सध्याचा काळ साधनेसाठी अनुकूल असल्याने साधनेचे प्रयत्न वाढवा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदूंना जागृत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे करतांना आपल्यातील दोष आणि अहं यांवर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

पुणे येथे श्रीमती उषा कुलकर्णी (वय ७९ वर्षे) या सनातनच्या ११० व्या संत, तसेच श्री. गजानन साठे (वय ७८ वर्षे) हे १११ वे संत घोषित !

वयस्कर असूनआजारपणात एकट्याने सर्व परिस्थिती हाताळणार्‍या, ‘गुरुदेव समवेत आहेत’, असा अखंड भाव असणार्‍या, तसेच स्थिरताही  हा स्थायीभाव असलेल्या श्रीमती उषा कुलकर्णी यांना सनातनच्या ११० व्या व्यष्टी संत म्हणून घोषित करण्यात आले. यासमवेत शांत, नम्र स्वभाव आणि अल्प अहं असलेले अन् शस्त्रकर्म होतांना ईश्वराशी अखंड अनुसंधानात असणारे श्री. गजानन साठे हे १११ वे व्यष्टी संत म्हणून घोषित करण्यात आले

श्रीकृष्ण जयंतीनिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ‘ऑनलाईन’ प्रवचने

२५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील देहली, गुरुग्राम, नोएडा आणि फरिदाबाद येथे ‘ऑनलाईन’ प्रवचने अन् भगवान श्रीकृष्णाचा सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिवक्त्यांचे योगदान हवे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

अधिवक्ता परिषदेच्या मेरठ (उत्तरप्रदेश) शाखेच्या बैठकीत मार्गदर्शन ! बैठकीनंतर अनेक अधिवक्त्यांनी धर्म, अध्यात्म, राज्यघटना, समाज आदी दृष्टीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात शंकांचे निरसन करून घेतले. तसेच या संदर्भात अधिवक्त्यांच्या बैठका आयोजित करण्याचे निश्चित केले.

प्रेमळ, उतारवयातही तळमळीने सेवा करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणार्‍या नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे !

नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांची मुलगी आणि नातू यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

अत्यंत कठीण प्रसंगात साधनेच्या बळावर स्थिर रहाण्यास शिकवणार्‍या पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतांना उत्तरोत्तर अध्यात्मात प्रगती केली. जाहीर प्रवचन घेणे, विज्ञापने आणणे, प्रसार करणे यांसह अनेक सेवा त्यांनी केल्या. प्रतिथयश स्त्रीरोगतज्ञ असतांनाही त्या मिरज येथील सनातनच्या आश्रमात येऊन राहिल्या आणि त्यांनी आश्रमजीवन आत्मसात् केले. त्यांनी शारीरिक आजारपणातही साधना चालू ठेवली.

‘आर्.एस्.एस्.-इन्स्पायर इंडिया’च्या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेचा सहभाग

‘आर्.एस्.एस्.-इन्स्पायर इंडिया’च्या वतीने १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘ऑनलाईन’ साप्ताहिक सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या ‘विज्ञान आणि परंपरा’ या भागामध्ये सनातन संस्थेच्या वतीने विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कुलु खोर्‍यामध्ये अधिष्ठात्री देवता ‘बिजली महादेव’ आणि ‘बेखलीमाता’ (भुवनेश्वरीदेवी) यांचे आहे चैतन्यमय स्थान !

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे या प्रवासात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हिमाचल प्रदेश राज्यातील कुलु जिल्ह्यातील विविध दैवी स्थानांचे दर्शन घेतले आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी अन् आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी प्रार्थना केली.

गुरुदेवांवर अपार श्रद्धा असणार्‍या वारणानगर येथील डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ७८ वर्षे) संतपदी विराजमान !

एकाच वर्षी पती आणि जावई यांचे निधन, अशा अत्यंत कठीण प्रसंगांना साधनेच्या बळावर तोंड देणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणार्‍या आणि अत्यंत विनम्र अशा डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ७८ वर्षे) या सनातन संस्थेच्या १०९ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या. तसेच त्यांच्या कन्या डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे (वय ५२ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.

अखंड गुरुकृपा संपादन करण्यासाठी गुरुसेवेच्या माध्यमातून तन, मन आणि धन यांचा त्याग करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘रत्नागिरी जिल्ह्यातील धर्मप्रेमींनी गुरुपौर्णिमा महोत्सवात केलेल्या सेवांच्या प्रयत्नांविषयी त्याचे कौतुक करणे आणि साधनेच्या गुणात्मक वृद्धीसाठी त्यांना पुढील टप्प्याचे मार्गदर्शन करणे’, या उद्देशाने जिल्हास्तरीय ‘ऑनलाईन साधनावृद्धी सत्संग सोहळ्या’चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.