‘श्री शिवगिरी सेवा संघा’चे संस्थापक आणि अध्यक्ष दिलीप खोत यांचे निधन

पनवेल – दिलीप शंकर खोत उपाख्य दादा खोत यांचे ५ सप्टेंबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता वयाच्या ७४ व्या वर्षी पनवेल येथे अल्पशा आजाराने निधन झाले. कै. दादा खोत हे ‘श्री शिवगिरी सेवा संघ’ या आध्यात्मिक संप्रदायाचे संस्थापक आणि अध्यक्ष होते. तसेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी पदाधिकारीही होते. त्यांच्या पश्चात्त पत्नी, १ मुलगा, सून आणि नातू आहे. त्यांचे अंत्यसंस्कार पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत पार पडले.

कै. दादा खोत आणि सनातन संस्था

कै. दादा खोत यांच्या संप्रदायाच्या वतीने विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जायचे. प्रतिवर्षी दत्तजयंतीला शिवगिरी संप्रदायाची पालखी देवद गावातील (तालुका पनवेल) सनातन संकुलातील त्यांच्या निवासस्थानापासून निघायची. या पालखीचे संकुलाच्या शेजारील सनातन संस्थेच्या आश्रमात स्वागत केले जायचे, तसेच या वेळी संप्रदायाचे भक्तही उपस्थित असायचे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment