सनातन संस्थेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त ‘श्री गणेशाची अध्यात्मशास्त्रीय माहिती ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून दाखवणे आणि श्री गणेशाचा नामजप करणे’, या ऑनलाईन सोहळ्याचे आयोजन

पू. अशोक पात्रीकर

श्री गणेशाच्या नामजपासह त्याची अध्यात्मशास्त्रीय माहिती
जाणून भावभक्ती वाढवा ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

अमरावती – कोणताही सण शास्त्र जाणून साजरा केल्यास त्याचा अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोनातून अधिक लाभ अनुभवता येतो. सनातन संस्था प्रत्येक सणाचे शास्त्र सांगून सण साजरे करायला सांगते. गणेशोत्सवाच्या काळात श्री गणेशाच्या नामजपाचा लाभ घ्या, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून ७ ते १८ सप्टेंबर या कालावधीत ‘श्री गणेशाची अध्यात्मशास्त्रीय माहिती ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून दाखवणे आणि श्री गणेशाचा नामजप करणे’, या ऑनलाईन सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात ७ सप्टेंबरला ते मार्गदर्शन करत होते. हा कार्यक्रम प्रतिदिन सायंकाळी ६ ते ६.३० या कालावधीत यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित होणार आहे. या वेळी ‘श्री गणेशाची मूर्ती शाडू मातीची आणि डाव्या सोंडेची का असावी ?’, याविषयीची चित्रफीत दाखवण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment