कोरोना आणि अग्निहोत्राची उपयुक्तता !

Article also available in :

अनुक्रमणिका

भारतियांनो ‘अग्निहोत्राचे महत्त्व लक्षात घेऊन प्रतिदिन ‘अग्निहोत्र’ करा !

‘कोरोना विषाणूचा जगभर संसर्ग झाल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आपण वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) हे नियम पाळले पाहिजेत. आपल्या भारतीय परंपरेत अग्निहोत्र केल्याने वातावरणाची शुद्धी होते, हे सांगितले आहे. या विषाणूचा संसर्ग अगदी अलीकडे झाल्याने ‘अग्निहोत्राचा कोरोना विषाणूवर काय परिणाम होतो ?’, याविषयीचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास झालेला नाही. तरीही असे काही अनुभव आहेत की, त्यावरून ‘कोरोना विषाणूच्या समस्येवर मात करण्यासाठी अग्निहोत्राचे साहाय्य होऊ शकते’, असे आपण म्हणू शकतो. याविषयी जर्मनी येथील अग्निहोत्राचे अभ्यासक डॉ. उलरिच बर्क यांनी मांडलेली काही सूत्रे येथे देत आहोत.

 

१. जर्मनी येथील अग्निहोत्राचे अभ्यासक डॉ. उलरिच बर्क यांनी मांडलेली काही सूत्रे

डॉ. उलरिच बर्क

 

अ. डॉ. उलरिच बर्क यांचा अल्प परिचय

डॉ. बर्क हे जर्मनीतील असून त्यांनी ‘तत्त्वज्ञान’ या विषयावर पीएच्.डी. केली आहे, तसेच ते ‘जर्मन असोसिएशन फॉर होम थिरपी’ या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते ‘अग्निहोत्र तज्ञ’ म्हणून ओळखले जातात. ते मागील ३५ वर्षे अग्निहोत्र करत असून त्याविषयावर संशोधनही करत आहेत.

 

२. अग्निहोत्रामुळे पुढील प्रकारे साहाय्य होऊ शकते

 

अ. व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता न्यून होते.

आ. जर पूर्वीच संसर्ग झालेला असेल, तर संबंधित विषाणूचा प्रभाव थोडा न्यून होतो.

इ. संसर्गावर मात करण्यासाठी शरिराला साहाय्य मिळू शकते.

 

३. संसर्ग होण्याची शक्यता न्यून होणे

‘कोरोना विषाणूचा संसर्ग अल्प करण्यासाठी अग्निहोत्राचे साहाय्य होऊ शकते’, असा एक चांगला अहवाल आला आहे.

३ अ. स्पेनमधील एलिसाबेथ एम्. यांचा थक्क करणारा अनुभव

स्पेनमध्ये कोरोनाच्या संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असणार्‍या माद्रिद शहरात रहाणार्‍या एलिसाबेथ एम्. यांनी त्यांचा अनुभव कथन केला. (युरोपातील इटलीनंतर कोरोनाचा अधिक संसर्ग स्पेनमध्ये होता) एलिसाबेथ त्यांच्या पतीसमवेत एका घरात रहाते. त्या घरातील एक खोली त्यांनी शहरात रेस्टॉरंट चालवणार्‍या एका व्यक्तीला भाड्याने दिली आहे. तेथील दळणवळण बंदीच्या पूर्वी या व्यक्तीचा अनेक व्यक्तींशी संपर्क आला होता. त्याची कोरोना विषाणूची चाचणी सकारात्मक आली. त्यामुळे एलिसाबेथ आणि त्यांचे पती यांना काळजी वाटू लागली. त्यांनी स्वतःची कोरोना विषाणू चाचणी केली, तेव्हा ती नकारात्मक आली. खरेतर एलिसाबेथ आणि तो भाडेकरू यांची स्वयंपाकाची खोली एकच आहे. ते तिघेही एकत्र जेवत असत, एकच स्नानगृह वापरत असत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एकत्र येऊन वाढदिवसही साजरा केला होता. ज्या आधुनिक वैद्यांनी या चाचण्या केल्या, त्यांना ‘संसर्ग झालेल्या माणसाच्या सान्निध्यात राहूनही एलिसाबेथ आणि त्यांचे पती यांना विषाणूचा संसर्ग झाला नाही’, याचे आश्चर्य वाटले. एलिसाबेथ एम्. या नियमितपणे अग्निहोत्र करत होत्या, तसेच अग्निहोत्राची विभूती प्रतिदिन ग्रहण करत होत्या. त्यामुळे त्यांना बहुदा कोरोनाचा संसर्ग झाला नसावा.

अग्निहोत्रामुळे विषाणू नष्ट होतात का, हे ठाऊक नाही. अग्निहोत्रामुळे जिवाणूंची संख्या अल्प होते. जे जिवाणूंच्या संदर्भात झाले, ते विषाणूंच्या संदर्भातही होऊ शकते का, याविषयी लवकरात लवकर संशोधन होणे आवश्यक आहे.

 

४. अग्निहोत्राचा जिवाणूंवर होणार्‍या परिणामाविषयी
वेगवेगळ्या संस्था आणि विद्यापिठे यांमध्ये केलेले संशोधन

४ अ. फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे केलेल्या प्रयोगानुसार
‘अग्निहोत्राच्या धुरामुळे हवेतील सूक्ष्म जंतूंची संख्या घटते’, असे लक्षात येणे

अलीकडेच ‘फर्ग्युसन’ कॉलेज, पुणे येथे अग्निहोत्राचा जिवाणूंच्या वाढीवर होणारा परिणाम शोधण्यासाठी प्रयोग करण्यात आले. या प्रयोगाचे निकाल मिळाल्यावर ‘अग्निहोत्राच्या धुरामुळे हवेतील सूक्ष्म जंतूंची संख्या घटली’, असे आढळले.

४ आ. संसर्ग झालेल्या लोकांना अग्निहोत्र कशा प्रकारे साहाय्य करू शकते ?

हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब, श्वसनसंस्थेविषयी दम्यासारखा गंभीर आजार, मधुमेह, कर्करोग, प्रतिकारशक्ती अल्प असणारे, तसेच वयस्कर मंडळी यांना कोरोनाचा अधिक धोका असतो. जसजसे वय वाढते, तसतसे माणसाची प्रतिकारशक्ती न्यून होते. आतापर्यंत कोेरोना विषाणूमुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यांमध्ये बर्‍याच जणांना वरील आजार होते.

४ इ. हृदयरोग आणि उच्च रक्तदाब

अग्निहोत्रामुळे रक्तदाब सामान्य स्थितीला यायला साहाय्य होते. यासाठी अग्निहोत्र करण्याआधी आणि अग्निहोत्र केल्यानंतर काही व्यक्तींचा रक्तदाब पडताळण्यात आला. या प्रयोगात अग्निहोत्रानंतर रक्तदाब सामान्य स्थितीला आल्याचे दिसून आले.

४ ई. अग्निहोत्र नियमित केल्यामुळे पेरू देशातील मगदा लोपेझ यांनी सांगितलेला अनुभव

पेरू देशातील मगदा लोपेझ यांनी अग्निहोत्राचा हृदयावर होणार्‍या परिणामाविषयीचा एक अनुभव कथन केला. त्यांनी सांगितले, ‘‘१० वर्षांपूर्वी माझी आई आजारी होती. तिचा इलेक्ट्रोकार्डिओग्राम (इ.सी.जी.) काढल्यावर तिला आधीच हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता, असे दिसून आले; म्हणजे तिच्या हृदयाचा एक भाग मृत झाला होता आणि तो पुन्हा सुधारू शकत नव्हता. गेली ४ वर्षे आम्ही अनियमितपणे अग्निहोत्र करत होतो; परंतु गेल्या काही मासांमध्ये आम्ही प्रतिदिन अग्निहोत्र करत आहोत. २ आठवड्यांपूवी आईचा दुसर्‍यांदा ‘इ.सी.जी.’ काढून त्यासंबंधी आधुनिक वैद्यांना विचारल्यावर ते म्हणााले, ‘‘आईचे हृदय व्यवस्थित आहे आणि तिला पूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याची कोणतीही खूण नाही.’’ ते ऐकून आम्हाला पुष्कळ आश्चर्य वाटले. आम्ही प्रतिदिन अग्निहोत्र करून दिवसातून ३ – ४ वेळा अग्निहोत्राची विभूती तिला ग्रहण करण्यासाठी देत होतो.

 

५. अग्निहोत्रामुळे दम्याचे आजारही बरे होत असल्याची उदाहरणे

कोरोनाचा फुफ्फुसांवर अधिक परिणाम होत असल्याने ‘अस्थमा’ असणार्‍यांनी विशेष काळजी घेण्याविषयी सांगितले जाते. अग्निहोत्रामुळे आपली फुफ्फुसे बळकट होण्यास साहाय्य होते आणि श्वसनाविषयी शरिराची लवचिकता वाढते. याविषयीची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यांपैकी २ उदाहरणे पुढे दिली आहेत.

५ अ. अग्निहोत्र केल्यामुळे दम्याचा आजार पूर्ण बरा झाल्याचे सांगणार्‍या अमेरिकेतील डोन्ना

सांता क्लारिटा, अमेरिका येथे रहाणार्‍या डोन्ना एस. यांनी त्यांचा अनुभव लिहिला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘‘मी पुष्कळ आजारी होते, तेव्हा युनिव्हर्सिटी ऑफ विर्जिनियामध्ये श्वसनरोगविषयीच्या तज्ञांना भेटले. त्यांनी माझ्या फुफ्फुसांचा ‘क्ष’ किरण (एक्स-रे) अहवाल मला दाखवला. त्यामध्ये माझी फफ्फुसे पूर्ण काळी दिसत होती. केवळ ४ सेंटीमीटर जागा मोकळी दिसत होती. मी अग्निहोत्र करण्यास प्रारंभ केला. पहिल्याच आठवड्यानंतर मी माझी दम्याची औषधे घेणे बंद केले आणि काही काळाने ‘स्टीरॉयड्स’ घेणे बंद केले. त्यानंतर ३ मासांनी मी आधुनिक वैद्यांकडे गेले. त्यांनी माझ्या फुफ्फुसांची क्ष किरण चाचणी केली. त्याचा अहवाल पाहिल्यानंतर ते म्हणाले, ‘‘तुम्ही काय केले, हे मला ठाऊक नाही; परंतु तुमची फुफ्फुसे एकदम मोकळी झाली आहेत. तुम्हाला आता औषधे घेण्याची आवश्यकता नाही.’’

५ आ. पोलंड येथील फ्रान बी यांना वयाच्या ११ व्या वर्षी दम्याचा तीव्र
त्रास होणे आणि वयाच्या २५ व्या वर्षी अग्निहोत्र करू लागल्यापासून दमा बरा होणे

वायसोका, पोलंड येथे रहाणारे फ्रान बी यांनी म्हटले आहे, ‘‘वयाच्या ११ वर्षांपासून मला दम्याचा तीव्र आजार होता. २० वर्षांनंतर माझी स्थिती अजून बिघडली. साधारणपणे मला दम्याचा झटका रात्री उशिरा येत असे आणि स्थानिक रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागायचे. ‘दमा हा हवेच्या प्रदूषणाशी संबंधित आहे’, असे मला वाटत होते. वयाच्या २५ व्या वर्षी मी सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळी अग्निहोत्र करू लागलो. २ आठवड्यांत माझा दम्याचा आजार बरा झाला. त्यानंतर मला तो आजार परत झाला नाही.

 

६. अग्निहोत्रामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास साहाय्य

६ अ. एच.आय.व्ही. या रोगावर अग्निहोत्राचा परिणाम

‘कोरोना विषाणूवर अग्निहोत्राचा काय परिणाम होतो ?’, याचा अभ्यास करण्यात आलेला नाही; परंतु विषाणूमुळे होणार्‍या एच.आय.व्ही. हा रोग आटोक्यात आणण्यासाठी अग्निहोत्र आणि अग्निहोत्रातील विभूती यांचा चांगला परिणाम दिसून आला आहे. याविषयी केलेल्या प्रयोगामध्ये एच्.आय.व्ही. रोगाचा संसर्ग झालेल्या मुलांनी अग्निहोत्र करायला प्रारंभ केला. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी यांनी स्वतंत्रपणे अग्निहोत्र केले. काही वेळानंतर पुढील परिणाम दिसून आले.

