प्रीतीस्वरूप असलेल्या सनातनच्या ६७ व्या संत पू. (श्रीमती) प्रभा मराठे (वय ८४ वर्षे) यांचा पुणे येथे देहत्याग

पू. (श्रीमती) प्रभा मराठे

पुणे – प्रीतीस्वरूप असलेल्या सनातनच्या ६७ व्या संत पू. (श्रीमती) प्रभा मराठेआजी (वय ८४ वर्षे) यांनी २२ सप्टेंबर या दिवशी दुपारी ३.३० वाजता देहत्याग केला. वृद्धापकाळाने त्या रुग्णाईत होत्या. त्यांच्या पार्थिवावर लाल बहादूर शास्त्री रस्ता येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पू. मराठेआजींच्या पश्चात् मुलगा, सून, २ मुली, २ जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. २३ एप्रिल २०१७ या दिवशी त्यांना संत घोषित करण्यात आले.

पू. मराठेआजी यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव होता. त्या प्रत्येक कृती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी मानसरित्या अर्पण करत असत. त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रेमभाव होता, तसेच उतारवयातही त्यांची सेवेची तळमळ पुष्कळ होती. भर उन्हातही त्या प्रसारसेवा उत्साहाने करायच्या. शेवटच्या क्षणापर्यंत त्या समष्टीसाठी अखंड नामजप करत होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment