सनातन संस्थेच्या कार्याचा प्रवास
सनातनचे काळानुरूप चालू असलेले कार्य हे देवाचे कार्य असल्यामुळे ‘देव सूक्ष्मातून स्थुलातील कार्य कसे करवून घेतो ?’, याची ही प्रचीती आहे.
सनातनचे काळानुरूप चालू असलेले कार्य हे देवाचे कार्य असल्यामुळे ‘देव सूक्ष्मातून स्थुलातील कार्य कसे करवून घेतो ?’, याची ही प्रचीती आहे.
कोणताही सण शास्त्र जाणून साजरा केल्यास त्याचा अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोनातून अधिक लाभ अनुभवता येतो. सनातन संस्था प्रत्येक सणाचे शास्त्र सांगून सण साजरे करायला सांगते. गणेशोत्सवाच्या काळात श्री गणेशाच्या नामजपाचा लाभ घ्या, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले.
सेवा करतांना प्रत्येक कृतीला भक्तीमार्गानुसार भावाची आणि कर्मयोगानुसार परिपूर्णतेची जोड दिल्यास निश्चितच ती कृती आध्यात्मिक स्तरावर होते; मग ‘ती कृती संतांसाठी केलेली असो किंवा आई-वडिलांसाठी केलेली असो, तिचा आध्यात्मिक लाभ मिळतोच !
सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी पू. गोविंदराव गळाकाटू (सावरगावकर) यांचा सन्मान सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीचे चित्र देऊन केला. या घरगुती कार्यक्रमामध्ये त्यांचे काही नातेवाईक उपस्थित होते.
‘भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन होणार’, या संकल्पनेवर श्री गणेशाचे चित्र असलेले पारपत्र (पासपोर्ट) सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान करण्यात आल्याचे समोर आले आहे. या पारपत्रावर भाग्यनगर (हैद्राबाद) पारपत्र कार्यालयाचा शिक्का असून पारपत्र प्रदान अधिकारी म्हणून पी. कृष्णा चार्या यांचे नाव आणि स्वाक्षरी आहे. हे पारपत्र विनोद म्हणून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे.
या नामजप यज्ञाच्या प्रारंभी सनातनच्या साधिका कु. प्रणिता सुखठणकर यांनी श्रीकृष्णाची भावार्चना सांगितली. त्यानंतर श्रीकृष्णाचा नामजप ऑनलाईन लावण्यात आला आणि सर्व जिज्ञासूंनी तसा नामजप केला.
सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या २१ भागांच्या या मालिकेत श्री गणेशचतुर्थी आणि श्री गणेश उपासना, गणेश चतुर्थीच्या काळात येणारी महत्त्वाची व्रते इत्यादी माहिती असेल.
दिलीप शंकर खोत उपाख्य दादा खोत यांचे ५ सप्टेंबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता वयाच्या ७४ व्या वर्षी पनवेल येथे अल्पशा आजाराने निधन झाले. कै. दादा खोत हे ‘श्री शिवगिरी सेवा संघ’ या आध्यात्मिक संप्रदायाचे संस्थापक आणि अध्यक्ष होते.
भीमसेनी आयुर्वेदीय कापराला विशिष्ट आकार नसतो. हा कापूर स्फटिकासारखा असतो. याच्या गोल किंवा चौकोनी वड्या करता येत नाही; कारण नेहमीच्या कापरासारखे यात मेण नसते.
कोरोना विषाणूचा जगभर प्रादुर्भाव झाल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आपण वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) हे नियम पाळले पाहिजेत.