र, पानमपल्लीनगर येथे मां गायत्रीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उदयनगर येथील शिव मंदिरात डॉ. पंड्या यांचे ‘श्रद्धा आणि विश्वास – आध्यात्मिक उन्नतीचे आधार’, या विषयावर प्रवचनाचे आयोजन केले होते.

या वेळी कोचीच्या विविध समाजांचे प्रतिनिधी, अन्य आध्यात्मिक आणि धार्मिक संघटनांनी डॉ. पंड्या यांचा सत्कार केला. या वेळी सनातनच्या साधकांनी डॉ. पंड्या यांना ‘धर्मशिक्षा फलक’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट दिला. ग्रंथाचे मुखपृष्ठ पाहून गौरवोद्गार काढतांना डॉ. पंड्या म्हणाले, ‘‘अतिशय सुंदर, महत्त्वाचा संदेश देणारे आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ आहे.’’

Leave a Comment