१. विषाणूचे प्रमाण घटले.

२. सीडी-४ या प्रोटीनची पातळी वाढली.

३. मुलांचे एकंदर आरोग्य सुधारले. त्यांची प्रतिकारशक्ती लक्षणीय प्रमाणात वाढली.

६ आ. विषाणूंची वाढ करण्यासाठी ठेवलेल्या ‘प्लेट्स’मध्ये
अग्निहोत्रातील विभूतीचे पाणी घातल्यावर विषाणूंचे प्रमाण ५० टक्के न्यून होणे

अग्निहोत्राच्या विभूतीचा वेगवेगळ्या विषाणूंवर काय परिणाम होतो, हे पहाण्यासाठी प्रयोगशाळेत एक प्रयोग करण्यात आला. अग्निहोत्रातील विभूतीचे पाणी विषाणूंची वाढ करण्यासाठी ठेवलेल्या ‘प्लेट्स’मध्ये घालण्यात आले. ते घातल्यानंतर विषाणूंचे प्रमाण ५० टक्के न्यून झाले. हे प्रमाण जरी अधिक नसले, तरी त्यामुळे मंद आजार आणि तीव्र आजार असलेल्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. जसा या वेगवेगळ्या विषाणूंवर परिणाम झाला, तसा सध्याच्या कोरोना विषाणूवर अग्निहोत्राचा परिणाम होऊ शकतो.

 

७. वरील सर्व अभ्यासावरून निघालेला निष्कर्ष

अग्निहोत्राचा कोरोना विषाणूचा संसर्ग न्यून करण्यात उपयोग होतो. याविषयी आमच्याकडे प्रत्यक्ष पुरावा नाही. तरीही वरील सर्व अहवालांचा अभ्यास केल्यास कोरोना संसर्गाच्या कठीण परिस्थितीमध्ये घरात अग्निहोत्र करणे उपयुक्त ठरू शकते. यासाठी शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करण्यात यावा.

अ. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना अग्निहोत्र करायला सांगून किंवा त्यांच्यासाठी अग्निहोत्र करून त्याचे परिणाम पडताळणे.

आ. अग्निहोत्रापूर्वी आणि अग्निहोत्र केल्यानंतर ‘रुग्णालयातील हवेतील कोरोना विषाणूचे प्रमाण किती आहे ?’, याचा अभ्यास करावा, तसेच ‘रुग्णालयातील वस्तूंच्या पृष्ठभागांवरील कोरोना विषाणूंच्या प्रमाणात काय पालट होतो ?’, याचा अभ्यास करावा.

इ. अग्निहोत्र आणि अग्निहोत्रातील विभूती यांचा ‘कोरोना विषाणू असलेल्या पेशींवर काय परिणाम होतो ?’, त्याचा अभ्यास करावा.

ई. या काळात आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांची सुरक्षा हाही एक प्रमुख विषय आहे. ‘या वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या गटांवर अग्निहोत्राचा काय परिणाम होतो ?’, याविषयी अभ्यास करू शकतो.’

– डॉ. उलरिच बर्क

  • भारताचा समृद्ध वारसा असणार्‍या अग्निहोत्राचा प्रसार डॉ. बर्क यांच्यासारखे एक विदेशी शास्त्रज्ञ करतात, तसेच कोरोनावर अग्निहोत्र उपयुक्त असल्याचे ठामपणे सांगतात, हे भारतियांसाठी लज्जास्पद आहे !
  • डॉ. बर्क यांच्यासारखे विदेशी तज्ञ अग्निहोत्रावर संशोधन करून त्याविषयी अभ्यास मांडतात, तसेच कोरोनावर अग्निहोत्र प्रभावी ठरू शकते, असेही सांगतात. अग्निहोत्राचे विविध लाभ सर्वज्ञात आहेत. सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने ठिकठिकाणी अग्निहोत्र होम आयोजित करून त्याविषयी वैज्ञानिक संशोधन करणे जनतेला अपेक्षित आहे !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment